मद, मोह, क्रोध, वासना शरीरांतर्गत किती भावना,माणूस नावाची जादू भारते,
नेहमीच मज हे दयाघना,–!!!
लोभ मत्सर इर्ष्या नीचता, माणसातही आढळते क्रूरता,
संपून माणुसकी, वृत्ती दानवी, दाखवतो आपली बा हीनता,–!!
तरीही माणूसपण असते,
एखाद्या सज्जन हृदयात,
माणुसकीचे महत्व जाणे,
कितीही असेल संकटात,–!!
असा सज्जन प्रेम मानतो जगातील मोठी शक्ती,
हेच प्रेम असे त्याचे,
जगण्याची विशाल उक्ती,–!!!
मुके प्राणी वृक्षलता,
सारेच त्यापुढे झुकतात,
प्रेमळ बाळकडू मिळतां,
अधिक जीवन जगतात,–!!!
याच माणसात आढळते,
परमेश्वरावर अढळ भक्ती,
तीच तारक बनते,
जीवन सुसह्य सरतेशेवटी,—!!!
करुणा भाके तो भक्त,
लीन दीन ईश्वरापुढे,
जगाच्या कल्याणाकरिता,
ज्ञानेश्वरही घालती साकडे,–!!!!
हिमगौरी कर्वे
©
Leave a Reply