खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत,
कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ….१,
भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही,
नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही…२,
कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून,
एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून…३,
गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे,
प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे…४,
स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली
घराबाहेर पडून पाऊल लोप पावू लागली…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply