एखाद्या मुलगा वडिला पेक्षा जास्त शिकला किंवा चांगले काम केले की म्हणतात बाप से बेटा सवाई. पण मुलगीही करु शकते नव्हे तर करतेच आहे मग तिलाही असेच म्हणावे ना? बाप से बेटी सवाई. आज जागतिक पातळीवर अनेक मुली स्त्रिया खूप मोठी कामगिरी करतात. घराचेच नाही तर देशाचे नाव उज्ज्वल करतात. तेव्हाही असे म्हणत नाहीत. मुलगी नात. कधी कधी आपल्याला किती आणि काय काय शिकवतात ते पाहून खूप आनंद होतो. अभिमान वाटतो. माझ्या बाबतीतही असेच झाले आहे….
माझ्या काळातील रितीनुसार मी मला जे जे शक्य होते ते ते केले. त्यात थोडा बदल केला होता पण असे काही सुचले नाही.लग्ना नतंर सासरी माहेरी अनेक सणवार साजरे केले जातात. पण माझ्या लेकीने जरा हटके वेगळे असे जे केले आहे ते सांगावेसे वाटले म्हणून. लॉकडाऊन मुळे थोडा फार फरक करावा लागला. संक्रांत. आंबा दान. वगैरे वगैरे. वटसावित्री पौर्णिमा होती तेंव्हा तिने दोन वटवृक्षाच्याचे वृक्षारोपण जावयी व लेकीच्या हस्ते शाळेतल्या मैदानात केले. आता परवा झालेल्या आषाढी एकादशीला तिने लेकीला व जावयाला एक तुळशीचे वृंदावन. टाळ. आणि विठ्ठल रखुमाईंच्या खूपच सुंदर अशा मूर्ती दिल्या आहेत. त्यामुळे जावयी व नातीने वारकरी होऊन थोडा वेळ पंढरीची वारी केली होती. ते पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्या विठ्ठल रखुमाईंच्या दर्शनासाठी ही जोडी अशीच कायम राहो अशी मागणी विठ्ठल रखुमाईंना अगदी कळकळीने केली आहे.
म्हणूनच म्हटले होते की मॉ से बेटी सवाई. बरोबर आहे ना? असेही बऱ्याच वेळा घडलेले आहे. त्यामुळे लेकीचे कौतुक केलेच पाहिजे. तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर ती सांगा म्हणजे ही म्हण बदलणे योग्य होईल.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply