मणिपूरच्या हिरव्या गार डोंगररांगा कापत इंफाळ या राजधानीच्या शहरापासून लुकवाक लेक कडे प्रयाण केले.३० ते ४० किमी परीघाचे गोड्या पाण्याचे सरोवर थेट क्षितीजापर्यंत पसरलेले,यात विविध आकाराची अनेक बेटे तरंगत होती.काही बेटे एखादा माणूस उभा राहील इतकी लहान तर काही बेटावर बांबूच्या झोपड्या,त्यांच्या बाजुनी उगवलेले हिरवे गार गवत,ते चरणारी बकरी,गाय,छोटया झुडपात पक्षांची घरटी,दोन बेटातून वाहाणारे संथ पाणी,छोटया होडीतून जाणारा नावाडी,जाळ्यात पकडलेले मासे टोपलीत भरतानाही दिसत होता. रात्रभरात ही बेटे तरंगत जात आपली जागा बदलतात,दुसरया दिवशी वेगळ्याच भागात दिसतात.पान् वेलींच्या जाळ्यामुळे ती उभी राहतात.प्रवाहाबरोबर ती वाहत जातात.प्रवाह फसवे असल्याने या लेक मधील प्रवास जाणकार नावाड्या बरोबर करावा लागतो.रात्री या बेटावर अतिरेकी लपण्या करता येतात त्यामुळे जवानांचा मोठा तळ सरोवराला लागूनच होता.दिवसा शांत दिसणारे हे निसर्गाचे अनोखे लेणे रात्री युद्ध भूमी ठरते.
— डॉ. अविनाश केशव वैद्य
Leave a Reply