नवीन लेखन...

मॅगझिन चॅम्पियन

२००९ साली प्रदर्शित झालेल्या “३ इडियट” चित्रपटात चतुर रामलिंगम नावाचे एक विनोदी व्यक्तिमत्व दाखवण्यात आले आहे. या चतुर वर अनेक विनोदी प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. परीक्षेच्या काळात स्वतःचा प्रथम क्रमांक यावा म्हणुन हा चतुर होस्टेल वरील इतर मुलांच्या रूममध्ये गुपचूप पणे “चावट मॅगझिन” टाकत असतो. असे करण्याचा उद्देश म्हणजे इतरांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करणे आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करणे. इथे “चावट मॅगझिन” प्रतीकात्मक रित्या दाखवण्यात आले असले तरीही हे दृश्य आपल्या वास्तविक आयुष्याच्या अनेक स्पर्धात्मक प्रसंगाचे कथन करतो. आपल्याला यश मिळावे म्हणुन समर्थन करणाऱ्या अनेकांमध्ये चतुर रामलिंगम सारखा एखादा मॅगझिन चॅम्पियन पण लपला आहे असे अनेक वेळेस होते.

आपण आपले आयुष्य जगत असताना, आयुष्याच्या विविध टप्प्यावर यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना, चतुर रामलिंगम सारखे अनेक मॅगझिन चॅम्पियन आपल्यालाही अनेक वेळेस भेटत असतात. यशाला जसे अनेक बाप असतात तसेच अनेक शत्रुही फुकट मध्ये मिळत असतात. इतरांच्या यशाच्या मार्गावर काड्या करणाऱ्या मॅगझिन चॅम्पियनची संख्या आपल्या आजूबाजूला ढिगाने सापडते. शालेय जीवनात प्रवेश केल्यापासून ते मृत्यु पर्यंत व्यक्ती सतत कुठल्या ना कुठल्या स्पर्धेला सामोरे जात असतो. आयुष्यात स्पर्धा असलीच पाहिजे मात्र स्पर्धा निकोप असणेही तेवढेच गरजेचे. मात्र मॅगझिन चॅम्पियनला निकोप स्पर्धा आवडत नसते. इतरांच्या अपयशाला ते स्वतःचे यश मानत असतात.

अशा मॅगझिन चॅम्पियनचा आनंद त्यांनी काय यश मिळवले यापेक्षा इतरांच्या यशामध्ये काय त्रुटी आहे हे सापडण्यात असतो. आपल्याला दृश्यपणे असे व्यक्तिमत्व दिसले नाही तरीही अदृश्यपणे काड्या करण्याचे यांचे काम सतत चालू असते. आपण यांना टाळायचा प्रयत्न केला तरीही हे मात्र आपल्याला अजिबात टाळत नाही. यांच्या यशापेक्षा इतरांच्या अपयशात यांचा खरा आनंद लपलेला असतो.

हे सर्व वाचत असताना, तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला यश मिळवताना कुठे कुठे मॅगझिन चॅम्पियन भेटले हे तुम्ही आठवू शकता. तो चतुर रामलिंगम आठवताना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नेमके कोणाचे चित्र आठवते. शक्यच झाले तर अजून एक गोष्ट आठवुन बघा की कधीतरी तुम्ही पण आयुष्यात मॅगझिन चॅम्पियनची भुमिका गुपचूप पणे पार पाडली आहे का? मानवी स्वभावाचा भाग म्हणुन तुमच्या, आमच्या, सर्वांमध्ये एक सुप्त चतुर रामलिंगम लपलेला असतो का?

लेखक : राहुल बोर्डे, पुणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..