नवीन लेखन...

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ३ – पेरू

तसे पाहायला गेले तर पेरूंशी आपली मैत्री लहानपणा पासूनची आहे. मग ती पोपट व पेरूची फोड असो किंवा दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत बालपणी शाळेत मित्राबरोबर खाल्लेल्या पेरूच्या आठवणी असोत. पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे. काहींना कडक तर काहींना अगदी पिकलेले पेरू खायला आवडतात.
अशा या पेरूबद्दल आज आपण माहिती करून घेऊया.

याचे शास्त्रीय नांव Pisidium guava हे आहे.

पेरू हा सदाहरित वृक्ष मिर्टेसी कुलातील आहे. लवंग, निलगिरी व मिरी या वनस्पतीदेखील या कुलात समाविष्ट आहेत. पेरू मूळचा मेक्सिकोतील व मध्य अमेरिकेतील असून स्पॅनिश व पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी ईस्ट इंडीज, आशिया व आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशात त्याचा प्रसार केला. भारतात प्रथम हा वृक्ष पोर्तुगीज लोकांनी आणला व रुजवला.

पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते.कच्चा पेरू वरुन हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असते. नंतर गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचे ही खाद्य आहे. इंग्रजी मध्ये पेरूला guava म्हणतात तर हिंदीत अमरुद, जाम या नावाने ओळखले जाते. कच्चा पेरू कडक तर पिकल्यावर मऊ होते.

हा क्वचितच जंगलात (वाइल्ड) आढळतो. ह्याची लागवड करून शेती करतात. महाराष्ट्रात ह्याची शेती अहमदनगर, औरंगाबाद आणि पश्चिमेकडील जिल्ह्यात करतात.

पेरू वृक्ष ६–८ मी. उंच वाढतो. खोडाची साल तांबूस-पांढरट असून गुळगुळीत असते. लहानलहान तुकड्यांमध्ये ती गळून पडते. पाने साधी, समोरासमोर, लंबगोलाकार, फिकट हिरवी, ७–१५ सेंमी. लांब व ३–५ सेंमी. रुंद असतात. पाने वरच्या बाजूने रोमहीन, तर खालच्या बाजूने मृदुरोमी असून देठ आखूड असतो.

फुले मंद सुवासिक व शुभ्र असून ती पानांच्या बेचक्यात एकटीदुकटी किंवा लहान झुबक्याने येतात. फूल उमलताच ४–५ पाकळ्यांचे दलपुंज गळून पडते आणि असंख्य पांढरे पुंकेसर बाहेर दिसायला लागतात. परागण कीटकांमार्फत होते. फलनानंतर ९०–१५० दिवसांत फळ तयार होते. त्याला तीव्र गोड गंध येतो. कच्ची फळे कठीण असून साल हिरवी असते. फळे पिकल्यावर पिवळी होतात. गर रवाळ असून आंबटगोड रसाचा असतो. काही फळांमध्ये गर सफेद असतो, तर काहींमध्ये गुलाबी किंवा फिकट-लाल असतो. गरात अनेक व कठीण कवचांच्या बिया असतात. पेरूच्या बिनबियांच्या जाती म्हणजे सीडलेस जाती निर्माण करण्यात आल्या आहेत. असे म्हटले आहे की झाडे आकर्षक आहेत आणि मधुर, गोड फळे तयार करतात जी उत्कृष्ट ताजे किंवा मिष्टान्न आहेत. पेरू वृक्षाची पुरेशी माहिती दिल्यास ग्रीनहाऊस मध्ये ह्या झाडांची लागवड करता येईल.

सध्या बाजारात दिसणारे आतून गुलाबी रंग असलेले व कमंडलूच्या आकाराचे मोठे पेरू लक्ष वेधून घेत आहेत. ह्या जातीला तैवान पिंक म्हणतात. मऊ आणि गोडीला कमी असल्यानं तैवान पिंक पेरुला प्रचंड मागणी आहे. ह्या पेरूची महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात लागवड करण्यात येते. ह्या पेरूंना बाजारात चांगली मागणी आहे व भावही चांगला मिळतो. तेथील शेतकरी हा गुलाबी पेरू विकुन दरवर्षी ५-६ लाख रुपये उत्पन्न मिळवतात. साधारण 400 ते 900 ग्रॅम पर्यंत वजन असलेला हा पेरू अतिशय मऊ आणि गोडीला कमी आहे. त्यामुळे याला मागणी जास्त आहे. शिवाय पेरूच्या टिकण्याची क्षमता देखील चांगली असल्यामुळे लांबच्या बाजारपेठेत पेरू पाठवण्यासाठी कोणतीही अडचण येत नाहीय. त्यामुळे उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता फारच कमी आहे,

औषधी गुणधर्म व उपयोग :

उष्ण कटिबंधीय फळ कमी कॅलरीज व भरपूर चोथा असलेले असल्यामुळे ते आहारासाठी एक चांगले फळ आहे.

१. काहींना पेरू खाल्ल्यावर पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास खरं तर पेरूमुळे नाही, तर पेरुतील बियांमुळे होतो. ज्यांना हा त्रास होत असेल त्यांनी पेरुच्या बिया काढून केवळ मांसल भाग खाणे फायद्याचे ठरते.
२. काही लोक पेरू ठेचून त्यात थोडे मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावतात. त्वचेला यामुळे उजाळा येऊ शकतो.
३. पेरुंमध्ये ‘जीवनसत्व “के” मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे त्वचेवर उमटणारे चट्टे, डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळं यांवर ते उपाय करता येतात. पेरुचा गर नुसता शरीरावर लावल्यानेसुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते. त्वचा नितळ होऊन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते. पेरू या फळात ८०% पाण्याचा समावेश असतो. हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यात मदत करते.
४. ‘जीवनसत्व “के” भरपूर प्रमाणात असणारे हे एकच फळ आहे.
५. पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या “व्हायरस’ पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता (anaemia) निर्माण होत नाही. कारण त्यातील “क” जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.
आवळ्यानंतर जास्तीतजास्त क जीवनसत्व पेरूमध्ये आहे.
५. पेरू हे रक्तदाब व साखर नियंत्रित करण्यास मदत करते.
६. हृदयाची ताकत वाढवते.
७. स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये होणार त्रास कमी करते.
८. पेरूमध्ये असणारा चोथा पचन संस्था तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो.
९. नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवते
१०. पेरूची पाने त्यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडन्ट मुळे पोटाचे व आतड्यांचे विकार दूर करते.
११ पेरू पासून आईसक्रिम व गोळ्या बनविल्या जातात.

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 81 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ३ – पेरू

  1. तुमचे पेरू वरील संशोधन आणि त्या वरील लेख पाहिला. त्यानिमित्ताने तुमच्या बद्दलहि माहिती कळली, जी एरवी कळली नसती. You are great!
    ???? .

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..