कट्टर नास्तिक कुटुंबात जन्मलेल्या भक्त प्रल्हाद महाराजांनी गुरुकुलमध्ये राहून कृष्णभावनेची जी चर्चा केली ती फार महत्वपूर्ण असून सध्याच्या कलहरुपी युगातील मनुष्यांसाठी ती खूपच उपयक्त आहे. भक्त प्रल्हाद यांच्या मते फारच मर्यादित असलेल्या मनुष्य जीवनात कृष्णभावना जागृत करणे अत्यंत महत्वाचे आहे. मैथून जीवनात मनुष्य स्वत:चे रक्त चाखत असून यातच आनंद मानत आहे. हा केवळ मुर्खपणा आहे. मनुष्य जीवनात आपल्याकडे श्रेष्ठ चेतना असल्यामुळे आपण जीवनातील उच्च किंवा अध्यात्मिक आनंदासाठी प्रयत्न केला पाहिजे. भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी आपला मौल्यवान वेळ कधीच वाया घालवू नये. आपल्याला सुख किंवा दु:ख मिळणार आहे. वास्तविक पहाता आपण आपले ध्यान भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांना प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. पुढील जन्मात आपल्याला मनुष्य शरीरच मिळेल याची काही शाश्वती देता येत नाही. ते आपल्या कार्यावर अवलंबून आहे. गाढवाप्रमाणे काम केले तर गाढवाचे देवतेप्रमाणे काम केले तर देवतेचे शरीर मिळेल. कृष्णभावनेसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपला व्यवसाय सांभाळून आपण हे करू शकतो. फक्त आपले काम श्रीकृष्णांच्या सेवेत अर्पण करणे महत्वाचे आहे. मानवी आयुष्याचे गणति लक्षात घेऊन भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यातच खरे शहाणपण आहे. यासाठी वेळ न दवडता अभी नही तो कभी नही हे सूत्र ध्यानात ठेवावे.
— बाळासाहेब शेटे पाटील
9767093939
Leave a Reply