नवीन लेखन...

मैत्री

मानव जाती मध्ये,ज्याला कोणाला “जीवलग” असे कोणी नसते ,त्याचे साठी ईश्वराने “मित्र” हे रसायन विषेश करून बनवले आहे,असे म्हटल्या जाते.मन मोकळे करायला जेव्हा कोणी नसेल तेंव्हा “ मी तर” आहे असे जो म्हणतो तो” मित्र”अशी व्याख्या करता येऊ शकते.जीवनांत मित्र/मैत्रिणी नसले तर जीवनातला रस च चालला जाईल.मित्र हिच एक अशी व्यक्ती असते ज्याच्या पाशी आपण सुखदुंखा:त ,आपल मन मोकळ करू शकतो.

अलसस्य कुतो विद्या ,अविद्यस्य कुतो धनम ।
अधनस्य कुतो मित्रं,अमित्रस्य कुतो: सुखम् ॥

वरील संस्कृत सुभाषिता मध्ये पण म्हटले आहे की मित्रच नसले तर सुख कुठुन मिळणार ?असे प्रतिपादित करून मैत्रीचे महत्व सांगितले आहे.बालपणात ती नकळत होते.गंमत म्हणजे निस्वार्थ भाव असला तरी, त्या वयात कट्टी/ दोस्ती करून ती तोडतां जोडतां येते. नातगोत एखाद्या केळ्यासारखे असते.तुटले तर जोडता येत नाही पण मैत्री एखाद्या लाडु सारखी असते.सबंध दुरावले तर मैत्रीचा लाडु फारतर लहान होतो आणी अधिक अधिक मित्र जोडले तर लाडु मोठ्ठा होतो.दोस्ती शब्दावरून हिंदी मध्ये “दोस्त” शब्दप्रयोग पडला असावा. श्रीक्रृष्ण व सुदामा यांची आदर्श मैत्री सर्वांना माहित आहे.ती हेच दर्शवते की रूप,गरीबी,बुध्दिमत्ता,,राहणीमान वगैरे साधारणतः मैत्रीच्या आड येत नाही.परंतु समान विचारधारा,स्वभाव,आवडी निवडीनुरूप मैत्री गाढ होते. मैत्रीत दिखावा,देणेघेणे,परतफेड,बरोबरी यांना थारा नसावा तरच गैरसमजातून मैत्रीला तडा जाणार नाही.मैत्री व्हायकरता काहीतरी निमित्त लागत,वाढवायला मात्र तसा स्वभाव लागतो.कधी कधी मैत्री तरी किती घट्ट असावी- जिवश्च कंठश्च ,कोणा कोणाची तर पहिल्याच भेटीत अरे तुरे करण्या इतकी,

पुर्वी भौतिक स्नेह संबंधातुन मैत्री व्हायची. कधी कधी,वर वर दिखाव्याची मैत्री असली तरी हितशत्रु पण त्या मैत्रीच्यालाडु त असायचे .नंतर नंतर “पेन फ्रेंड” चे फैड आले.आता तर इंटरनेट मुळे फेसबुक काय व्हाट्स अप काय मित्रच मित्र ! पण त्यांच्या पुर्ण माहिती अभावी विविध धोके पण वाढलेत.सगळ्यात जास्त अगाढ मैत्री असते ती पति पत्नी संबंधांतील.मैत्री विवाहोत्तर असेल तर विश्वासाचे खतपाणी आवश्यक असते. जर विवाहापुर्वीची असेल तर मग तर तिला तितक्याच नाजुकपणे जपावे लागते.आजकाल लिव्ह इन रिलेशन शिप हा मैत्रीचा नविन प्रकार चलनात आला आहे.तसे असेल तर मग विचारायलाच नको.

