नवीन लेखन...

लिव्हिंग फ्री फाऊंडेशन – आवास (व्यसनमुक्ती केंद्र)

माणूस कधीही न संपणार्‍या अडचणींमुळे वाढत्या ताणतणावांमुळे दुःखांमुळे अपमानामुळे, मित्रांच्या आग्रहामुळे, किंवा निव्वळ मजा किंवा कुतूहल म्हणून दारूचा पहिला पेला तोंडाला लावतो आणि बहुतांशी लोकांच्या जीवनाला तो पेला कायमचा चिकटतो. जसे जसे दिवस जातात तसे तसे आई-बाबंच्या अपेक्षा आणि स्वप्ने नातेवाईकांचे सल्लेए जीवलग मित्रांची कळकळ,यांच्यापासून तो फार लांब जातो आणि कुठलाच आवाज अगदी मनाचासुध्दा, त्याला ऐकू येईनासा होतो. व्यसन दारूच असो किंवा सिगारेटचए तंबाखूच असो किंवा गांजाचए सगळीच व्यसनं त्याच्या तार्किक विचार करण्याच्या चौकटी तर बंद करतातच, शिवाय सामान्य माणसांच्या लक्षणांपासून त्याला खूप लांब नेवून सोडतात. मग तो हळुहळु स्वतःच्या व्यसनांत समर्थन करायला लागतो. निर्व्यसनी माणसांना नाव ठेवायला लागतो, जर त्याचे मित्र कमी पिणारे किंवा अजिबात न पिणारे असतील तर त्या वर्तुळामधून तो बाहेर पडतो आणि व्यसन असणार्‍या इतर लोकांच्या संगतीत राहायला लागतो. बरीच जण हरतर्‍हेने त्यांच्या आई-बाबांचा पैसा उधळतात, व सामाजिक बंधनांच्या, त्यांच्यांवर लहानपणी झालेल्या संस्कारांच्या बेडया तोडून अनैतिक कामांकडे वळतात. ड्रग्ज घेतल्यामुळे आणि दारूचे ‘isx’ घेतल्यामुळे सारासर विचार करण्याची त्यांची क्षमता आणि विवेकाने वागण्याचा वेगच कमी होतो आणि काही दिवसांनी तो संपतो सुध्दा.

लिव्हींग फ्री फाउंडेशन ही संस्था आवासमध्ये अशाच काही दुदैवी तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी कार्यरत आहे आणि येथून जाताना रुग्ण सोबत कधीही न संपणारा विवेकाचा सुगंध आणि नैतिकतेची शिदोरी घेऊनच बाहेर पडतो. भरकटलेल्या रात्री संपून इथे आयुष्यांना नवी दिशी मिळते, नवा प्रकाश मिळतो आणि अशा आयुष्याची भेट मिळतेए जिथे मनुष्य जगण्याच्या पळवाटा शोधत नाही, स्ववःचा आनंद किंवा दुःख इतरांसमोर व्यक्त करण्यासाठी त्याला कशाचाही आधार लागत नाही, जिथे जरी तो पराभूत झाला किंवा विजयी झाला तरी स्वतःच्या भावनांना आवर घालण्यास शिकतो.

फुललेल्या निसर्गाच्या  सहवासात, आणि अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात इथे रुग्णांना केवळ दारू सोडण्याच प्रशिक्षणच दिल जात नाही, तर त्यांच्या मनातलं नैतिकतेच आणि सारासार विचार करण्याच रोपटं पुन्हा एकदा रुजवल जात. इथल्या लोकांचा गोळयांवर किंवा औषधांवर अजिबात विश्वास नाही, म्हणूनच फक्त शरीराचं निर्वषीकरण म्हणजेच डी-टॉक्सिफिकेशन करण्यासाठी इथे विविध औषधांचा व इतर वैद्यकिय तंत्रांचा वापर केला जातो. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला, मजेच्या संकल्पना बददल्या, आणि स्वतःमधला आत्मविश्वास जागवला तर माणूस प्रत्येक प्रकारच्या व्यसनांवर आतुन अंकुश टाकायला शिकतो. दारुच्या विळख्यातून शरीराला सोडवायला केवळ ३ महिनेच लागतात, तर ही गोष्ट मनाला पुर्णपणे पटवून देण्यासाठी किमान ५ ते ६ महिने लागतात. यासाठी इथे अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. इथल्या रुग्णांची गटचर्चाए मनातून निर्माण होणार्‍या तीव्र भावनांना किंवा इच्छांना आवार कसा घालावा याबाबतची कौशल्ये, इनपूट सत्रे, प्रत्येक रुग्णाचे वैयक्तिक आणि सार्वजनिक कॉन्सेलिंग अशा अनेक पध्दतींद्वारे इथे निर्व्यसनी जीवन जगण्याचा कानमंत्र दिला जातो. निर्व्यसनी आयुष्याचे फायदे सांगण्याबरोबरच इथे व्यसनांमुळे होणार्‍या शारीरिक आणि मानसिक परिणामांनासुध्दा अधोरेखित केलं जातं. रुग्णांच्या करमणुकीसाठी अनेक मैदानी खेळ घेवून त्यांची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते. सुरुवातीला जेव्हा रुग्ण इथे येतात तेव्हा मनाने ते अतिशय अस्वस्थ चिडचिडे आणि वैतागलेले असतात. त्यामुळे सुरुवातीला त्यांना खूप समजावून घेतलं जात. ते कसेही वागले तरीही त्यांना खूप प्रेम आणि धीर दिला जातो, अगोदरच ते त्यांच्या शरीराची आणि मनाची अपरिमित हानी करुन इथे आले असल्यामुळे त्यांना कुठलीही शारिरिक शिक्षा केली जात नाही. मग ते सामान्य झाल्यानंतर त्यांच मन ताजतवान करण्यासाठी बुध्दिबळ, कॅरम, बॅडमिंटन, व्हॉली-बॉल, फुटबॉल अशा अनेक खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. कुठल्याही व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आधी मनावर काही प्रमाणावर प्रभुत्व गावजण अत्यावश्यक असतं. त्यासाठी अनेक योगासनांचे आणि मेडिटेशनचे प्रकार इथे शिकवले जातात. प्रत्येक आठवडयाला या रुग्णांचे पालक त्यांना भेटावयास येतात. आपल्या प्रत्येक छोटया प्रगतीत किंवा आपल्यामधील दर सुक्ष्म बदलाला कुणीतरी दाद द्यावी, किंवा प्रेमाने आपली कोणीतरी पाठ थोपवावी अस त्यांना सतत वाटत असतं. आणि ही कसर पालक भरून काढतात. पालकांचा मानसिक आधार आणि प्रेमए या रुग्णांची उमेद वाढवणारं ठरतं. कारण त्यांची व्यसनमुक्ती प्रक्रिया ही एखाद्या लढाईपेक्षा कमी नसते. माणसांना इथे धीट आणि मनाने कणखर बनवलं जातं. दुःख दारू पिऊन व्यक्त करण्यापेक्षा ते इतरांशी वाटलं की कमी होतं, तर पराभव खिलाडुवृत्तीने स्विकारला तर त्याची मनाला लागणारी बोच अनेक पटींनी कमी होते, मग तो पचवण्यासाठी आपल्याला कुठल्याही व्यसनाची गरज पडत नाही. एखाद संकट आलं, की इथल्या रुग्णाला दारू पिण्याची वाट सर्वात जवळची वाटते, पण असा पळपुटेपणा करण्यापेक्षा त्या संकटाला निर्भीडपणे आणि सर्व ताकदिनिशी सामोरे जाण्यासाठी प्रेरित केलं जातं आनंदी आशावादी, किंवा एखादी सुखद घटना घडली तरीसुध्दा अशा रुग्णांना विविध व्यसनांच्या