नवीन लेखन...

मग्न असलेले जग

मलाच वाटे – –

जग मजलाच हांसते

विचार करिता कळले  —  जगास फुरसत नसते  ।। धृ ।।

 

वेगांत चालते जग,    क्षुल्लक तुमचा सहभाग

ह्या अथांग जनसागरीं,   कुणी न पुसती तुम्हांपरी

आपल्यातच जग जगते

विचार करिता कळले  —   जगास फुरसत नसते  ।। १।।

 

प्रत्येकांचे प्रश्न निराळे,    गर्क आहेत सोडविण्या सगळे

उगाच होई भास मजला,    मनाचा हा खेळ जहाला

बघण्या तुमचेकडे, वेळ नाही कुणाते

विचार करिता कळले   —  जगास फुरसत नसते  ।।२।।

 

श्रीमंतीची कुठे झलक,    गरीबीत उघडी अनेक

गाण्याच्या तालावरी नाचती,   दुःखीता समोर कांही रडती

कोण जाणतो, शेजारीच काय घडते

विचार करिता कळले   —  जगास फुरसत नसते  ।।३।।

 

संकल्पित कार्ये प्रचंड पुढती,    धांवतो प्रत्येक पूर्ण करण्या ती

कोठून मिळेल अवधी त्यास,    करण्या दुजांची विचारपूस

वाहून जातो, जीवनाच्या प्रवाहाते

विचार करिता कळले   —  जगास फुरसत नसते ।।४।।

 

एक इच्छा राही मनीं,   तुलना करावी यशाची कुणी

डोकावतो किंचित् इतर जीवनीं,   परत वाचतो आपलीच कहाणी

बघतो  “परंतु क्षणिक”  इतराते

विचार करिता कळले  —  जगास फुरसत नसते  ।।५।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०                                                                 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..