सुगंधित चंदन वृक्ष
सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय वृक्ष असून भारत, चीन, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटांमध्ये याची लागवड करण्यात आली आहे. भारतात, विशेषत: कर्नाटकात आणि तमिळनाडूत कोरडया भागात समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीपर्यंत चंदन मोठया प्रमाणात आढळतो. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व ओडिशा या राज्यांमध्येही हा लागवडीखाली आहे; मात्र त्याचे लाकूड कमी प्रतीचे असते. भारतात चंदनाची सँटॅलम आल्बम ही जाती विपुल प्रमाणात आढळते.
चंदन (सँटॅलम आल्बम):
चंदन हा वृक्ष सदापर्णी असून ४ ते १५ मी. उंच वाढतो. फांदया बारीक व लोंबत्या असतात. साल लाल किंवा गडद राखाडी किंवा काळी व खरखरीत असून जुन्या झाडाच्या सालीवर उभ्या भेगा पडलेल्या दिसतात. पाने संयुक्त, अंडाकार, पातळ व समोरासमोर असतात. फुले लहान, गंधहीन व पिवळसर ते जांभळट लाल, पानांच्या बेचक्यात येतात. फळे आठळीयुक्त, गोलसर व गर्द जांभळी असतात. बिया गोलसर किंवा लांबट असतात. चंदनाचे झाड सु. १०० वर्षे जगते.
चंदनाच्या सर्व जाती अर्धोपजीवी आहेत. यांच्या मुळांच्या टोकाशी शोषकांगे असतात. त्यांदवारे ती इतर झाडांच्या (आश्रयी वनस्पती) मुळांच्या ऊतींमधील पोषकद्रव्ये (फॉस्फरस, नायट्रोजन आणि पोटॅशियमसारखी) मिळवितात. मात्र, त्यामुळे आश्रयी वनस्पतीला फार नुकसान पोहोचत नाही. चंदनासह इतर सु. ३०० वनस्पती चंदन वृक्षासाठी आश्रयी म्हणून उपयुक्त आहेत.
चंदनाचे लाकूड आणि तेल यांचा फार पूर्वीपासून औषधात वापर होत आला आहे. चंदनाच्या तेलात ९०% सँटॅलॉल असते. त्यामुळे या तेलाला गंध आणि औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत. लाकुड (मध्यकाष्ठ) गर्द पिंगट व सुगंधी असते. बाहेरचा भाग पिवळा असून आतील भाग पांढरा असतो व त्याला वास नसतो. साधारणत: वीस ते साठ वर्षांच्या झाडाच्या ४०‒६० सेंमी. व्यासाच्या खोडात भरपूर तेल असते. ते मिळविण्यासाठी झाड मुळापासून खणून काढतात. मुळांमध्येही तेल असते. चंदनाच्या लाकडाला वाळवी लागत नाही. त्यापासून कोरीव काम केलेल्या वस्तू बनवितात. झाडाची साल व रसकाष्ठ काढून सोटाचे लहान ओंडके करतात..
हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या काहीशा नाजूक, खाली झुकलेल्या असतात.
भारतातील आढळ:
कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो.
याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य (Wild) वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकारमानाची लाकडे आता आढळत नसल्यामुळे फर्निचरांसाठीच्या लाकूडकामासाठी याचा वापर संपला असला, तरीही सुवासिक तैलार्कासाठी याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते.
झाडाचे वर्णन:
चंदनाचा वृक्ष सुमारे १५ ते २० मीटर उंच वाढतो. पाने समोरासमोर, लांबट, पातळ व टोकदार असतात. चंदनाच्या फांद्यांना लहान आणि गंधहीन फुलांचे गुच्छ येतात. चंदनाचे खोड कठीण व तेलयुक्त असते. खोडाचा आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. चंदनाचे झाड जसे वाढत जाते तसे त्यातील सुगंधित तेलाचा अंशही वाढत जातो.
चंदनाची झाडे साधारणपणे २० वर्षांनंतर वाढू लागतात. झाडाची आतील बाजू सुवासिक आणि चमकदार पिवळ्या रंगाची आहे. जुन्या झाडांना (चंदन वृक्ष) साल फुटलेली असते. ४० – ६० वर्षांनंतर, चंदनाच्या झाडाला एक आनंददायी सुगंध येतो. चंदनाच्या झाडाला नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत फळे येतात आणि जून ते सप्टेंबरपर्यंत फुले येतात. चंदन नंतर पूर्णपणे वापरण्यायोग्य बनते. चंदनाच्या झाडाच्या वैशिष्ट्यांपैकी हे आहेत:
• ओरिसामध्ये सर्वोत्तम चंदनाचे उत्पादन होते.
• इंडो-ग्रीक (यवन देश) प्रदेशात उत्पादित केलेल्या चंदनाची गुणवत्ता किरकोळ वाईट आहे.
• पश्चिम उत्तर प्रदेश सारख्या प्रदेशात उत्पादित होणारे चंदन हे सर्वात कमी क्षमतेचे असल्याचे सांगितले जाते.
• सुगंधाच्या दृष्टीने सर्वोत्तम चंदन हे ओरिसाचे आहे.
आगीपासून आणि कीटकांपासून धोका:
चंदनाच्या वृक्षाला आग लगेच लागते. त्यामुळे वणव्यात ही झाडे पटकन पेट घेतात. चंदनाला सर्वात जास्त नुकसानकारक असा ‘कणिश’ (स्पाइक) रोग होतो. या रोगाशिवाय अमरवेलीमुळे झाडाचे नुकसान होते, तर काही चंदनाच्या झाडांचे कीटकांमुळे नुकसान होते.
चंदनाचे पराबलंबित्व:
झाडे जवळजवळ लावली तर नीट वाढत नाहीत असा एक सर्वसाधारण समज आहे. याला अपवाद आहे चंदनाचे झाड. चंदन नेहमी मोठय़ा वृक्षांच्या जवळच जोमाने वाढते. त्याला कारण आहे त्याचे अंशिक परावलंबित्व. चंदन हा अर्धपरोपजीवी वृक्ष समजला जातो. कारण हा वृक्ष स्वतःचे अन्न पूर्णपणे तयार करू शकत नाही. हा वृक्ष दुसऱ्या वनस्पतींच्या मुळांतून आपल्या मुळांच्या साहाय्याने अन्नशोषण करतो.
चंदनाची पाने / चंदन वृक्षाच्या बिया:
चंदनाचे चारोळीसारखी असणारे फळ पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. चंदनाच्या बियांपासून लवकर सुकणारे कोरडे तेल (ड्रॉइंग ऑईल) मिळते. हे तेल इन्सुलेशन टेप व वॉर्निश बनविण्यासाठी वापरले जाते. त्याची पेंड जनावरांचे खाद्य व खत बनविण्यासाठी व अगरबत्तीला लागणारा लगदा म्हणून वापरतात. खोड आणि बियांप्रमाणेच चंदनाच्या मुळांमध्येही तेलाचा अंश असतो. चंदनाच्या तेलात असणाऱ्या सॅटॅलॉल या रसायनामुळे त्याला सुगंध आणि औषधी गुणधर्म प्राप्त होतात.
लाकडाचा भुसा धुपाकरिता, कपडयात व कपाटात वासाकरिता ठेवतात. लाकडापासून मिळविलेले तेल फिकट पिवळसर असते. ते चिकट असून त्याला टिकाऊ गोड वास असल्यामुळे अत्तरे, सुगंधी तेले, सौंदर्यप्रसाधने, साबण इत्यादींसाठी मोठया प्रमाणात वापरतात. चंदनाचे लाकूड व तेल शीतल, ज्वरनाशक, मूत्रल, कफ काढून टाकणारे आहे. भाजलेल्या जागी, ताप आणि डोकेदुखीवर चंदनाचा लेप लावतात.
बियांपासून गर्द लाल तेल निघते. तेल त्वचारोगांवर तसेच लवकर वाळणाऱ्या व्हार्निशासाठी वापरतात. फळात अनेक शर्करा, बाष्पनशील आणि अबाष्पनशील तेले असतात. अबाष्पनशील तेल चिकट असते. ते परम्यावरील औषधात वापरतात.
वयाच्या 40-60 वर्षांनंतर चंदनचे झाड सुगंधित होते. जून ते सप्टेंबर या कालावधीत चंदनच्या झाडाची फुलं आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात फळे. अशा अवस्थेत चंदन पूर्णपणे वापरण्यायोग्य बनते.
चंदनाचे फुलेही तपकिरी रंगाचे असतात चंदनाच्या बिया या कठोर लंबवर्तुळ आणि गोलाकार असतात. चंदन हे सहसा 20 वर्षांनंतरच वाढतात चंदनाच्या झाडाचा असणारा अंतर्गत भाग हा हलका पिवळा आणि सुवासिक असतो. वयाच्या 40 ते 60 वर्षानंतर चंदनाचे झाड अगदी सुगंधित होत असते.
वापर:
चंदन उगाळून याचा लेप शरीराला लावण्याची पद्धत आहे. याचा वापर औषध म्हणूनही करतात. माणसांना व देवाच्या मूर्तीला चंदनाच्या खोडाचा तुकडा उगाळून बनलेले गंध लावतात.
वैष्णव पंथातील लोक या चंदनाला अत्यंत पवित्र मानतात. स्कंद पुराणानुसार भक्त भगवान श्रीकृष्णाला पूजा करतेवेळी गोपी चंदन अर्पण करतात आणि नंतर भक्त त्यांच्या कपाळावर ते लावतात. हा तिलक लावल्याने केलेल्या दानाचं फळं मिळत. तसचं सर्व पाप दूर होतात असं म्हटलं जातं.
आयुर्वेदामध्ये चंदनाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. खासकरून त्वचा विकारासाठी थंड प्रकृतीचं चंदन फायदेशीर ठरतं. आयुर्वेदाप्रमाणाचे हिंदू धर्मात धार्मिक पूजाविधीमध्येही चंदनाला अनन्य साधारण महत्व आहे. पुजा विधीमध्ये चंदनाचा टिळा लावला जातो. तसचं भगवान श्रीहरी विष्णूला चंदन हे अत्यंत प्रिय होतं. यासाठीच चंदनाचा तिलक लावला जातो. तसचं जप करण्यासाठी चंदनाची जप माळ वापरली जाते.
अनेक मंदिरांमध्येही काही खास मूहूर्तांना देवतांची यथासांग पूजा करण्यापूर्वी त्यांना चंदनाचा लेप लावून त्यांना स्थान घातलं जातं. पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या चंदनाचे अनेक प्रकार आहेत. यात लाल चंदन, पिवळं चंदन, सफेद चंदन, गोपी चंदन आणि हरि चंदन असे प्रकार आहेत. या प्रत्येत चंदाने वेगवेगळे फायदे आहेत. याचा संबध तुमच्या श्रद्धेसोबतच तुमच्या मनोकामनेशी देखील आहे.
लाल चंदनाचं महत्व
• ज्योतिषशास्त्रानुसार शक्तीची साधना म्हणजेच देवीच्या भक्तीसाठी चंदनाच्या लाकडाचा खास उपयोग होतो. लाल चंदनाच्या जपमाळेने दुर्गादेवीच्या मंत्राचा जप केल्यास दुर्गादेवी प्रसन्न होवून तुमची इच्छा पूर्ण करते. तसचं यामुळे मंगळ दोष दूर होण्यासही मदत होते.
• सुर्याला अर्घ अर्पण करण्यासाठी लाला चंदनाचा वापर केल्यास तुमच्या समस्या दूर होवू शकतात. यासाठी रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन, लाल फुलं आणि तांदूळ टाकून, प्रसन्न मनाने सूर्यमंत्राचा जप करून सूर्याला अर्घ्य अर्पण करावं.
• या अर्घ्यदानाने सुर्यदेवता प्रसन्न होवून चांगलं आरोग्य, दिर्घायुष्य, धन-धान्य, संपत्ती, वैभव, किर्ती तसचं पूत्र, मित्र आणि सौभाग्य प्रदान करतात.
गोपी चंदनाचे फायदे
• गोपी चंदन हे द्वारकेतील गोपी तलावातील मातीपासून तयार करण्यात येते. वैष्णव पंथातील लोक या चंदनाला अत्यंत पवित्र मानतात.
• स्कंद पुराणानुसार भक्त भगवान श्रीकृष्णाला पूजा करतेवेळी गोपी चंदन अर्पण करतात आणि नंतर भक्त त्यांच्या कपाळावर ते लावतात.
• हा तिलक लावल्याने केलेल्या दानाचं फळं मिळत. तसचं सर्व पाप दूर होतात असं म्हटलं जातं.
• आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी देखील ज्योतिष्यशास्त्रात गोपी चंदनाला महत्वाचं स्थान आहे.
हरि चंदनाचे फायदे
• हिंदू धर्मातील शास्त्रांनुसार भगवान विष्णू आणि त्याच्या इतर अवतारांना हरि चंदनाचा टिळा लावून तो आपल्या कपाळावरही लावावा. यामुळे मन आणि मेंदू दोन्ही शांत होण्यास मदत होते.
• हरि तिलक लावल्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होतं.तसचं समाजात मान सन्मान वाढतो.
• हरि तिलकामुळे विष्णूची कृपादृष्टी सदैव राहते आणि आजार आणि दु:ख दूर होतात.
• हरि तिलक हे तुळशीच्या फांद्या, हळद आणि गंगाजलापासून तयार केलं जातं.
चंदनाचे इतर अध्यात्मिक फायदे
हिंदू धर्मामध्ये चंदनाच्या तिलकाला अध्यात्म आणि भक्तीचं प्रतिक मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार चंदनाचा टिळा लावल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होतं. चंदनाच्या तिळा लावल्याने शारिरीक आणि अध्यात्मिक लाभ होतात. यामुळे मानसिक ताण कमी होवून परमेश्वराशी एकरूप होण्यास मदत होते.
चंदनाचे काय फायदे आहेत?
मन शांत करण्यासाठी आणि चिंता कमी करण्यासाठी, वृद्धत्वाची चिन्हे आणि त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी चंदनाचा वापर हजारो वर्षांपासून केला जात आहे. याचे अध्यात्मिक महत्त्व आहे आणि असे म्हटले जाते की ते भक्तांना देवाच्या जवळ आणते, आणि सुगंधांमध्ये फिक्सेटिव्ह म्हणून कार्य करते, ते त्वचेवर जास्त काळ टिकेल याची खात्री करते.
“कपाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद”, लहानपणी या आरतीपासून आपल्याला लहानपणीच कपाळी गंध किंवा चंदनाचा टिळा असावा असे संस्कार दिले जातात. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपण हा चंदनाचा टिळा मागे सोडला असाल तरीही चंदन भाळी असणं याला शास्त्रात खूप वरच स्थान दिलं गेलं आहे. आपल्या देवतांच्या कपाळीही चंदनाचा टिळा असलेला पाहायला मिळतो. प्रत्येक सण समारंभाला आपल्याकडे कपाळाला चंदन लावण्याची प्रथा आहे.देवळातही पुजारी प्रथम कपाळी टिळा लावतात. मग या चंदनाचा टिळा लावण्याचे काय फायदे आहेत?.
मुळात चंदनाचा स्थायी भाव हा थंड आहे. अशात आपल्या दोन भुवयांच्या मधोमध चंदन लावलं आणि मग आपल्या कार्यात व्यक्त झाल्यास ऑफिसमध्ये मन शांत राहातं आणि चित्त एकाग्र होतं. योग साधनेतही चंदनाच्या टिळ्याला महत्व दिलं आहे.योग साधनेमध्ये मस्तकाच्या समोरून ब्रह्मरंध्राकडे जाणारी सुशुम्रा नाडी शांत आणि बलवान असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. चंदनाचा टिळा लावल्याने वरील मार्ग मोकळा होण्यास मदत होते.
काय आहेत चंदनाचा टिळा लावण्याचे सर्वसामान्य फायदे ?
चंदनाने मन शांत होते. मन शांत झाल्याने व्यक्ती शांततेने आणि संयमाने समस्यांना तोंड देऊ शकते. शांत मन वाईट गोष्टींना थारा देत नाहीत. मानसिक एकाग्रतेसोबतच चंदनाचा टिळा इच्छाशक्तीला बळ देतो. निद्रानाश, तणाव, डोकेदुखी आणि ताप यांसारख्या आजारांवर चंदनाचा टिळा अत्यंत उपयुक्त मानला जातो. चंदनामुळे माणसात सकारात्मक शक्तीचा संचार होतो अशी धार्मिक धारणा आहे.
चंदनाचा टिळा लावण्याची योग्य पद्धत कोणती?
