मैत्री आपली की आपण मैत्रीचे उदाहरण?
तू हसावं, मी त्यात विरावं,
आनंदाच्या ओघात, मी मिठीत तुझ्या शिरावं,
मी मिठीत येताना, हलकीच एक खोड करावी,
तू खोट खोट रागवताना, ती गमतीत रुपांतर व्हावी…
तू आणि तुझा चेहरा, त्यात फक्त तू असावी,
तुझ्याव्यतिरिक्त मला त्यात माझी झलक दिसावी…
तू आणि मी कधी एकमेकांचे होऊन गेलो कळलच नाही,
भान जगाचे विसरून गेलो, एकटेपण उरलेच नाही…
तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू,
कधी आई तर कधी तिचे लेकरू,
खूप सुरक्षित वाटतं मला तूझ्या मिठीत,
म्हणूनच हक्काने शिरते तूझ्या कुशीत,
थकलेल्या या जीवाला , मिळतो त्यात विसावा,
तूझ्या डोळ्यात दोस्तीचा अथांग सागर दिसावा…
हसलीस ना? अशीच हसत रहा,
हेच तर हवं आहे मला,
आता उमगलं त्या गहन प्रश्नाचं उत्तर,
का आहे “मैत्री” सगळ्यांत बेहतर…
अशी आहे आपली ही निखळ मैत्री,
कधी माझ्यामध्ये तू, कधी तुझ्यामध्ये मी….
– श्वेता संकपाळ