कॅसेट टेप आणि सीडीचे शोधकर्ते लू ओटन्स यांचा जन्म २१ जून १९२६ रोजी झाला.
लू ओटन्स हे एक डच अभियंता, शोधकर्ते होते. लू ओटन्स यांनी डच कंपनी फिलिप्स मध्ये आपल्या संपूर्ण कारकिर्द घालवली. १९६३ मध्ये, फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स यांनी अधिकृतपणे “कॉम्पॅक्ट कॅसेट” सादर केली. या कॉम्पॅक्ट कॅसेटचा ऑटन्स यांनी शोध लावला होता.
१९६३ मध्ये ओटन्स यांचा कॅसेट टेपचा शोध हे जगभरात एक मोठे यश होते. १९६३ मध्ये शोध लावल्या पासून १०० अब्जाहूनही अधिक कॅसेट विकल्या गेल्या आहेत. परंतु सीडीच्या उदयानंतर या कॅसेटचा वापर कमी झाला, वीस वर्षानंतर लो ऑटेन्स यांनी सीडीचा पण शोध आपल्या सोबतच्या अभियंत्याच्या सोबत लावला होता.
लू ओटन्स यांचे ६ मार्च २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply