मराठीतील विचारवंत लेखक, साहित्यीक विनायक गजानन उर्फ वि. ग. कानिटकर यांचा जन्म २६ जानेवारी १९२६ रोजी मुंबईत झाला.
वि. ग. कानिटकर यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईतच झाले. ३७ वर्षे केंद्र सरकारची नोकरी करून ते १९८३ मध्ये निवृत्त झाले. मात्र जागतिक राजकारण, जागतिक पटलावर उलथापालथ घडवणाऱ्या व्यक्ती, घटना याविषयीचा अभ्यास, संशोधन आणि त्यावरील स्वतंत्र तसेच अनुवादित लेखन, हा कानिटकर यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या व्यासंगातूनच कानिटकर यांनी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन, व्हिएतनाम युद्ध, चीन.. या विषयांवरील ग्रंथांचे लेखन केले आणि त्यांचे हे सर्व लेखन मराठी वाचकांनी उचलून धरले.
जगातील अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी ग्रंथबद्ध करून मराठी वाचकांसमोर ठेवली.
वि. ग. कानिटकर यांचे निधन ३० ऑगस्ट २०१६ रोजी झाले.
कानिटकरांची साहित्यसंपदा:
इतिहास व चरित्रे – माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र, ॲडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी, हिटलरचे धर्मयुद्ध, रक्तखुणा, इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच, फाळणी – युगांतापूर्वीचा काळोख, कालखुणा
– संपादित ग्रंथ – दर्शन ज्ञानेश्वरी, गाजलेल्या प्रस्तावना
– मुलांसाठी लेखन – फ्रंक वॉरेल चरित्र, रोहन कन्हाय चरित्र
– कादंबरी लेखन – खोल धावे पाणी, शहरचे दिवे, होरपळ
– कथासंग्रह – मनातले चांदणे, आसमंत, सुखाची लिपी, पूर्वज, लाटा.
-अनुवाद – नाझी भस्मासुराचा उदयास्त, विन्स्टन चर्चिल, संस्कार, वय नव्हतं सोळा, एका रात्रीची पाहुणी, अकथित कहाणी, अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न, अब्राहम लिंकन – फाळणी टाळणारा महापुरुष.
Leave a Reply