शुद्धमती तथा माई मंगेशकर या मराठी नाट्यअभिनेते दीनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी होत. माई मंगेशकर या मूळच्या धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावच्या होत. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची अपत्ये होय.
सर्वांना ठाऊक आहे की लताजींचे पहिले गुरू त्याचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर जी होते, पण फार कमी लोकांना माहिती आहे की लताजी व इतर भावंडाच्या संगीत शिक्षणात दुसर्यान व्यक्तीचे मोठे योगदान आहे आणि त्या त्यांची आई माई होत्या. जेव्हा वडिलांच्या निधनानंतर माई एकट्या मुलांची काळजी घेत असत, मग रियाझसाठी मुलांची तयारी करून घेणे माई संगीत शिकल्या नव्हत्या, त्यांचा संगीताशीही जवळचा संबंध होता. त्यांनी मुलांना उत्तम मूल्ये दिली.
माई मंगेशकर यांचे १६ जून १९९५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
नमस्कार, कृपया इंग्रजी विकिपीडिया वरील दीनानाथ मंगेशकर यांचे पान वाचावे. त्यात त्यांच्या पत्निबद्दल दिलेली माहिती आणि तुम्ही दिलेली माहिती यात तफावत आहे. कृपया खुलासा करावा ही विनंती. https://en.m.wikipedia.org/wiki/Deenanath_Mangeshkar