हो!!!!
हो मी महानायिका बोलतेय
नाव माझे सावित्रीबाई
माझी जन्मदात्री लक्ष्मीआई
३जानेवारीला सुदिन उगवला
खन्दोजी नेवसे यांच्याघरी कन्यारत्नास “पहिली धनाची पेटी”चा मान मिळाला.
आजच्या सारखा गर्भपाताचा शाप नाही मिळाला.
हो !!!!!!!
हो मी महानायिका बोलतेय
उपवर होताच १८४०सात ज्योतिरावांच्या घरचा उंबरठा ओलांडला.
संरक्षक,समर्थक गुरू लाभता साक्षरतेचा वसा घेतला.
हो!!!!
हो मी महानायिका बोलतेय
मी तर ज्ञानदानाचा झेंडा रोविला
कर्मभुमी माझी युद्धभुमी
प्रतिकुलतेत अनुकुलतेसाठी लढा दिला
विधवा विवाह,अस्पृश्यता,
महिला स्वातंत्र्य,दिलीत महिलांचे साक्षरीकरण
यासाठी मी विष्ठेचा नि दगडांचा मार सोसला
हो!!!!!!
हो मी महानायिका बोलतेय
सामाजिक सुधारक,पहिली महिला शिक्षक होण्या स्वातंत्र्याचा पायंडा रचला
पण माझा पोषाख मी नाही पाश्चिमात्य केला
आधुनिक बाला स्वातंत्र्याला नको लागू दे स्वैराचाराची बाधा
हो!!!!!
हो मी महानायिका बोलते
नको मजला देवत्व इथे
नको माझ्या फोटोस हारतुरे
मला माझे स्वप्न हवे
अजूनही बऱ्याच निरक्षर दिसतात इथे
त्यांच्यासाठी थोडा वेळ द्या की गडे
हो!!!
हो मी महानायिका बोलतेय
आपल्या उत्कृष्ट मार्गावर चालत राहू
मृत्यूलाही घाबरवू
हो!!!!!!
हो मी महानायिकाच आहे
मी महानायिकाच बोलतेय
कारण…………………
१०मार्च १८९७ला महामारीत प्लेग ऋग्णांची सेवा करता करता प्लेगग्रस्त होऊनच ही क्रांतीज्योत समाजासाठी विझली असेल
पण ……………….
पण ही धगधगती ज्ञानमशाल सावित्रीच्या लेकींनो तुमच्या रुपात धगधगत आहे
उठा……….
उठा अन् माझा ज्ञानयज्ञात प्रयत्नांच्या पराकाष्ठेची आहूती द्या
आहूती द्या
— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply