मतदान हा लोकशाहीचा उत्सव… चार दिवसांचा… त्या साठी आपले गावातील संबंध खराब करु नयेत, कर्ज काढून खर्च करू नये… हे सांगण्याचा प्रयत्न….
`आम्ही साहित्यक फेसबुक ग्रुप’चे लेखक श्री रघू देशपांडे, नांदेड, यांची ही रचना
गावोगावी वेशीवर
लोकशाहीचा नगारा
गल्लीच्या कुशीवर
भाऊबंदकी नजारा…
जातीपातीची वाटणी
गोळाबेरीज मांडली
गावएकीची चटणी
सत्तेपायी वाटली…
गोंधळ जागवला
स्वार्थी कुरघोडीने
अख्खा गाव नागवला
रात्री अफाट खर्चाने…
क्षणांचे राजकारण
भिंती घातल्या मनात
भाऊ भाऊ करीती रण
कोण किती तें पाण्यात..
बॅलेटचे मतदान
बुलेटने ठरु लागलें
गावोगावी अन्नदान
मदिरापान झडू लागले…
आली आली लोकशाही
गाव नशेने झिंगला
कुणा एका पाटलाने
आपला मळा विकला…
अमाप खर्च करून
लोकप्रतिनिधी जिंकला
विकासाच्या नावा वरुन
बेल भंडारा उधळला…
यासाठी का दिले भावा
संविधान भिमाने…?
मतदान घ्यावे भावा
आप आपल्या सत्कर्माने…!!
— रघू देशपांडे
नांदेड
Leave a Reply