नवीन लेखन...

महाराष्ट्रातील प्राचीन लोणार सरोवर

पृथ्वीवर सतत उल्कापात होत असतो परंतु काही वेळा अती अजस्त्र उल्का आदळतात, तेंव्हा त्यांना अशनी वा meteorites म्हणतात.  ते अती वेगाने येऊन जमिनीच्या आत खोल रुततात व  तेथे विवर तयार होते. अशा तर्‍हेचे अजस्त्र सरोवर महाराष्ट्र राज्यात बुलढाणा भागात, जालनापासून ११० किमी अंतरावर आहे. याची सर्व माहिती न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध world’s greatest craters and  meteorites museum मध्ये अगदी संपूर्ण विडीयो सकट मिळाली तेव्हा माझी पावले लोणार कडे वळली.

साधारण लाख एक वर्षापूर्वी ही घटना घडली असावी. या विवराचा व्यास १८३० मीटर, १५० मीटर खोली, विवराची कड बाजूच्या जमिनीपासून  सुमारे १५ मीटर उंच आहे. ईशान्य दिशेला प्रचंड मोठी घळ. जेथून अशनी प्रचंड वेगाने आदळला. त्याची अंदाजे लांबी ६० मीटर. २० लाख टनाचा हा आघात ६ मेगाटन अणुबाँब स्फोटाएवढा. केवढी उष्णता निर्माण झाली असेल. ही घटना किती वेळ चालली असेल हे काळालाच ठाऊक. आपल्या कल्पना शक्ती पलीकडचे आहे, परंतु हे कपोलकल्पित नाही हे विज्ञान शास्त्राने अनेक पुरावे देऊन दाखवून दिलेले आहे. (२००१ साली जागतिक विवर परिषदेत हा उत्पात मंगळ ग्रहावरील अशनी पासून झाला असे सिद्ध झाले होते) हा इतिहास लोणार गावातील या विषयाचे अभ्यासक व शाळेचे मुख्याध्यापक  बुगदाणे सर आम्हाला  विवराच्या काठावर तळपत्या ऊन्हात उभे राहून देत होते. विवराचा ऊतार १५ ते ३५ अंश इतका असून सरोवराचे पाणी प्रचंड खारट Ph 10.0 अल्क धर्मीय. हिरव्या शेवाळयामुळे पाण्याचा रंग निळसर हिरवट आहे. (Water contains nacl.Hco3 fluorides copper, iron metals.) काही लोक पाण्याचा औषध म्हणून उपयोग करतात. काठाला अनेक विविध आकाराचे रंगीबेरंगी दगड आढळतात, ज्यावर बरेच संशोधन झालेले आहे.

लवण म्हणजे मीठ त्यावरून लोणार नाव पडले. या सरोवराच्या पाण्यापासून हैदराबादच्या निजामाने मीठ काढून त्यावर त्याकाळात ४५००० रू मिळविले होते. काठावर अनेक मोडकळीस आलेली मंदीरे असून तेथे गोड्या पाण्याची सतत धार वाहात असते. तळापर्यंत उतरण्याचा रस्ता खडबडीत त्यामुळे वर चढून येताना दमछाक होते. सरोवराच्या सर्व बाजुनी जीप जाण्याचा रस्ता,  व चार कोपऱ्यातून सरोवर न्याहाळण्यासाठी पक्के कठडे बांधलेले आहेत.  सूर्यास्तामुळे आकाश भगवे सोनेरी झालेले, पाण्याचे रंग सतत बदलत होते, त्यामुळे हिरवट मातकट नदीसारखा प्रवाह सरोवराच्या मध्यात दिसत होता.  पाण्याला वेगळीच चकाकी आलेली. काठाजवळ काळ्या पाणकोंबड्या डुंबत होत्या,पांढऱ्या बगळ्यांची रांगच रांग काठावरील झाडांवर उतरत होती,आकाशात पक्षांचे जथे सरोवराच्या काठी उतरताना  दिसत होते. अंधार पडू लागला, सरोवर काळोखात विलीन झाले होते, भन्नाट सन्नाटा पसरला होता.

अशनी मुळे निर्माण झालेल्या घळीच्या उंचवट्यावर अती प्राचीन पारंब्या असलेला वड जणू या घटनेचा साक्षीदार आहे असे वाटते. त्याच्या पारंब्या मधून दिसणारे विवर डोळ्याचे पारणे फिटविते,

मुख्य विवरापासून २ ते ३ फर्लांगावर एक अतिशय छोटे तळे आहे त्याला अंबरतळे म्हणतात. त्यात थोडे पाणी, पण ते गोडे आहे. जवळच लाल शेंदूर लावलेली मारुतीची आडवी मूर्ती. बहुदा अशनीच्या एका तुकड्याची असावी. त्यात चुंबकीय लोहाचे प्रमाण इतके आहे की होकायंत्र मूर्ती जवळ ठेवले की चुंबकीय सूची अखंड फिरत रहाते.

गेली २ एक हजार वर्षे अनेक राजवटीनी या विवराची नोंद घेत परीसरा भोवती अनेक मंदीरे व उत्तम शिल्पे उभारली आहेत. सम्राट कृष्णदेवराय व चक्रधरस्वामी यांची येथे भेट झाली होती.

असा आहे मनोरंजक इतिहास लोणारचा.

—  डॉ. अविनाश केशव वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..