नवीन लेखन...

महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे आणि मी

Maharashtra Bhooshan Babasaheb Purandare

आज नागपंचमी….
महाराष्ट्रभूषण श्री.बाबासाहेब पुरंदरेंचा तिथीने जन्म दिवस….
बाबासाहेब…तुम्हांस देवी तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो…तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत….


बाबासाहेब

“छत्रपती शिवाजी महाराज किती वाजता बसले हो बाबासाहेब सिंहासनावर राज्याभिशेकाच्या दिवशी ?
नाहीतरी आपण शिवाजी महाराजांचे नाव या आपल्या प्रदर्शनाच्या माध्यमाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवत आहोत तर महाराज सिंहासनावर विराजमान झाले, ठीक त्यावेळीच आपण आपल्या या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रदर्शनाचे उद्घाटन करूया.
कशी आहे कल्पना बाबासाहेब.?”
“छानच आहे कल्पना मिलिंदराव….
पहाटे ५ वाजता महाराज सिंहासनाधिष्ठीत झाले. म्हणजे बाकी सगळे विधी आधीपासूनच सुरु झाले होते पण प्रत्यक्ष सिंहासनावर महाराज पहाटे ठीक ५ वाजता बसले…..
आणि राज्याभिषेक झाला.” बाबासाहेब उत्तरले.
पहाटे ५ वाजता म्हटल्यावर अंग शहारलं माझ…
माझ गिनीज बुक साठीच छायाचित्र प्रदर्शन आणि महाराजांचं नाव पहिल्यांदाच गिनीज बुक मध्ये कोरल जाण्याचा सुवर्णक्षण….
पण पहाटे ५ वाजता उद्घाटन…?
कसं होणार ?
कोण येणार ?
पण लगेच विचार केला, नाहीतरी आपण प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचाच निवडला आहे ना….
मग…
जे काही असेल ते असेल महाराज ५ वाजता बसले ना सिंहासनावर, आपण ही आपल्या प्रदर्शनाच उद्घाटन पहाटे ५ वाजताच करायचं बाबासाहेबांच्या आशीर्वादाने.
“मस्त कल्पना आहे न बाबासाहेब?
तुम्हाला जमेल का पहाटे ५ वाजता यायला ?
राजसाहेबांना मी विनंती करतो.milind-and-babasaheb
ते नक्की येतील.”
मी दबकत दबकत विचारलं.
विलक्षण चपळाईने बाबासाहेब उद्गरले,”नक्कीच…मी येतो ४.४५ वाजता ठीक. राजसाहेबांना फोन लावता का? बोलून घेऊ त्यांच्याशी लगेचच.”
मी श्री. राज ठाकरेंना फोन लावला त्यांच्या सेलफोनवर…
श्री. राज ठाकरे सुद्धा क्षणाचाही विलंब न लावता तयार झाले…

२८ जून २००७….
पहाटे घड्याळात ठीक ४.४४ वाजले आणि बाबासाहेब पोचले गणेश कला क्रीडा केंद्रात….
त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे…घड्याळाच्या ठोक्यावर…
एका अदभूत ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी………
तुडुंब ओसंडून वहात होत गणेश कला क्रीडा केंद्र तेव्हा पहाटे ५ वाजता सुद्धा…
मुंगीलाही शिरायला जागा नव्हती शब्दशः…
शेकडो जण बाहेर उभे राहिले होते…
किमान ४ वाहिन्यांच्या ओबी vans आल्या होत्या हा सोहळा जगाला लाइव्ह दाखवण्यासाठी…
बाबासाहेब आणि माझा परिचय होता आधीपासूनच पण २००० साली निनादराव बेडेकर यांच्या सोबत रायगडावर गेलो होतो तेव्हा बाबासाहेब खूप जवळून पहिले…
अनुभवले…
ऐकले…
आणि नंतर आम्ही एकत्र काम करत असलेल्या प्रोजेक्टमुळे बाबासाहेबांसोबत असंख्य अगणित वेळा भेट झाली…असंख्य वेळा , अनेक प्रसंगी मनमोकळ्या गप्पा झाल्या…

काही माणसांना तुम्ही ऐकता,
काही माणसांना पाहता…
पण काही थोर माणसे ऐकण्या-पाहण्या पलीकडे महान असतात…
अश्या विभूतींना पंचप्राण एकवटून अनुभवावे लागते…
त्यांच्या आपल्या पाठीवर पडलेल्या आशीर्वचनाच्या थापेने मोहरून जायचे असते…
थरारून उठायचे असते….
प्रेरित व्हायचे असते….
आणि त्या विभूतींच्या आशीर्वादाने कामाला लागायचे असते…
श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे अशीच एक थोर विभूती आहे……….
विलक्षण सामर्थ्यवान आणि दैवी व्यक्तिमत्व आहे…
आज नागपंचमी….
महाराष्ट्रभूषण श्री.बाबासाहेबांचा तिथीने जन्म दिवस….
बाबासाहेब…तुम्हांस देवी तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो…तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत….
आणि त्या आदिशक्ती तुळजा भवानी चरणी एकच प्रार्थना…
बाबासाहेबांचा तो खणखणीत पहाडी धारदार आवाज शिवचरित्र सांगण्यासाठी पुन्हा एकदा तसाच्या सप्त-सप्तकांत तसाच तेजस्वी लागू दे…
बाबासाहेबांचे ते तेज:पुंज शब्दभांडार कानावर आदळणारा तो हजारोंचा जनसमुदाय हल्लकल्लोळ करत तसाच थरारून उठू दे…
आमच्या डोळ्यांतून यथार्थतेच्या अथांग अथक घळाघळा अश्रुंचे पाट वाहू दे….
आमच्या थिजलेल्या, मरगळलेल्या, विस्कळीतलेल्या मनांना महाराजांच्या चिरंतन प्रेरणेचे अदभूत अंकुर फुलू दे….
आमचे कानच नव्हे तर अंग-प्रत्यंग पुन्हा एकदा चेतून पेटू दे…
हे तुळजा भवानी आदिशक्ती माते…….
हा एक आशीर्वाद आज तू या उभ्या महाराष्ट्राला देच…देच…देच…..

— मिलिंद वेर्लेकर

मिलिंद वेर्लेकर
About मिलिंद वेर्लेकर 2 Articles
मिलिंद वेर्लेकर हे पुणे येथील उद्योजक आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांवरील “राजा शिवछत्रपती या वेबसाईटवर गेली अनेक वर्षे काम करत असून ही साईट गिनिज बुकमध्ये आली आहे.

2 Comments on महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..