नवीन लेखन...

मैने प्यार किया या चित्रपटाला प्रदर्शीत होऊन तब्बल २९ वर्षे पूर्ण

मैने प्यार किया या चित्रपटाला प्रदर्शीत होऊन तब्बल २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. २९ डिसेंबर १९८९ रोजी हा चित्रपट प्रदर्शीत झाला. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. सलमान खानच्या अभिनय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे ‘मैने प्यार किया’. रॉयल मराठी कुटुंबात वाढलेल्या भाग्यश्रीनेही याच चित्रपटाने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाने त्याकाळी यशाचे अनेक रेकॉर्ड तोडले. यातील कलाकार सलमान खान आणि भाग्यश्री यांना या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटादरम्यान प्रथमच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आलेले सूरज बडजात्या यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी सेटवर सर्वात अगोदर येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे ते एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या या सवयीमुळे सलमान आणि भाग्यश्री त्यांना पत्नीसोबत वेळ घालवण्याचा सल्ला देत असत. पण कामाला पूर्णपणे वाहून घेतलेले सूरज यांचा सेटवरील दिनक्रम चुकत नसे. सलमान आणि भाग्यश्री सेटवर धमाल मस्ती करण्याचा एक क्षणही सोडत नसत.

मूळचे वाशीम येथील आणि आता मुंबईत वास्तरव्या स असलेले मराठमोळे लेखक एस.एम.आहाळे यांच्या् लेखनीतून ‘मैंने प्यार किया’ साकारला आहे. आहाळे यांना बाल्याेवस्थेकपासूनच नाटकाची आवड होती. त्यायतून ते नट होण्यापसाठी मुंबईला गेले. मात्र,तिथे अभिनेत्याचऐवजी स्क्री प्टण राइटर म्हचणून त्यांयनी लौकिक मिळवला. त्यांोनी ‘हम आपके है कोन’,’एक रिश्ताब’,’प्यायर दिवाना होता है’,’दिल ने फिर याद किया’,यासह इतर अनेक चित्रपटांचे लेखन केलेले आहे. या शिवाय ‘एक से बढकर एक’ या लोकप्रिय मालिकेसह इतर अनेक हिंदी मालिका लिहिल्याात.
मैंने प्यार किया’मधील रिमा लागू यांनी साकारलेली आई आजही अनेकांच्या लक्षात आहे. मातृत्व आणि पत्नी धर्म यांमध्ये अडकलेली आई रिमा यांनी चांगलीच साकारली होती. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला की, रिमोट आपसूक बाजूला ठेवून सिनेमा पाहिला जातो. या सिनेमामुळे रिमा यांच्या करिअरला नवीन उभारी मिळाली.

सलमान खाननेही नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यातही सलमान आणि रिमा यांच्या वयात फारसे अंतर नव्हते. रिमा या सलमानपेक्षा फक्त आठ ते नऊ वर्षांनीच मोठ्या होत्या. या सिनेमावेळी त्यांचे वय ३० ते ३५ वर्षांच्या आसपास होते. अशात सलमानची आई साकारणं तसं आव्हानच होतं. पण सुरज बडजात्या यांनी या सिनेमात बॉलिवूडपटात दाखवतात तशी टिपिकल केस पांढरे असलेली, खंगलेली आई न दाखवता रिमा लागू यांच्या लूकवर काम केले आणि देशाला नवीन आईची ओळख करून दिली. पण मेकअपच सगळं काही करतो असे नाही ना.. रिमा लागू यांनी त्यांच्या अभिनयाने ही व्यक्तिरेखा अशापद्धतीने साकारली की आजही ‘मैंने प्यार किया’ म्हटलं की रिमा यांची ती व्यक्तिरेखा डोळ्यांसमोरून जात नाही.
अभिनेत्री भाग्यश्री हिचा ‘मैंने प्यार किया’ हा पहिलाच डेब्यू सिनेमा या चित्रपटात भाग्यश्रीने साकारलेली साधी-सरळ सुमन लोकांना मनापासून भावली. ‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास लोक उत्सूक होते. पण पहिल्याच चित्रपटानंतर भाग्यश्री बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. खरे तर ‘मैंने प्यार किया’ नंतर भाग्यश्रीकडे खूप मोठ मोठ्या आॅफर्स आल्यात पण भाग्यश्रीने त्या सगळ्या धुडकावून लावल्यात. का? तर याच ‘का’चे उत्तर भाग्यश्रीने दिले आहे. एका मुलाखतीत भाग्यश्रीने ‘का’वर मौन तोडले. ‘मैंने प्यार किया’ भाग्यश्री अचानक बॉलिवूडमधून गायब झाली, याचे कारण आहे, तिचे प्रेम. होय, बालपणीचा मित्र हिमालय दासानी याच्या प्रेमामुळे भाग्यश्रीने चित्रपटांच्या आॅफर्स नाकारल्या. तिने सांगितले की, ‘मी आणि हिमालय लहानपणापासूनचे मित्र.

आमच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. पण माझ्या घरच्यांना आमचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, त्यावेळी आम्ही ब्रेकअप केले. तो अमेरिकेत असताना मी ‘मैंने प्यार किया’ साईन केला. अर्थात हा चित्रपट साईन करण्याआधी मी हिमालयच्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती. कारण आज नसलो तरी उद्या मी व हिमालय सोबत असू, याची मला खात्री होती. हिमालयच्या घरच्यांना आमचे नाते मनापासून मान्य होते. अमेरिकेतील शिक्षण संपवून हिमालय भारतात परत आला. माझे कुटुंबीय तरीही त्याला स्विकारायला तयार नव्हते. एकदिवस मी हिमालयला फोन केला आणि हे नाते पुढे न्यायचे का? असा प्रश्न त्याला विचारला. मी घर सोडलेय, माझ्यावर प्रेम असेल तर मला घ्यायला ये, असे मी त्याला म्हटले. यानंतर पुढच्या पंधरा मिनिटात हिमालय माझ्या घराबाहेर होता. आम्ही मंदिरात लग्न केले. हिमालयचे कुटुंब, सलमान आणि सूरत बडजात्या असे मित्र आमच्या लग्नात हजर होते. तोपर्यंत ‘मैने प्यार किया’ सुपरहिट झाला होता. मला खूप आॅफर आल्यात. पण हिमालयच्या प्रेमात मी आकंठ बुडाले होते. शिवाय लग्नानंतर लगेच अभिमन्यूचाही जन्म झाला.

याच कारणामुळे मी सगळ्या आॅफर्स नाकारत गेले. अर्थात मला त्याचा अजिबात पश्चाताप नाही.’ १९९१ मध्ये आलेल्या‘ मैंने प्यार किया’साठी भाग्यश्रीला बेस्ट डेब्यूचा अवार्ड मिळाला होता. यानंतर तिने तामिळ, तेलगू, भोजपूरी अशा काही चित्रपटांत काम केले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

मैने प्यार किया चित्रपट.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..