नवीन लेखन...

माधव रघुनाथ खाडिलकर उर्फ माधवराव खाडिलकर

ज्येष्ठ नाटककार व पार्ल्यातील उत्तुंग सांस्कृतिक परिवाराचे मुख्य विश्वस्त माधव रघुनाथ खाडिलकर उर्फ माधवराव खाडिलकर यांचा जन्म दि. ३ मार्च १९४३ रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील जायगव्हाण गावी झाला.

सामाजिक,राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या विचारांसह सांस्कृतिक कलांचा आस्वाद सर्वसामान्यांना घेता यावा, यासाठी “उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट च्या माध्यमातून अविरतपणे कार्यरत असलेल्या माधवराव खाडिलकर हे ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका आशाताई खाडीलकर यांचे पती होत. माधवराव खाडिलकर हे मुळचे सांगलीचे.

सांगलीच्या चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी बी कॉमची पदवी मिळवली. शालेय वयापासूनच त्यांना अभिनय आणि वक्तृत्वाची आवड होती.१९६८ साली दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक इब्राहीम अल्काझींच्या मार्गदर्शनाखाली माधवरावांनी नाट्य प्रशिक्षण घेतले.”ऑथेल्लो’, ‘स्कन्दगुप्त’, ‘हिरोशिमा,’थ्री पेन्नी ऑपेरा’ या सारख्या इंग्रजी नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या.१९७१ साली एन एस डी मधून पदवी घेतल्यानंतर त्यांची निवड, जगप्रसिद्ध नाट्य संशोधक आणि दिग्दर्शक फ्रित्झ बेन्नेवितद्ह यांनी पूर्व जर्मनीच्या वायमार आणि बर्लिन येथील जर्मन नॅशनल थिएटरमध्ये जागतिक नाटक अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देऊन केली.

मुंबई मराठी साहित्य संघातर्फे ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे नाटक मराठीत करावं ही संकल्पना, जर्मनीतील आपले मित्र फ्रिट्स बेनीविट्झ यांच्याशी चर्चा करून, माधव खाडिलकर यांनी साहित्य संघात मांडली. फ्रिट्स बेनीविट्झ व विजया मेहतांनी हे नाटक दिग्दíशत केलं. माधव खाडिलकर सहदिग्दर्शक व कलावंत होते. या नाटकाचे जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये १४ प्रयोग झाले. ‘साता समुद्रापलीकडे गेलेलं हे पहिलं मराठी नाटक ठरलं.’ स्वत:ला जे जे मिळालं ते इतरांनाही मिळावं यासाठी माधवराव नेहमीच प्रयत्नशील असत. ‘स्वामी’ नाटकात माधवरावांची भूमिका करण्याची त्यांची संधी हुकली पण त्यानंतर ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकात सावरकरांची भूमिका करण्याचा एक दैवी योग माधव खाडिलकर यांच्या जीवनात आला.माधव खाडिलकर लहानपणापासूनच स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांनी भारलेले होते. स्वा.सावरकर जन्मशताब्दीनिमित्त माधव खाडिलकर यांनी ‘अनादि मी अनंत मी!’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ज्वलंत जीवनदर्शनाचं नाटक लिहिलं. पार्ल्यातील कलाकार तरुण-तरुणींना एकत्र करून तीन महिने तालमी करून त्याचे ११० प्रयोग भारतात व इंग्लंड, अमेरिका, कॅनडामध्ये सादर केले. त्या नाटकात आशा खाडिलकर यांनी माई सावरकरांची भूमिका केली होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘अनादि मी अनंत मी!’ या नाटकाची मनसोक्त स्तुती करणारी प्रस्तावना दिली. या ‘अनादि मी अनंत मी!’ नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन लंडनमध्ये स्वा. सावरकरांच्या क्रांतिकार्याने भारलेल्या इंडिया हाऊसमध्ये झाले. ‘जयोस्तुते’ हे गीत गायला लागल्यावर समोरील पन्नास लोकही त्यांच्या बरोबर गायला लागले. सगळ्यांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू होते.

‘उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट’ स्थापन करून त्यांनी विलेपार्ले येथील समविचारी मंडळीं सोबत दोन दशकांहून अधिक काळ मुंबई, ठाणे आणि पुणे येथे रसिकांना उत्तमोत्तम कार्यक्रमाची भेट दिली. वार्षिक जीवनगौरव, सेवागौरव, भाऊबीज,संगीत नैपुण्य, राष्ट्राभिमान पुरस्कारआणि शिष्यवृत्ती देकन गुणीजनांना आणि सेवाभावी व्यक्तींना त्यांनी सन्मानित केले.माधवराव यांनी देना बँकेत १९७५ ते २००१ चिफ पब्लीक रिलेशन ऑफिसर म्हणून नोकरीही केली.

कैंद्र सरकारच्या ‘सूचना आणि प्रसारण’ खात्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या ‘संगीत आणि नाटक विभागाचा कार्यभाग निर्देशक म्हणूनत्यांनी दोनर्ष कार्यभार सांभाळला.त्यावेळी गाजलेली इंग्रजी नाटके मराठीत आणून भक्ती बर्वे, विजया मेहता यांच्या मदतीने खाडिलकर यांनी पुन्हा जर्मनी,स्विझर्लंड येथे सादर केली.
“खरं सांगायचं तर” या नावाने माधव खाडिलकर यांनी आत्मचरित्र लिहीले आहे.
माधवराव खाडिलकर यांचे ३ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले.

संकलन-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..