पडल्या पडल्या करते मी मानसवारी.
निघाले सर्व पाश तोडुनी मी माझ्या माहेरी
डोईवर आहे तुळशी आईचा मायेचा हात.
करेन संकटावर विश्वासाने सहज मात…
हातात नाही घेता येत मजला टाळ.
पण गळ्यात आहे कायमची नाममाळ..
नाही घडली संसाराच्या मोहात पायीवारी
या पुढे तरी कायावाचामने घडो जपसेवा खरी….
नाही घडली सेवा. नाही घडली पायीवारी.
अपराधी आहे मी म्हणून या दीनाला क्षमा करी.
एकदाच फक्त एकदाच धावून ये माझ्या साठी.
घालीन कायमस्वरूपी तुझ्या पायाला मिठी….. 

जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल 

–सौ कुमुद ढवळेकर
Leave a Reply