एक नविन प्रकारची एकतरफा मैत्री असते ,ज्यांत दुसर्या ला कल्पना पण नसते.आपण बरेचदा काही  गोष्टी कुणाकडुन तरी त्याच्या न कळत, शिकतो व आपली त्याचेशी मैत्री जमुन जाते.मध्यंतरी एक गोष्ट वाचनात आली ती अशी-

राजेश खुप तापट स्वभावाचा मुलगा असतो.एकदा तो हौटेलात जेवायला जातो.त्याने और्डर दिला व बराच वेळ झाला पण त्याचे जेवण आले नाही.एक मनुष्य मागुन आला व योगायोगाने त्याचे जेवण लवकर आले.हे बघुन राजेश चांगलाच भडकला व वाढणार्याला फाडफाड बोलला.थोड्याच वेळात त्याचे गरमागरम जेवण आले.तो घुश्शातच जेवत असताना ,ज्याला आधी थाली मिळाली होती तो मनुष्य राजेश जवळ आला व म्हणाला सौरी,सर  तुम्हाला उशिरा जेवण आले पण तुम्ही इतके रागावयाला नको होते असे मला वाटते.तुमची हरकत नसेल तर मी एक गोष्ट सांगु इच्छितो. राजेश जरा चार घास पोटात गेल्यावर ऐकण्याच्या मनस्थितीत आला होता म्हणुन म्हणाला “बोला”.तो म्हणाला “मी एकदा गाडीवरुन जात असताना माझ्या गाडीला मोठ्या गाडीने धडक दिली.सुदैवाने माझे मोठे नुकसान झाले नाही . गंमत म्हणजे तो गाडीवाला उलट मलाच शिव्या घालत निंघुन गेला.चुक कोणाची होती वगैरे भाग सोडला तरी ,काही लोक नं,मला वाटत सतत त्यांचे डोक्यात कचरा भरुनच रहात असतात. मोका येताच ते लगेच दुसर्यावर आपला कचरा फेकत राहातात.मग आपल डोकं खराब होत व आपल्याही डोक्यात कचरा साचला जातो.मग आपण तो फेकायला जातो ,हे असे चालुच राहाते.कुठेतरी हे थांबले तर चांगले नाही कां ?आपल्याला त्रास होणारं नाही तसा दुसर्याला पण नाही.समजा तो माझा मित्रच असतां तर मी काय करू शकलो असतो?तेंव्हा पासुन मी ठरवले आपण त्याला मित्रच मानू या (त्याला कळो की न कळो).हे सारे ऐकुन राजेश म्हणाला “ पण हे सारे तुम्ही मला कां सांगताय?”तो मनुष्य म्हणाला “आहे,कारण आहे .तुम्ही त्या वाढणार्याला मित्र सहज मानु शकले असतां.खर सांगु,मी इथे रोज जेवायला येतो.मला त्यानी आपल साधच जेवायला वाढल.तुम्ही प्रथम आलात.त्यानी तुम्हाला मुद्दाम चांगल गरम गरम वाढल म्हणुन तुम्हाला वाढायला वेळ लागला.”राजेशला आठवलं की खरच  आपल्याला वाढलेल जेवण चांगल वाफाळलेल होत.आपण ही कदाचित समज़ुन  घेऊ शकलो असतो.हे सगळे बोलुन तो मनुष्य निघुन गेला पण केवढ मोठ तत्वज्ञान सांगुन गेला.तात्पर्य हे की तेंव्हा पासुन राजेश मध्ये कायम स्वरुपी बदल झाला.तो सगळ्यांना मित्र मानु लागला ! तुम्हाला राजेश सारखा बदल करुन घ्यायला नाही कां आवडणार ? अनोळखी मित्र..बनवून  !

एक अशीच गोष्ट वाचनात आली होती ,भन्नाट कल्पनांवरून आठवली….

एकदा असाच एक भावनाप्रधान मनुष्य गाडीने जात असतो.चौकात सिग्नल ला तो थांबतो.धावत धावत एक छोटासा, निरागस ,गरीब मुलगा छोटे छोटे फुगे घेऊन आला विकायला.त्याचे नाजुक पाय तापलेल्या जमिनीवर होरपळत होते.ते बघुन त्याला मुलाची कींव आली.२-४ फुगे घेंऊन काहीतरी बोलायचे म्हणुन,तु चप्पल कां नाही घालत असे विचारले.काही न बोलतां त्याने ओशाळवाणे चेहर्याने नुसता नमस्कार केला.त्याने गाडी बाजुला नेऊन थांबवली व मुलाला एक चप्पल घेऊन दिली.ती घातल्यावर मुलाच्या चेहर्यावर आलेला निरागस भाव व आनंद पाहून समाधान वाटले.तो मुलगा विचारतो “ काका,तुम्ही देव आहात कां ?”त्याला नाही म्हटल्यावर तो विचारतो “मग देवाचे मित्र आहे कां ? “ उस्फुर्तपणे तो मनुष्य “हो” असे म्हणतो ! गोष्टीचा मतितार्थ हा की आपण देव तर नाही पण आपण सगळे “देवाचे मित्र” तर बनुच शकतो. तुम्हाला पण आवडेल नं देवाचे मित्र बनायला?

“ मी तर “आहे असे म्हणणारा च मित्र अश्या व्याख्ये ऐवजी असे पण म्हणतां येईल की आपल्याला जो समज़ुन घेईल तो किंवा ज्याला आपण समज़ुन घेऊ शकतो,तो आपला “ मित्र “.ह्या द्रृष्टिने पोपट,मांजर,कुत्रा हे पण माणसाचे मित्रच होय. घरांत नुसत बोलायचे असेल तर मिठ्ठु, नुसती करमणुक हवी असेल तर मांजर व मदत/ interactive response हवा असेल तर कुत्रा. आदिकाळा पासुन कुत्रा हा माणसाचा विश्वासु,आज्ञाधारक, व रखवाली करणारा प्राणी समजल्या जातो. क्लार्कसन विद्यापीठांत क्रौनिक पेन ने ग्रस्त व व्हिलचेअर वर असलेल्या ब्रिटनी हाउले नांवाच्या मुलीला औक्यपेशनल थेरपी चा मास्टर्स कोर्स करताना ,तिला तिचा गोल्डन रिट्रायव्हर जातीच्या कुत्र्याने, रुग्णांच्या केलेल्या अमोल सेवेसाठी त्याला मानक डिप्लोमा देऊन गौरविले आहे.तो दारं उघडणे,स्विच औन- औफ करणे, इशार्यानुसार वस्तु आणणे अशी कामे बेमालूम पणे करत होता.माणसाने पण कंटाळा केला असतां !तुम्ही बाबा आमटे/प्रकाश आमटे यांच्या बद्दल ऐकले असेल .यांनी  हेमलकसा,गडचिरोली ला कुष्ठ रोग्यांची सेवा करता करता तर प्राणी मात्रांवर दयाभाव दाखवत वाघ,अस्वला सारख्या पाळीव नसलेल्या प्राण्यांचे सुध्दा तिथे जणू विश्वच बनवलं आहे. प्राण्यांना, प्राणीमात्र कां म्हणतात हे मला अजुन कळले नाही.सरळ सरळ प्राणीमित्र च म्हणा की ! कुत्र्यांना तर लपाछिपी,वस्तु आणणे वगैरे सगळे करताना आपण बघतोच .भुंकुन व आपले कपडे ओढून हवे तिकडे नेऊन ते जणू बोलतातच.

भन्नाट नाही तर एकदम चाबुक कल्पना तर अजुन पुढची आहे :“सर्पमित्र”.माझा एक मित्र आहे तो सापांना अगदी सहज रित्या,बेमालूमपणे पकडतो.मित्राचा मित्र म्हणजे आपला मित्र म्हणतात ,म्हणजे मी तर सर्पमित्रच झालो की !

असे आपले मित्र वाढत गेले तर आपल्या मित्रांचा परिघ वाढवायला काय हरकत? आवडेल नं मैत्रीचा परिघ वाढवायला ?

— सतीश कृष्णराव परांजपे 

2 Comments on मैत्री

  1. Well expressed thoughts. How about if relations are also covered to friendship so that it turns into lad rather than plantain. Examples of Dog , I have rather very good experience. Friends are always friends.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..