नवीन लेखन...

एलटीटीडी तंत्रज्ञान

सागरी जलाचे रूपांतर पेयजलात करून त्याचा वापर पिण्यासाठी, तसेच ऊर्जानिर्मिती प्रकल्पात करण्याचे तंत्रज्ञान आता नवीन राहिलेले नाही. समुद्राचे पाणी पाईपने आणणे त्यावर प्रक्रिया करणे व नंतर ते हव्या त्या ठिकाणी पुरवणे ही खर्चिक बाब मानली जाते, असे असले तरी चेन्नईच्या सागरी विज्ञान संशोधन संस्थेने या तंत्रज्ञानात बरीच प्रगती केली आहे.

सागरी जलाचे पेयजलात रूपांतर करण्यासाठी जे लो टेंपरेचर थर्मल डिसलायनेशन तंत्रज्ञान वापरले जाते ते या संस्थेने विकसित केले आहे. रिव्हर्स ऑसमॉसिस प्रक्रियेला पर्याय म्हणून हे तंत्रज्ञान तयार करण्यात आले. सागरी जलाचे पेयजलात रूपांतर करण्याची क्रिया कमी खर्चात कशी घडवून आणता येईल हे सध्या मोठे आव्हान आहे. सागरी जलातील वेगवेगळ्या प्रवाहांचे तपमान भिन्न असते. वरच्या थरात ते २८ ते ३० अंश सेल्सियस असते तर खोल भागात ते ७ ते १५ अंश सेल्सियस इतके कमी असते. तपमानातील या फरकाचा वापर सागरी जलाचे पेयजलात रूपांतर करण्यासाठीच्या तंत्रात वापर केला आहे.

एलटीटीडी तंत्रज्ञानात सागराचे पाणी हे व्हॅक्युम फ्लॅश चेंबरमध्ये आणले जाते तेथे व्हॅक्यूम पंपाच्या मदतीने दाब कमी केल्याने ते कमी तपमानाला उकळते, त्याची वाफ झाल्यानंतर सागरातून ६०० मीटर खोलीवरून आणलेल्या थंड पाण्याच्या मदतीने या वाफेचे कंडेन्सरमध्ये संघनन केले जाते. त्यातून निर्माण होणारे पाणी हे क्षार व खनिजमुक्त असते. यात भूऔष्णिक परिणामांचा वापर करून कमी खर्चात पेयजल मिळवता येईल यावर भर दिलेला आहे.

हे पाणी केवळ पिण्यासाठीच नाही तर ऊर्जा प्रकल्पातही वापरता येते. या तंत्रज्ञानाच्या टीकाकारांच्या मते अशा पाण्यात सिलिका व काही खनिजे राहतात त्यामुळे बॉयलर खराब होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे तंत्रज्ञान आपल्याकडे पहिल्यांदा कावराती येथील डिसलायनेशन प्रकल्पात वापरण्यात आले. हा प्रकल्प सागरी प्रदेशात असून त्यात सागरी किनाऱ्यापासून काही अंतरावर चारशे मीटर इतकी पाण्याची खोली उपलब्ध आहे.

सागरी प्रवाहाच्या खालच्या थरातील थंड पाणी आणण्यासाठी ६०० मीटरची पाईपलाइन टाकलेली आहे. कावरातीसारख्या बेटांवर पेयजल मिळणे शक्य नाही त्यामुळे तिथे अशा तंत्राने पाणी तयार करणे हे वरदान ठरले आहे. या तंत्रात पाण्यावर पूर्वप्रक्रिया करण्याची गरज नसते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार पेयजल तयार करता येते. तेथे दिवसाला एक लाख लिटर पेयजल या तंत्रज्ञानाच्या मदतीने पुरवले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..