नवीन लेखन...

हिंदी व पंजाबी चित्रपटांतील खलनायक मदन पुरी

मदनलाल पुरी यांनी १९४० ते १९८० पर्यंतच्या ४० वर्षांत ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये कामे केली. त्यांचा जन्म १९१५ रोजी लाहोर येथे झाला. अनेक प्रकारचे खलनायक रंगवले. वर्षाला जवळपास आठ चित्रपट पडद्यावर आले. मोठा भाऊ चमनलाल आणि धाकटा अमरीश पुरीही आपल्या भूमिकांनी चित्रपट क्षेत्रात स्थिर झाले होते. मदन पुरी यांचा पहिला चित्रपट ‘अहिंसा’. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही, हे वर्षाला आठ या समीकरणाने लक्षात येतेच; पण या यादीमध्ये स्मगलर, छोटा-मोठा दादा, काका, कपटी मामा, चर्चमधील फादर, कोणाचा तरी भाऊ, करप्ट पोलिस ऑफिसर, अशा विविध भूमिका असल्या तरी हे पात्र आतल्या गाठीचे किंवा संधीसाधू नक्कीच असणार, अशी प्रेक्षकांची खात्री असे. त्याच्या ४० वर्षांच्या कार्यकाळात, घवघवीत ३०० सिनेमांमधून विविध भूमिका यशस्वीपणे निभावल्या आहेत.

‘आई मिलन की बेला’ , ‘मिस्टर एक्स’, हावडा ब्रिज ,कन्हैया ,चायना टाऊन ,जिद्दी , वक्त इ. आणी इतरही शंभरेक सिनेमांमधे लहानमोठ्या नकारात्मक भूमिकांमधून खलनायक म्हणून गाजला. मदन पुरी चं व्यक्तित्वच असं होतं कि तो सुटाबुटात आला तरी उच्चवर्गीय, गर्भश्रीमंत असल्या कॅटेगिरीत शोभायचा नाही ,मात्र ‘गल्लीतील मवाली , रिवॉल्वर ऐवजी चाकू, सुरा हातात बाळगणारा मुहल्ल्याचा दादा , भुरटा चोर अश्या भूमिकांमधे छान शोभायचा!! मदन पुरी यांनी सुरुवातीला नायक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी जिवलग मित्र देव आनंद यांच्या सांगण्यावरून त्यांनी खलनायकी भूमिका करण्यास सुरुवात केली आणि तिथेच त्यांना नशिबाने साथ दिली. त्यानंतर अनेक खलनायकी भूमिका केल्याने त्यांना खच्चून प्रसिद्धी मिळाली. मधल्या काळात काही वेगळ्या भूमिकाही त्याने केल्या. पण ३०० हून जास्त चित्रपटांमधील ‘दीवार’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘उपकार’, ‘चोर मचाये शोर’, ‘पूरब पश्चिम’, ‘राधा और सीता’, ‘झूठा’, ‘स्वयंवर’, ‘बेनाम’, ‘अमर प्रेम’, ‘आराधना’, ‘कटी पतंग’ या त्याच्या काही लक्षणीय म्हणता येतील अशा भूमिका.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा तीन खलनायकांच्या घरात जन्माला आलेल्या लेफ्टनंट कर्नल कमलेश पुरी यांनी ‘माय फादर-द व्हिलन’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘एकदा मी माझ्या बाबांचा टीव्हीवर लागलेला चित्रपट पाहत बसलो होतो. नातवंडे बाजूला खेळत असल्याने त्यांना मी बोलावून चित्रपटातला तो माणूस कोण?, असे विचारले. मात्र त्यांनी माझ्या बाबांना ओळखलेच नाही. त्याक्षणी जाणीव झाली की मदन पुरींना त्यांची पतवंडेच ओळखत नसतील तर यापुढील पिढी काय ओळखणार? या एकाच जाणिवेने मी बाबांच्या आठवणी संग्रहित करण्यास सुरुवात केली आणि आज त्या पुस्तक रूपात तुमच्यासमोर मांडतो आहे, अशा शब्दांत मदन पुरींचे थोरले सुपुत्र कर्नल कमलेश पुरी यांनी या पुस्तक लिखाणामागची पाश्र्वभूमी सांगितली. बाबांची लोकप्रियता इतकी होती की एकदा मी त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेलो होतो. त्यावेळी सहाजिकच बाबांची खलनायकाची भूमिका असल्याने त्यांचा प्रवेश झाल्यानंतर मागे बसलेल्या एका गृहस्थाने चांगल्याच शिव्या हासडल्या.

त्यावर थोडं संतापूनच ‘जरा तमीज से बठो’ अशी प्रतिसूचना मी त्या गृहस्थाला केली. त्यावर त्या गृहस्थाने ‘क्या वो तुम्हारा बाप लगता है?’, असा प्रश्न विचारला. यावर मनातल्या मनात हसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता. शेवटी ते वास्तव स्वीकारून शांतपणे चित्रपट पाहिल्याचे कमलेश पुरी यांनी सांगितले. मदन पुरी यांचे निधन १३ जानेवारी १९८५ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/विनोद गोरे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..