शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
विसरून जातो वेड्या, स्वत:तील न्यूनता खरी ….।।धृ।।
पैसे ओढती खोऱ्यानें, परि शरीर भरले रोगानें
श्रीमंतीत वाढली कांहीं, गरिबाची लाचारी पाही
विसरून देह दुर्बलता, धनाचा अहंकार धरी…१
शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी
शरीर संपदा मिळे, परि अडते पैशामुळे
देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार
विवंचना ती पैशाची, विसरे शरिर सौख्यापरि….२
शक्तीच्या जोरावरती बघतो इतरांत लाचारी
ज्ञानीजन ते असती, अगाध त्यांची मति
टीका करित राहूनी, विसरती ते अडचणी
परिस्थितीचे वलय, निराश त्यांना करी….३
शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply