मह्या शेतातलं पिकं,
कस डौलतया तोर्यातं,
शेतं हिरव हिरवं,
मन हारके सुखानं.
नभ ढगाळ ढगाळ,
झोंबी झोंबाडं गारवा,
मना सुखवी शिळानं,
पिक नाचे शहारून.
ढगं बरसती थेंब थेंब,
मोती पखरले शेतातं,
त्याचा लेऊन शिंगार,
पिकं डौलते डौलात.
हिरवले रानं वनं,
गेली सृष्टि गोंजारूनं,
पशु पक्षी चहकती,
कोकिळं करीते गुंजनं.
पशु,पक्षी,झाडं,वेली,
अवघी धरा उल्हासली,
आला महेरचा पाऊस,
वसु गेली हारकुनं……!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
Leave a Reply