टिळा किंवा तिलक ही धार्मिक संस्कृतीमध्ये अशी एक खूण आहे जी सामान्यत: कपाळावर लावली जाते, जिथे शरीरातील सर्वात महत्त्वाचे असलेले आज्ञा चक्र असते. टिळा कधीकधी शरीराच्या इतर भागांवर जसे की मान, हात, छाती आणि हातावर लावला जातो. प्रादेशिक रीतिरिवाजांनुसार टिळा दररोज किंवा विधी तसेच विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक प्रसंगी लावला जातो
उर्ध्वपुंडू आणि त्रिपुंड या दोन्ही ठिकाणी चंदनाचा टिळा लावता येतो. कपाळावर लावलेले भस्माला त्रिपुंड असे म्हणतात. शैव म्हणजे शिवाचे ( महादेव ) भक्त हे लावतात. उर्ध्व पुंड्र (संस्कृत: ऊर्ध्वपुण्ड्र, हा एक तिलक आहे जो वैष्णवांनी विष्णूशी असलेल्या त्यांच्या संबंधाचे सूचक म्हणून परिधान केला आहे. हे सामान्यतः कपाळावर घातले जाते, परंतु शरीराच्या इतर भागांवर देखील घातले जाऊ शकते जसे की खांद्यावर. याशिवाय भुवयांच्या मध्ये चंदनाचा टिळा लावणे देखील खूप फायदेशीर आहे असं सांगितले जातं.
चंदनाचे प्रकार:
चंदन विविध प्रकारांमध्ये येते, त्यापैकी काही येथे सूचीबद्ध आहेत.
भारतातील चंदन:
१३-२० फूट उंचीपर्यंत वाढणारे आणि विविध प्रकारचे वैद्यकीय फायदे असलेले हे झाड १३-२० फूट उंचीपर्यंत पोहोचू शकते. चंदनाचे आवश्यक तेल अत्यंत महाग आहे. हा देखील भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचे आयुष्य १०० वर्षांपर्यंत आहे. दुसरीकडे, हे झाड संरक्षित आहे.
लाल चंदन:
रक्त चंदन हे त्याचे दुसरे नाव. हे दक्षिण भारतातील पूर्व घाटांमध्ये आढळू शकते. हे झाड लाकडाच्या सुंदर लाल रंगासाठी प्रसिद्ध आहे. या झाडाच्या भव्य लाकडाला मात्र सुगंध नाही. ही एक लहान वनस्पती आहे जी १०-२५ फूट उंचीवर पोहोचू शकते. लाल चंदनामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
पांढरा चंदन:
हे एक सदाहरित वृक्ष आहे ज्यामध्ये अनेक उपचारात्मक गुणधर्म आहेत. चंदन, पांढरे आणि पिवळे दोन्ही एकाच झाडापासून येते. पांढऱ्या चंदनाच्या झाडाचा वापर आवश्यक तेले, साबण, सुगंध आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी केला जातो.
मलयगिरीचे चंदन:
हे चंदन सर्वात चांगले, मऊसर असते. ह्याचा देवादिकांना प्रभात समयी लेप लावून पूजा करतात. ह्याचा सुंगध पण चॅन असतो. मराठी साहित्यात याचा बरेच ठिकाणी उल्लेख आहे. कुमार गंधर्व व वाणी जयराम यांनी गायिलेली खालील भूपाळी फारचं प्रसिद्ध आहे.
१. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता , उठी उठी गोपाळा
२. अतिपरिचयात अवज्ञा सन्तत गमनात अनादरः भवति!
मलये भिल्ली पुरन्ध्री चन्दन तरुन इन्धनम् कुरुते!
खरंच कोणत्याही गोष्टीला हि सीमा हवीच! वरील सुभाषित हे त्या पैकी एक, याची मला बऱ्याचदा प्रचिती आलेली आहे .. कोणत्याही व्यक्तीचा अति परिचय झाला कि त्या व्यक्तीचे तेवढे महत्व राहत नाही.. बघा ना.. ती भिल्ल स्त्री चंदनासारख्या किमती झाडाचे लाकूड रोज इंधनासाठी वापरते !!
हे दक्षिण भारतातील म्हैसूर, कुर्ग, हैदराबाद, निलगिरी आणि पश्चिम घाट येथे आढळू शकते. मलयगिरी चंदन, ज्याला श्रीखंड म्हणूनही ओळखले जाते, हे सर्व चंदन प्रकारांपैकी सर्वात गोड आणि सर्वात अस्सल आहे. या झाडांच्या लाकडापासून सुंदर पेटी, पोस्ट्स आणि पेडेस्टल्स बनवल्या जातात.
चंदनामध्ये उपचारात्मक गुणधर्म:
चंदनामध्ये अँटीपायरेटिक (ताप कमी करणारे), बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीस्कॅबेटिक आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ यासह उपचारात्मक गुणधर्मांची विस्तृत श्रेणी आहे. हे ब्राँकायटिस, सिस्टिटिस (मूत्राशय जळजळ), डिस्युरिया (मूत्रात जळजळ) आणि मूत्रमार्गाच्या संसर्गास देखील मदत करू शकते. दुसरीकडे, लाल चंदनामध्ये दाहक-विरोधी, अँटिऑक्सिडेंट आणि वेदना कमी करणारे प्रभाव असतात. चंदनाच्या अशा अनेक गुणांबद्दल आपण लेखात नंतर जाणून घेऊ.
चंदनाचे फायदे :
या लेखात आपण चंदनाच्या आरोग्यदायी फायद्यांची चर्चा करणार आहोत. चंदन तुमच्या आरोग्यासाठी कसे चांगले असू शकते ते जाणून घ्या. तसेच, या लेखात चर्चा केलेल्या कोणत्याही आजारांवर चंदन हा वैद्यकीय उपचार नाही याचीही वाचकांनी जाणीव ठेवावी. हे उपरोक्त शारीरिक समस्यांच्या प्रतिबंधात तसेच त्यांची लक्षणे काही प्रमाणात कमी करण्यात मदत करू शकते. जर स्थिती लक्षणीय असेल तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.
विरोधी दाहक क्रियाकलाप:
आपण निबंधाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे चंदनाचे अनेक प्रकार आहेत. लाल चंदन हे त्यापैकी एक आहे आणि त्यात दाहक-विरोधी प्रभाव आहे. एनसीबीआयच्या वेबसाइटवर (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) प्रकाशित केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.
अभ्यासानुसार चंदनातील अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉलिक पदार्थांमुळे असू शकतात. त्याशिवाय, चंदनाची पेस्ट आयुर्वेदात सूज आणि डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. अशा स्थितीत सौम्य जळजळीशी संबंधित अडचणींसाठी चंदन उपयुक्त ठरू शकते.
अँटिऑक्सिडंट कार्ये:
मुक्त रॅडिकल्सचा एखाद्याच्या आरोग्यावर लक्षणीय नकारात्मक प्रभाव पडतो. परिणामी, यामुळे हृदयविकार, कर्करोग आणि इतर अनेक प्रकारचे धोकादायक आजार होऊ शकतात. अशा स्थितीत, अँटिऑक्सिडंट्स शरीराच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवू शकतात आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यासाठी किंवा कमी करण्यात मदत करतात.
जर आपण चंदनाबद्दल बोलत आहोत, तर त्यात अँटिऑक्सिडेंट क्षमता असते, ज्याचा शोध एका अभ्यासात आढळून आला आहे. या अभ्यासात डीपीपीएच रॅडिकल नावाच्या रेडिकलवर चंदनाची अँटिऑक्सिडंट क्रिया आढळून आली. याव्यतिरिक्त, चंदनाची अँटिऑक्सिडंट क्षमता FRAP परख (फेरिक रिड्युसिंग अॅबिलिटी ऑफ प्लाझ्मा – अँटीऑक्सिडंट परख चाचणी) वापरून दाखवण्यात आली आहे.
बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ:
चंदनाचा वापर किरकोळ जखमा आणि जखमांवर उपचार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. खरं तर, चंदनामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतात जे जखमांवर मदत करू शकतात. तथापि, या विषयावर अस्सल वैज्ञानिक अभ्यासाची कमतरता आहे. या प्रकरणात, परिणाम देखील नुकसान किंवा जखमेच्या स्थितीद्वारे निर्धारित केले जाते. जखम खूप जुनी किंवा खोल असेल तर वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.
कर्करोग टाळण्यासाठी:
कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे यात शंका नाही. अशा वेळी चंदन हे टाळण्यास मदत करू शकते. एनसीबीआयच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार चंदनाच्या तेलामध्ये कर्करोगविरोधी क्षमता असते. याशिवाय, चंदनाच्या झाडापासून वेगळे केलेले रासायनिक अल्फा-सँटालोल (-सँटालोल) कर्करोगविरोधी आणि केमोप्रीव्हेंटिव्ह प्रभाव असल्याचे दिसून आले आहे.
त्याशिवाय, ते गैर-विषारी आहे, ते वापरण्यास सुरक्षित करते. हे देखील लक्षात ठेवा की ते काही प्रमाणात कर्करोग टाळण्यास मदत करू शकते, परंतु ते कोणत्याही प्रकारे कर्करोगाचा उपचार नाही. एखाद्या व्यक्तीला कर्करोगाने ग्रस्त असल्यास वैद्यकीय उपचार घेणे महत्वाचे आहे.
चंदनाचे अँटी-एलर्जी गुणधर्म:
चंदन दिसल्यास त्वचेच्या ऍलर्जीवर देखील मदत करू शकते. हे सोरायसिस (त्वचेच्या स्थितीचा एक प्रकार) आणि एटोपिक त्वचारोग (लाल, खाजून पुरळ द्वारे वैशिष्ट्यीकृत स्थिती) मध्ये देखील मदत करू शकते. हे शक्य आहे की त्याच्या अल्फा-सँटालोल घटकाची दाहक-विरोधी क्षमता दोषी आहे. त्वचेला आराम देण्यासाठी चंदनाचा वापर केला जाऊ शकतो, परंतु यावर अधिक संशोधन आवश्यक आहे.
चंदन पोटासाठी चांगले:
चंदन पोटासाठी चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे. ही माहिती अनेकांना माहीत असली तरी, एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. चंदनाच्या झाडाचे अल्सर विरोधी प्रभाव सर्वज्ञात आहेत. हे असू शकते कारण त्यात हायड्रोअल्कोहोलिक अर्क आहे. हे ग्रीक औषधांमध्ये पोटाच्या अल्सरवर उपचार करण्यासाठी देखील वापरले जाते.
तापासाठी चंदन:
एखाद्याला मध्यम ताप असल्यास चंदनाचे फायदे देखील स्पष्ट होऊ शकतात. खरं तर, चंदनामध्ये अँटीपायरेटिक प्रभाव असतो. ताप कमी करणारे आणि अँटीपायरेटिक प्रभाव आहेत. चंदनाच्या या वैशिष्ट्यामुळे अशा स्थितीत ताप कमी होण्यास मदत होते.
पुरळ आणि चंदन:
त्वचेचे स्वरूप सुधारण्यासाठी सौंदर्यप्रसाधनांमध्ये चंदनाचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. जेव्हा आपण मुरुमांबद्दल व्यवहार करतो तेव्हा आपण जळजळ होण्याच्या समस्येचा देखील विचार केला पाहिजे. चंदन, ज्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, याचा वापर या प्रकरणात केवळ थंडपणा देण्यासाठीच नाही तर सूज दूर करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
त्यात प्रतिजैविक गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे ते मुरुम आणि मुरुमांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरते. वैज्ञानिक पुरावे नसतानाही, ते आराम देण्यासाठी घरगुती उपचार म्हणून वापरले जाऊ शकते. त्याशिवाय चंदनाच्या तेलाच्या वापराने चिंता दूर होण्यास मदत होते.
चंदनाचे उपयोग:
खालील विभागांमध्ये चंदनाचा विविध प्रकारे वापर कसा करायचा ते शोधा.
• तुमच्या त्वचेला निरोगी चमक देण्यासाठी तुम्ही चंदनाचा फेस पॅक वापरू शकता.
• चंदनाची पेस्ट वापरून जखमेवर किंवा दुखापतीवर उपचार करता येतात.
• अरोमाथेरपीसाठी चंदनाचे तेल वापरता येते.
• शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी पाण्यात चंदनाची पेस्ट किंवा चंदनाचे तेल टाकून स्नान करा.
• बाजारात चंदन साबणाचे अनेक प्रकार आहेत, त्यामुळे तुम्ही चंदन साबण देखील वापरू शकता.
• चंदन पावडर दुधात मिसळून सेवन करता येते. तथापि, लक्षात ठेवा की आपण या प्रकरणात वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे.
चंदनाचे नुकसान
चंदनाच्या धोक्यांचा विचार केल्यास, कोणतेही विश्वसनीय वैज्ञानिक पुरावे नाहीत. सावधगिरी म्हणून आम्ही खाली दिलेल्या काही तोट्यांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
• चंदनामुळे ऍलर्जी असलेल्या लोकांमध्ये डंक येणे, जळजळ होणे आणि पुरळ उठू शकते.
• ते तोंडाने घेतल्याने जठरासंबंधी विविध समस्या उद्भवू शकतात. तथापि, या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.
• गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी चंदनाचे सेवन करू नये.
• गरोदर किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी चंदनाची शिफारस केलेली नाही. तथापि, पॅच चाचणीनंतर, ते स्थानिकरित्या वापरले जाऊ शकते.
निष्कर्ष
चंदनाची वनस्पती खूप उपयुक्त आणि फायदेशीर आहे. धार्मिक, वैद्यकीय आणि इतर कारणांसाठी सेवा देण्याबरोबरच, ते आर्थिकदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे. चंदन ही एक वन्य वनस्पती आहे जी पाण्याशिवाय जंगलात उगवते आणि खताची झाडे चंदनाशिवाय वाढू शकतात, अशा प्रकारे शेतकर्यांना त्याच्या लागवडीसाठी जास्त पैसे किंवा मेहनत घेण्याची गरज नाही. खतामध्ये औषध असू शकते.
आधुनिक युगात किसन भाई चंदन पिकवून त्यातून हजारो रुपये कमवू शकतात; १५ वर्षांच्या लागवडीनंतर बऱ्यापैकी उत्पन्न मिळू शकते असा त्यांचा दावा आहे. शिवाय, जागतिक बाजारपेठेत भारतीय चंदनाला मोठी मागणी आहे, ज्यामुळे आपल्या देशात चंदनाचे उत्पादन फायदेशीर ठरते.
जरी चंदनाचे असंख्य प्रकार आहेत, त्यापैकी फक्त दोन, पांढरे चंदन आणि लाल चंदन, बहुतेक वेळा घेतले जातात. पांढरे चंदन त्याच्या औषधी आणि सौंदर्यात्मक गुणधर्मांमुळे खूप महाग आहे.
इतर प्रकारच्या लाकडापेक्षा चंदनाचे लाकूड अधिक मौल्यवान आहे हे लक्षात घेता, चंदनाच्या कापणीसाठी जमिनीच्या जवळच्या खोडाचा भाग न ठेवता संपूर्ण झाड तोडले जाते. हे स्टंप आणि मुळापासून लाकडाची प्रक्रिया करण्यास सक्षम करते, ज्यामध्ये चंदनाचे तेल लक्षणीय प्रमाणात असते.
चंदन आणी उतिसंवर्धन –
मुंबईच्या भाभा ऍटोमिक संशोधन सेंटर मद्धे उतिसंवर्धन विभागाने चंदनाच्या उतिसंवर्धनाची पद्धहत शोधली आहे.
चंदन वृक्ष व तस्करी
आजकाल आपण जवळपास रोज चंदनाच्या झाडे चोरांनी तोडुन नेली अशा बातम्या वाचत असतो. त्याचे कारण म्हणजे चंदनाची किंमत आजकाल सोळा हजार रुपये किलो आहे. चंदनाची मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे या चोऱ्या होत आहेत. ह्यासाठी एखादी सशस्त्र टोळी वाहनासह कार्यरत असते. दिवस टेहळणी करून हेरून ठेवावयाची व रात्री अर्ध्या तासात चंदनाचे झाड बुंध्यासकट कापून वाहनात टाकून पसार व्हायचे अशी मोडस ऑपरेंडी असते. खाजगी जागेत रक्षक असतात म्हणून शक्यतो सरकारी जमिनीवरील झाडे तोडून नेतात.
ह्यामुळे शेतकरीही आपल्या शेतात चंदनाची लागवड करायला घाबरतात.
तर अशी ही सुगंधित चंदन वृक्षाची माहिती. सर्वाना आवडेल अशी आशा आहे
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी.
मोबा: ९८८१२०४९०४
Sir
Very nice and useful information .
Thanks
चंदना चे झाड अर्धोपजिवी (काही प्रमाणात चंदना ची मुळं, शेजारच्या झाडांच्या मुळातून पोषक अन्न घेत) असतं हे लेख वाचून समजले. चंदना चे अनेक उपयोग लेखकाने समाविष्ट केले असल्याने, लेख संग्रही ठेवण्या योग्य आहे.
Sir,article is very well written, very informative,thank you for the article
छान माहितीपूर्ण लेख.. अर्धपरोपजिवी ही नवीन संकल्पना कळाली.
धन्यवाद..