माध्यमातून तो आनंद साजरा करावासा वाटतो, पण आनंद व्यक्त करण्याचेसुध्दा अनेक मार्ग असतात आणि ते मार्ग इथे प्रत्यक्ष शिकवले जातात. मनुष्य जेव्हा दारु प्यायला सुरुवात करतो तेव्हा तो पालकांनी केलेले संस्कार आणि लावलेली शिस्त, नितीमुल्यं, बायकोची होणारी फरकट, मुलांची लटकणारी भविष्य सारे काही विसरला असतो. या हरवलेल्या नितीमुल्यांनासुध्दा इथे पुन्हा उजाळा दिला जातो. माणसाचं मन आनंदी आणि ताजतवान असल्याशिवाय शिकवलेलं ज्ञान आणि सांगितलेले उपाय तो कधीच आचरणात आणू शकत नाही. त्यामुळे रुग्णांच मन शांत आणि स्वस्थ राहाव यासाठी अनेक उपाय केले जातात. रोज संध्याकाळी त्यांना निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारण्यासाठी पाठवल जात. शनिवार आणि रविवार हे दोन वार म्हणजे त्यांच्यासाठी अगदी पर्वणीच असते. या दोन्ही दिवशी कोणतीही सत्रे नसतात, आणि त्यांना  त्यांचे राहून गेलेले छंद जोपासायची पुन्हा संधी मिळते. मग कोणी संगणकीय क्षेत्रामध्ये पारंगत असतील तर फाटोशॉपवर काम करण्याची, किंवा अॅनिमेशन व विविध सॉफ्टवेअरस् वर काम करायची मुभा असते. कोणाला वाचायचा छंद असेल तर त्याला अनेक विनोदी आणि हलकीफुलकी पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येतात. कोणाला चित्रकलेची हौस असेल तर त्याला कागद, रंग, ब्रश, रंगीत पेन, पेन्सिली असं सर्व साहित्य पुरवण्यात येतं. स्वयंपाकामध्ये रस असणार्‍यांना किचनमध्ये मुक्त वावरण्याची आणि नवे प्रयोग करण्याचीसुध्दा मुभा दिली जाते. त्यांच्या करमणुकीसाठी प्रोजेक्टरवर दिवसभर विविध चित्रपटांची आणि डॉक्युमेंटरीजची रेलचेल असते. रात्री जेवणानंतर मोठया आवाजात डिस्कोवर चित्रपटांची गाणी लावली जातात आणि सर्व रुग्णांची पावलं आपोआप थिरकतात. थोडक्यात काय तर आनंद व्यक्त करण्याची कितीतरी निर्दोष साधने आहेत, हे त्यांच्या मनांवर बिंबवलं जातं. कोणाचा वाढदिवस असेल तर तो शनिवारी साजरा केला जातो आणि खीर बनवली जाते. कधीतरी आहारात बदल म्हणून सूप चायनीज पदार्थसुध्दा बनवले जातात. रुग्णांना आहार देण्याच्या बाबतीत प्रचंड काळजी घेण्यात यते. जे रुग्ण जैन असतीलए किंवा ज्यांना मधुमेहाचा किंवा हृदयाचा त्रास असेल तर अशांसाठी अतिशय कमी तेलकट आणि तिखट जेवण बनवण्यात येतं.रुग्णांनी चांगला आणि आशावादी विचार करावा यासाठी त्यांना प्राणायाम शिकवल जातं ब्लड सर्क्युलेशन पुर्ववत करण्यासाठी अनेक कार्डिओव्हॅम्क्यूलर व्यायामप्रकार शिकवले जातात. डॉ.म्हात्रे, डॉ.मोकल, डॉ.तिवारी आणि एक मानसोपचार तज्ञ या संस्थेला नियमित भेट देऊन सर्व रुग्णांची आपुलकीने चौकशी आणि तपासणी करतात. सुरूवातीच्या काळात अनेक रुग्ण व्यसनांपासून दूर झाल्यामुळे अस्वस्थ होतात, त्रागा करतात, हिंसक बनतात, किंवा अगदी रडून समोरच्याला विरघळवण्याचा प्रयत्न करतात, इतर अनेक रुग्णांच्या मनात वाईट गोष्टी भरवतात, अशांसाठी कायम २४ तास देखरेख करणारी टीमसुध्दा उपलब्ध आहे.

अनेकदा हे रुग्ण त्यांच्या मित्रांमुळेसुध्दा या व्यसनाला बळी पडलेले असतात. मित्रांच्या आग्रहामुळे त्यांना अनेक वाईट सवयी लागलेल्या असतात आणि सर्व उपचारानंतरसुध्दा हे व्यसन पुन्हा लागण्याचा संभव असतो. अशा रुग्णांना मित्रांपासून किंवा समाजातील अशा अनेक मोहांपासून आणि अमिषांपासून दूर कसं राहायचं हे शिकवलं जातं. ही डिटॅचमेंट फार गरजेची असते.

— अनिकेत जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..