ह्याचा १० मीटर उंचीचा झाडीदार वृक्ष असतो.ह्याची पाने आघाड्याच्या पानांसारखी दिसणारी किंचीत गोल असतात.पानाच्या मध्य शिरेवर लांब व तीक्ष्ण काटे असतात.ह्याचे फळ पियर्सच्या सारखे दिसते व गोल,पिवळट धुरकट असून फल मज्जा विशिष्ट गंधयुक्त असते.मज्जेमध्ये कवचयुक्त काळ्या बिया असतात ह्यांना मदनफळ पिंपळी म्हणतात.
ह्याचे उपयुक्तांग फळ असून मदनफळ चवीला गोड,कडू,तुरट,तिखट असून उष्ण गुणाचे असते हे हल्के व रूक्ष असून प्रभावाने उल्टी करवते.हे अल्प मात्रेत वापरल्यास गोड चव सोडल्यास इतर गुणांनी कफनाशक आहे व उष्ण असल्याने वातनाशक आहे.पण जास्त मात्रा वापरल्यास कफपित्त शोधन करते.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)मदनफळ साल वेदना व सूज कमी करते म्हणून वातव्याधीमध्ये अभ्यंगास ह्याचे तेल वापरतात.
२)कफप्रधान विकारात उल्टी करविण्यास मदनफळ उपयुक्त.
३)अल्पमात्रेत वापरल्यास कफनिस्सारक आहे म्हणून सर्दी,दमा,खोकला ह्यात मदनफळ उपयुक्त आहे.
४)मदनफळ तीक्ष्ण,उष्ण,कडू,तिखट,तुरट असून
त्वचा रोगात क्लेद व दुष्ट कफाचा नाश करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply