नवीन लेखन...

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १ – आवळा

आवळ्याची आठवण काढली कि तोंडाला पाणी न सुटणारी व्यक्ती विरळाच. अशा ह्या आवळ्याची माहिती करून घेऊ.

आवळा हा एक फळ देणारा सदाहरित वृक्ष आहे. याचे शास्त्रीय नाव Phyllanthus emblica आहे. हा २० फूट ते २५ फुटापर्यंत उंच वाढतो. महाराष्ट्रातही हा नैसर्गिक स्वरूपात बहुतांश ठिकाणी व सहयाद्रीच्या कडेकपारीत आढळतो.

संस्कृतमध्ये आवळ्याला अमृता, अमृतफल, आमलकी, पंचरसा इत्यादी नावे आहेत. झाडाची साल राखाडी रंगाची, पाने चिंचेच्या पानांसारखी, परंतु थोडी मोठी, फुले छोटी व पिवळ्या रंगाची असतात. फुलांच्या जागी गोल, चमकणारे,हिरवट रंगाचे व पिकल्यावर लाल रंगाचे होणारे आवळ्याचे फळ लागते. भारतामद्धे वाराणशीचा आवळा सर्वोत्कृष्ट समजला जातो.

भारताचे हवामान आवळ्याच्या शेतीसाठी सर्वात उपयुक्त मानले जाते. परंतु महाराष्ट्रामद्धे त्याची शेतीच्या दृष्टीने लागवड खूप कमी आहे. धार्मिक कार्यामध्ये तुळशीच्या लग्नामध्ये आवळ्याची उपस्थिती अनिवार्य असते.

गुणधर्म : आवळ्याचे औषधी उपयोग :

आवळा फळे

१. याचे तेल केशवाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. केशकांती, आवळा तेल वगैरे बरीच तेले बाजारात आहेत.
२. पित्तशामक आहे. मोरावळा सकाळी अनाशेपोटी घेतल्यास पित्त कमी होते.
३. आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुस्थितीत राहते.
४. आवळ्याच्या सेवनाने स्मरण शक्ती वाढते.
५. आवळ्याचा महत्वाचा गुणधर्म म्हणजे तो वीर्यवर्धक, शक्तिवर्धक, रसवर्धक असल्यामुळे चरक संहितेच्या च्यवनप्राश प्रक्रिये मध्ये, तो महत्वाचा घटक आहे.
६. आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कॅंडी, आवळा लोणचे, आवळा मोरंबा, आवळेपाक, असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात. आवळा जुना झाला, पिकला, भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत हे त्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. यात पांच रस आहेत (मधुर, अम्ल, तिखट, कडू, आणि तुरट). कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात.
७. महर्षी चरकांच्या मतानुसार वाढत्या वयामुळे येणाऱ्या शारीरिक अवनतीला थांबवणाऱ्या अवस्था स्थापक द्रव्यांमध्ये आवळा सगळ्यात मुख्य आहे

रासायनिक संरचना:

आवळ्याच्या १०० ग्राम रसात ९२१ मिलिग्रॅम आणि गरात ७२० मिलिग्रॅम. सी व्हिटॅमिन असते. व हे व्हिटॅमिन सी बाकी फळांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. हे रोगप्रतिबंधक शक्ती वाढवते. ह्या फळास विटॅमीन सी चे भांडार समजले जाते. त्यामुळेच हे फळ बाकींच्या फळांपेक्षा कोविड १९ च्या महामारीत भाव खाऊन आहे.

यात बाकीची खनिज तत्वे पण आहेत पण ती अत्यंत कमी प्रमाणात आहेत.

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..