महाराष्ट्राची हास्य जत्राचे लाडके आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते हेमंत पाटील यांचा जन्म दि. २५ फेब्रुवारी रोजी झाला..
खान्देशच्या रंगभूमीत अनेक कलावंत होऊन गेले. सध्या लेवा बोली भाषेत अभिनयाचे कार्य सुरू आहे. जळगावच्या नाट्यक्षेत्रातील कलावंत हेमंत पाटील हा राज्यात गाजतोय. रंगभूमी वरील उगवता तारा प्रख्यात हास्यजत्रा चे निर्माता आणि लेखक दिग्दर्शक सचिन ओके आणि गुरु सचिन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पाटील यांचे अविरत कार्य सुरू आहे. यामुळे खान्देशातील कलावंताना बहुमान वाटावा अशी ओळख नाट्यकलावंत हेमंत पाटील यांनी तयार केली आहे.
जळगाव शहरातील केसीई सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयात एन.सी.सी.कॅडेट असतांना एक नाटक पाहण्याच्या निमित्ताने नाट्यक्षेत्रात प्रवेश झाला.मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षीत होत नाट्यशास्त्रात पदवी व कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. महाविद्यालयीन जीवनातच मूळजी जेठा महाविद्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्यस्पर्धा व अनेक राज्यस्तरावरील एकांकिका स्पर्धा गाजवत अनेक पारितोषिके पटकावलीत. गेल्या पंधरा वीस वर्षापासून हेमंत पाटील हे राज्यातील नाट्यक्षेत्रात सक्रिय आहे.
जळगाव येथील के सी ई सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालयात गेल्या सात वर्षापासून प्राध्यापक म्हणून तसेच नाट्यशास्त्र विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. नाट्यशास्त्र विषयात जळगावच्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पदवी आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर येथे पदविका घेतली तसेच फिल्म अंड टेलिव्हिजनचा दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.
आज पर्यंत हौशी रंगभूमीवर २३ नाटके, वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये २१ एकांकिका आणि व्यवसायिक नाटक केले आहे. यामध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक कृती कार्य संचालनालय आयोजित मराठी आणि हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत सहा रौप्य पदक आणि वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धेत सात वेळा वाचिक अभिनयातील पारितोषिक प्राप्त करणारा खान्देशातील एकमेव कलाकार म्हणजे हेमंत पाटील होय. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात आपल्या खान्देशातील लेवा पाटील बोली भाषेचा वापर करून स्क्रिट सध्या हेमंत करीत आहे. या आधी हेमंत पाटील यांनी झी टीव्हीवरील चला हवा येऊ द्या.. होऊ दे .. व्हायरल यामध्ये महाराष्ट्रातून निवड होऊन लेवा बोली भाषेतून विडंबन साजरीकरण केले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्यानंतरही रंगभूमीशी व आपल्या शहराशी असलेली नाळ कायम ठेवत मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत राहून जळगावातील नवीन कलावंतांची पिढी घडवत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply