माझ्या कार्यक्रमांमध्ये मी बरेचदा एक प्रश्ण विचारते- तुम्ही स्वतःवर आणि आपल्या आयुष्यावर प्रेम करता का? आणि श्वास घेण्याच्या आधीच काहीही विचार ना करता बहुतांश उपस्थित उत्तर देतात- “हो आम्ही प्रेम करतो”. मग माझा दुसरा प्रश्ण “इतका प्रेम करता तर स्वतःला इतका त्रास का देता?”
हेच दोन प्रश्ण मी तुम्हालाही विचारते. काय उत्तरे आहेत तुमची? थोडा विचार करा आणि नंतर उत्तरे सांगा स्वतःला. तुम्ही म्हणाल, “आम्ही कुठे स्वतःला त्रास देतो..ते तर दुसरे लोक आहेत जे सुखाने जगू देत नाही.” खरंच दुसरेच तुम्हाला त्रास देतात का?
मागच्या वेळी तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला ते आठवा. कुणी तरी उलटून बोलला? कुणी जाणतेपणी अपमानजनक बोलून गेला? तुमच्याकडून काम घेत असतांना तुम्हाला कुणी नोकरासारखं वागविलं? बॉस सारखा घालून- पडून बोलतो? सासू सगळं केल्यावरही तक्रार करते? सून मनासारखा स्वयंपाक करत नाही? इंटरव्हिव मध्ये पास होत नाही? मित्र सतत आपल्या पैश्याचे प्रदर्शन करून खाली दाखवतो कि आणखीन काही कारण आहे तुमच्या त्रासाचे?
कारण कुठलही असो परत एकदा विचार करून पहा कि कुणी कसही वागलं तरी तुम्हाला त्रास त्यांच्या वागण्याचा होतो कि दुसरं काही कारण आहे?
सखोल विचार केलात तर लक्षात येईल कि प्रत्येक व्यक्ती तिच्या मनाला आणि बुद्धीला पटेल असं वागते. पण आपली अपेक्षा असते कि सगळ्यांनी फक्त आपल्याला बरे वाटेल असेच वागावे. आणि तसे ना झाल्यास आपल्याला त्रास होतो. पण दुसऱयांनी आपल्यासाठी स्वतःला का बदलावे? तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणताहेत का?
तो तसा वागला म्हणून आपण ती घटना होऊन गेल्यावरही सारख तेच आठवून आतमध्ये धुमसत राहतो. त्रास कुणाला होतोय? आणि तो कोण देतोय? … त्या व्यक्तीने जे केले ते ४ दिवसांआधी संपलेही. आता जे तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय तो त्या व्यक्तीची जवाबदारी नाही. तो गेला. त्याला कदाचित कल्पनाहि नसेल कि तुम्ही स्वतःला अशी शिक्षा देत आहात ते. पण तुम्ही मात्र शक्य तेवढी कारणे शोधून दुसर्याला नावे ठेवण्याचे कारण धरून स्वतःला छळत आहात.
एकदा विसरून तर पहा! त्याच्यासाठी नाही. स्वतःसाठी. पण प्रश्न असा आहे कि तुम्ही जितका त्या व्यक्तीचा राग करता त्याहून जास्तं स्वतःवर प्रेम करता का? आणि मग तुम्हाला माझ्या पहिल्या प्रष्णांचे खरे उत्तर मिळेल.
नुसत प्रेम करतो म्हणणं म्हणजे प्रेम होत नसतं. स्वतःवर प्रेम असेल तर स्वतःच्या आनंदासाठी, सुख शान्ति साठी तुम्ही कुणाशी वैर घेणार नाही आणि कुणी तुमच्याशी वाईट वागलं तर त्याला जीवाशी लावून बसणार नाही. ती व्यक्ती महत्वाची असेल तर मैत्री चा हाथ तुम्हीच पुढे करा. महत्वाची नसेल तर पाठ फिरवून चालते व्हा. स्वतःला खरे सिद्ध करण्याने तुम्हाला तुमची सुख शांती परत मिळण्याची शक्यता कमीच आहे, परंतु त्या प्रक्रियेत दुसर्यांना तर सोडूनच द्या तुमचं मन कडवट होऊन जाईल आणि शान्ति तर सोडाच पण आनंदही दुरावले.
प्रत्येक भांडणाच्या किंवा वादाच्या परिस्थितीत स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, ” मी दुसर्यावर जितका राग करतो त्यापेक्षा थोडं तरी जास्तं प्रेम स्वतःवर करतो का?”
मूळ लेखक – सपना शर्मा
फेसबुकवरुन संकलन – नचिकेत पाध्ये
Leave a Reply