२०१६ पासून ४ एप्रिलला मंदार वेलणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जन्म दिना दिवशी बुद्धिबळ प्रेरणा दिवस मकरंद वेलणकर यांच्या पुढाकारातून करण्यात सुरु आला.
आपल्या मुलांना बुद्धिबळ हा खेळ शिकवणे आणि त्या खेळाची गोडी मुलांमध्ये निर्माण करणे हि गरज लक्षात घेता “महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन” साजरा केला जातो.
सध्या १७० हून अधिक देशात बुद्धिबळ खेळला जातोय. बुद्धिबळ क्षेत्रातील होत असलेली प्रगती तसेच बुद्धिबळाचे विविध फायदे लक्षात घेता, पालकांची जागरूकता पाहता आनंद वाटतो.
बुद्धिबळ हा घरी बसून खेळता येण्याजोगा बैठा खेळ. बुद्धिबळाने खेळाडूंना एके जागी स्थिर व एकाग्र करण्याची ताकद जणू काही सिद्ध केली आहे. सद्य परिस्थितीमधे तीच ताकद अत्यावश्यक वाटते.
बुद्धिबळ हा एक व्यायाम आहे- बौद्धिक तसेच मानसिकसुद्धा. आजच्या या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात शरीर आणि बुद्धीसोबतच मानसिक आरोग्य तेवढ्याच महत्वाचं आहे. थोडं अधिकच म्हणलं तरी चालेल. खेळातून मिळणारी मनाची शांती तशी स्पष्टपणे दिसून येत नसली तरी ती निश्चित मिळत असते. ती इतकी कि काही संशोधकांच्या मते त्याची तुलना ध्यान करताना मिळणाऱ्या शांतीसोबत करता येते.
खेळ-मानसशास्त्रज्ञ डॉ. मार्क नेस्टी ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेचा संदर्भ घेऊन म्हणतात कि ॲथलेट आयुष्यात एखादी स्पर्धा जिंकण्यापलीकडे खेळाकडे सहभाग घेण्याची संधी आणि वैयक्तिक समाधान म्हणून पाहतो. खेळ आपल्याला जिंकण्या-हरण्या पलीकडे एका वेगळ्याच सुखाकडे घेऊन जातो. स्वामी विवेकानंद म्हणतात- प्रार्थनेपेक्षा खेळ तुम्हाला देवाच्या जास्त जवळ घेऊन जाऊ शकतो. कारण प्रार्थनेमध्ये तुमचा संपूर्ण सहभाग असेलच असे नाही परंतु खेळात तो असतोच.
वरील संदर्भ लक्षात घेता येथे नमूद करू वाटते की व्यक्तिमत्व विकासामध्ये बुद्धिबळाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामुळेच व्यक्तिमत्व विकास करण्याकरिता बुद्धिबळ हा खेळ आत्मसात करावा, जोपासावा, व्यासंग धरावा व त्याचे अनुसरण करावे.
या वर्षी महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मा. श्री. विवेक भागवत (पिंपरी चिंचवड) यांना महाराष्ट्राचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. तीस वर्षाहून अधिक काळ बुद्धिबळ क्षेत्रात कार्यरत असणारे सर राष्ट्रीय पंच आहेत तसेच पिंपरी चिंचवड महानगर चेस असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. रोहित/संदीप पवार / इंटरनेट
पुणे.
Leave a Reply