एका सफेत वालावर जल रंगांच्या साह्यानेरंगविलेला कंबोडियन गणेश
ही गणेशमूर्ती १३ व्या शतकातील असून ती ब्राँझची बनविलेली आहे. मूर्तीवर विविध अलंकार असून ते हिरव्या रंगात दाखविलेले आहेत.
या गणेश मूर्तीला दोन हात असून अर्धवट वाकलेल्या स्थितीत बसलेली आहे. उजव्या हातात मोडलेला सुळा व डाव्या हातात ग्रंथ आहे. यातच मांगल्य व ज्ञानाचे दर्शन होते. या प्रकारची मूर्ती हिंदुस्थानात प्रचलित नाही. परंतू कंबोडिया इतिहासात मात्र ती दुर्मिळ मानली जाते. चीनी साहित्यात वर्णन केल्याप्रमाणे राजे महाराजे आपल्या सिंहासनावर ज्या पद्धतीने बसत त्याच पद्धतीची ही मूर्ती आहे.
येथील प्रघाताप्रमाणे राजे जेव्हां सिंहासनावर बसत तेव्हां आपल्या उजव्या पायाचा गुडघा वर करून ठेवलेला व डावा गुडघा आसनावर ठेवलेला तशीच ही मूर्ती आहे. कंबोडियातील राजे ज्या प्रकारचा मुकुट व अलंकार धारण करीत असतं त्याच पद्धतीचा मुकुट धारण केलेला आहे. मुकुट पूढील बाजूस किरीटासारखा व मागील बाजूस चक्राकार उंच उंच व अगदी निमुळता होत गेलेला आहे. मुकुटावर व सुळ्यावर विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. यावरून कंबोडिया संस्कृतीचे शिल्प व कला कौशल्याचे दर्शन घडते.
कंबोडिया हा देश मूर्ती संपत्तीच्या दृष्टीने फार प्रसिद्ध आहे. पूर्वी राजधानी अद्कुखर ही तर मूर्तीची खाण मानली जाते. येथे गणेशास प्रहकनेस असे म्हणतात.
ह्या मूर्तीत भारत व चीन संस्कृतीचा मिलाप आढळतो पण नजर मात्र जावा पद्धतीप्रमाणे खाली आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply