बर्याच जणांना स्पाॅन्डेलायटीस,व्हर्टिगो म्हणजे मानेतील दोष, पाठदुखी स्लीप डिस्क म्हणजे कंबर दूखी असे त्रास असतात. ह्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगतो.
ह्यासाठी लागणारी सामुग्री – दोन सारख्या आकाराच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, चटई
१. प्रथम चटई वर उशी न घेता पाठ टेकून झोपावे.
२. ह्या स्थितीत मानेखाली व कंबरेखाली गॅप पडते.
३. एक बाटली मानेखालील गॅप मध्ये आडवी ठेवावी.
४. नंतर दोन्ही पाय जवळ घेऊन कंबर उचलावी. माकड हाडाजवळ दुसरी बाटली आडवी सरकवावी.
५. आता एक एक पाय सरळ करावा. दोन्ही पाय एकदम सरळ करू नयेत. हे महत्वाचे आहे.
६. पाय सरळ केले की डोके जमिनीला टेकवावे. ह्यामुळे पाठीच्या कण्याला ताण
येतो. अशा स्थितीत अर्धा मिनिट राहावे..
७. उठताना एकेक पाय जवळ घेऊन कंबर उचलून कंबरे खालील बाटली प्रथम काढावी व नंतर मानेखालची बाटली काढावी व कुशीवर वळून उठून बसावे.
हा प्रयोग करताना कधीही घाई करू नये शांतपणेच करावा. असे रोज एकदा करावे.
अरविंद जोशी B.Sc.
Leave a Reply