आज सहज you tube वर डेव्हिड कॉपरफिल्डची मुलखात बघत होतो तेव्हा मला आठवले मी त्याच्यावर आर्टिकल लिहीले होते, त्याने मला त्याच्या काही ऑटोग्राफ्स पाठवल्या होत्या, एकदम वेगळ्या ऑटोग्राफ्स आहेत त्याच्या…अगदी त्यांच्याप्रमाणे…
डेव्हिड कॉपरफिल्डचे खरे संपूर्ण नाव आहे डेव्हिड सेट कोटकिन. त्याचा जन्म १६ सप्टेंबर १९५६ साली अमेरिकेत न्यू जर्सी येथे झाला. त्याच्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत त्याच्या नावावर ११ गिनीज रेकॉर्ड आहेत आणि २१ एमी अवॉर्ड्स. २०१५ च्या फोर्ब्सच्या यादीत सर्वात श्रीमंत सेलेब्रेटी म्ह्णून नाव होते. त्याचे १२ महिन्याचे उत्पन्न होते ६३ मिलियन डॉलर . त्याने ‘ द हॉरर ऑफ ट्रेन ‘ या चित्रपटात जादूगाराचे कामही केले. त्याने बहामा येथे ११ बेटे विकत घेतली.
हा डेव्हिड कोण आहे असे विचारले असता तुम्हाला निश्चित वेगळे वाटेल. हा आहे जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी जादूगार. एका वेळी हजारो लोकांना आपल्या जादूने विचार करायला भाग पाडले . आता जादू ही जादू नसते हे जगजीहार आहे परंतु तो अशी काही हातचलाखी करतो की हजारो लोकांना , कॅमेरांना तो सहज फसवू शकतो.
तो हवेतून उडत जातो, तो हजारो लोकांच्या आणि कॅमेऱ्यांच्या समोर जाड चायना वॉल मधून आरपार चालत दुसऱ्या बाजूला गेला . तर पाण्यावरून चालत गेला , अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘ स्टॅचू ऑफ लिबर्टी ‘ अदृश्य केला , मोठा ट्रक स्वतःच्या अंगावरून नेणे असे अनेक जादूचे प्रयोग केले.
वयाच्या १० व्या वर्षी जादूचे प्रयोग करायला सुरवात केली आणि इतक्या लहान वयात तो यशस्वीही झाला . एखादा माणूस काय करू शकतो हे डेव्हिड कॉपरफील्डने जगाला दाखवून दिले. त्याचे व्हिडिओज जगभर बघीतले जातात. त्याच्या जादूच्या प्रयोगासाठी जी तिकीट विक्री होते त्यानेही खूप विक्रम मोडले आहेत. जादू करणे ही एक कला आहे हे त्याने जगाला पटवून दिले.
फ्रेंच सरकारचा ‘नाईटहूड’ किताब मिळाला, तसेच ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’ सारखे सन्मानही मिळाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply