मदमस्त तारुण्य बहर,
पाहून कसा मी,
जागच्या जागी थिजलो,
दया कर जराशी,
तुला पाहुनी अचानक,
बर्फासारखा विरघळलो,–!!!
सुवर्णचंपकी कांती तुझी, चाफेकळीगत नाक,
भिरभिरणारे टपोरे नेत्र,
अन लाल कपोती गाल, –!!!
भुरभुरणारे केस उडती,
कसे वाऱ्यावरती,
जसा सुगंधच होतो,
येणाऱ्या झुळकेवर स्वार,–!!!
धडधडणारे उरोज पाहून,
पुरता मी ढांसळलो,
लटपट चालीने त्या,
एकदम गांगरुन गेलो,–!!!
शब्द “मंजुळ” किती,
जशी “सुरीली” तान,
भान हरपून ऐकत राहिलो,
तुझे “यौवनी” गान,–!!!
मादक”” चाल तुझी ती,
जशी नागीण “सळसळणारी”,
पृथ्वीवरती अवतरली का,
कुणी अस्मानी परी,–!!!
तुझे लडिवाळ चाळे ,
पाहून धकधक जिवांत होते,
येते कुणी पाहुनी तुला,
काळीज काढून ठेवते,–!!!
डौलदार ती यष्टी,
गोरी– पान काया,
भलेभले जन तरसून उठती,
तुझ्यासमोरी जाया,–!!!
नयनबांण”” फेकता कसे,
गारद मी झालो,
तृषार्त चकोर बनुनी,
कशी वाट पाहत राहिलो,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply