जिव्हाळा नि आपुलकी
जा! तूझ्या वाट्यास नाही
तुझ्याबद्दल लिहून मी
का संपवू लेखणीची शाई
आता पुन्हा मवाळ झालास
आलासच ना माझ्या दारी
कितीही कारले गुळात भिजले
तरीही कडू चव सोडणार नाही
इतके घाव वर्मी बसले
भळभळती जखम ठायीठायी
फुंकर घालण्या उशीर झाला
आता तुज कधीच माफी नाही
जाऊ द्या, माफी देऊ,
सोडून देऊ सारे कमलपत्री
म्हणणे सोपे वागणे अवघड
कशी विसरू त्या अश्रूंच्या रात्री
आला गेला इथेच सारे
सोन्याच्या राशी कुणी नेत नाही
इतकेच करुया, गेल्यावर म्हणती
चांगला होता तो एक भाई!!
— वर्षा कदम.
Leave a Reply