नवीन लेखन...

महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन

०४  एप्रिल  २०२० महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिवसा  निमित्त सोलापूर चे बुद्धिबळ पटू पवार बंधूनी घेतलेला आढावा..

संदीप पवार यांनी  आय आय टी मुंबई येथून अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे सध्या ते पुणे येथे कार्यरत आहेत. तर रोहित पवार  यांनी  अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असुन ते  बुद्धिबळ प्रशिक्षक व प्रसारक म्हणून कार्यरत आहेत.


सध्या  १७० हून अधिक देशात  बुद्धिबळ खेळला जातोय. बुद्धिबळ क्षेत्रातील होत असलेली प्रगती तसेच बुद्धिबळाचे विविध  फायदे लक्षात घेता, पालकांची जागरूकता पाहता आनंद वाटतो.

आज ४ एप्रिल म्हणजेच  महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिवस. आपल्या मुलांना  बुद्धिबळ हा खेळ शिकवणे आणि त्या खेळाची गोडी  मुलांमध्ये निर्माण करणे  हि गरज लक्षात घेता “महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन” साजरा केला जातोय.

खरे तर जगात कोरोना व्हायरस ने माजवलेल्या हाहाकारामुळे, अख्खं जगच जणू लॉक डाऊन झालय.  या वर्षीचा बुद्धिबळ प्रेरणा दिन साजरा करण्यात अनेक  बुद्धिबळ पटू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा  सहभाग दिसून  आला.  कारण  सद्या  विविध  स्तरातील व विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकरणी, उद्योगपती, सिनेकलाकर ई.  आपल्या घरामध्ये राहून बुद्धीबळ खेळाचा आनंद घेताना दिसत आहेत. अनेक देश-विदेशातील खेळाडू  इंटरनेटद्वारे बुद्धीबळाच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत तर काही प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना  इंटरनेटद्वारे बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्यात देखील व्यस्त आहेत.

बुद्धिबळ हा घरी बसून खेळता येण्याजोगा बैठा खेळ. बुद्धिबळाने  खेळाडूंना एके जागी स्थिर व एकाग्र करण्याची ताकद जणू काही सिद्ध केली आहे. सद्य परिस्थितीमधे तीच ताकद अत्यावश्यक वाटते.

बुद्धिबळ हा एक व्यायाम आहे- बौद्धिक तसेच मानसिकसुद्धा.  आजच्या या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात शरीर आणि बुद्धीसोबतच मानसिक आरोग्य तेवढ्याच महत्वाचं आहे. थोडं अधिकच म्हणलं तरी चालेल.  खेळातून मिळणारी मनाची शांती तशी स्पष्टपणे दिसून येत नसली तरी ती निश्चित मिळत असते. ती इतकी कि काही संशोधकांच्या मते त्याची तुलना ध्यान करताना मिळणाऱ्या शांतीसोबत करता येते.

खेळ-मानसशास्त्रज्ञ डॉ. मार्क नेस्टी ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेचा संदर्भ घेऊन म्हणतात कि अ‍ॅथलेट आयुष्यात एखादी स्पर्धा जिंकण्यापलीकडे खेळाकडे सहभाग घेण्याची संधी आणि वैयक्तिक समाधान म्हणून पाहतो. खेळ आपल्याला जिंकण्या-हरण्या पलीकडे एका वेगळ्याच सुखाकडे घेऊन जातो. स्वामी विवेकानंद म्हणतात- प्रार्थनेपेक्षा खेळ तुम्हाला देवाच्या जास्त जवळ घेऊन जाऊ शकतो. कारण प्रार्थनेमध्ये तुमचा संपूर्ण सहभाग असेलच असे नाही परंतु खेळात तो असतोच.

वरील संदर्भ लक्ष्यात  घेता येथे नमूद करू वाटते की व्यक्तिमत्व विकासामध्ये बुद्धिबळाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामुळेच व्यक्तिमत्व विकास करण्याकरिता  बुद्धिबळ हा  खेळ आत्मसात करावा, जोपासावा, व्यासंग धरावा व  त्याचे अनुसरण  करावे.

तरी  येथे  पुनः नमूद करू वाटते कि सध्या बुद्धिबळप्रेमी  आपआपल्या घरी राहून आपल्या कुटुबीयांसोबत, इंटरनेटवर बुद्धिबळ खेळत जणू  प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत आहेत. हे चित्र मनाला एक वेगळ्याच प्रकारचा  दिलासा देते. त्यामुळे खरे तर आजच्या या घडीला बुद्धिबळ  हा खेळ  खेळाडूंना  घरी राहण्याची प्रेरणा देत आहे  असे  म्हणणे वावगे ठरणार नाही.

— रोहित मारुती पवार (आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त बुद्धिबळ पटू व बुद्धिबळ प्रशिक्षक )

संदीप मारुती पवार (  राष्ट्रीय बुद्धिबळ पटू व  आंतरराष्ट्रीय लेखक )

(संदीप पवार यांनी  आय आय टी मुंबई येथून अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे सध्या ते पुणे येथे कार्यरत आहेत. तर रोहित पवार  यांनी  अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असुन ते  बुद्धिबळ प्रशिक्षक व प्रसारक म्हणून कार्यरत आहेत.)

लेखकाचे नाव :
रोहित मारुती पवार, संदीप मारुती पवार
लेखकाचा ई-मेल :
rmastermaster@gmail.com
Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..