लेखक : प्रकाश आमटे – अद्वैत फिचर्स – पुनर्प्रकाशित
बाबांचा (डॉ. बाबा आमटे) परमेश्वरावर विश्वास नव्हता. त्यांनी आपल्या कामातून प्रेरणा देणारे अनेक पर्याय निर्माण केले. अगदी तरुण वयात मी या कामात ओढला गेलो. बाबांच्या मुशीत तयार झाल्याने मीसुध्दा परमेश्वर नावाची कोणी अदृश्य शक्ती आहे ही संकल्पना मानत नाही. त्याऐवजी मी कामालाच परमेश्वर मानतो. हे सुध्दा बाबांचेच संस्कार आहेत. आजकाल लोक जास्तच धार्मिक होत असल्याचे दिसते. शिवाय ती समाजाची गरज बनू पाहत आहे. हे बरोबर का चूक हा भाग वेगळा, पण वस्तुस्थिती मान्य करावी लागते. विशेषत: वाढते ताण-तणाव, असुरक्षितता या पार्श्वभूमीवर अनेकजण अशा शक्तीच्या शोधार्थ असतात. वास्तविक, कोणाविषयी वाईट चिंतठे नाही किंवा कोणाचे वाईट केले नाही आणि सर्वांचे कल्याण व्हावे असा विचार मनात ठेवला तर आपोआपच आत्मिक समाधान लाभते. शिवाय फारशा अडचणीही निर्माण होत नाहीत.
आपत्ती प्रत्येकाच्या आयुष्यात येते. तिच्यातून मार्ग काढावाच लागतो. पण असा मार्ग काढण्यासाठी हवी असणारी शक्ती अनुभवातून प्राप्त होत असते. कोणाची मदत न घेताही आपत्तीचे निवारण करता येते. त्यासाठी हवी असते हिंमत आणि ही हिंमत अनुभवातून येत असते. बाबांनी या कामाला सुरूवात केली तेव्हाही असंख्य अडचणी आल्या. तरिही त्यांनी नेटाने काम सुरू ठेवले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मी या कार्यात बेधडक उडी घेतली.
बाबांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. तो सार्थ करण्याचा मी मनोमन प्रयत्न करत आहे. अर्थात मलाही असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. पण कामावरील श्रध्देपोटी त्या अडचणी दूर होत गेल्या. अशाच पध्दतीने गेल्या अनेक वर्षांपासून गरजू लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
तशी या कार्याची सुरूवात अतिशय दुर्गम भागातील. तेथे आदिवासी बांधवांची वस्ती मोठी आहे. आम्ही काम सुरू केले तेव्हा या लोकांमध्ये शिक्षणाचा कोणताही प्रसार झाला नव्हता. शिवाय त्यांच्यावर रूढी-परंपरांचा जबरदस्त पगडा होता. साहजिकच अंधश्रध्दाही मोठ्या प्रमाणावर होती. ती दूर करणे हे आव्हान होते. मंत्र, तंत्र, बळी देणे असे प्रकार सर्रास दिसत. अशा परिस्थितीत सुरूवातीला या लोकांना आरोग्यदायी जीवनाचा पर्याय दिला. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केला. यातही अडचणी आल्या. कारण शतकानुशतकांचे संस्कार झुगारुन टाकण्यास ही मंडळी सहजासहजी तयार नव्हती. त्यामुळे त्यांना योग्य ते शिक्षण द्यावे लागले. हे कार्य करताना आलेले असंख्य प्रसंग मनावर कायमचे कोरले गेले. ग्रामीण, आदिवासी भागात समाजात कोणी तरी काळी जादू करते असा समज मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. अशा वेळी एखादी संशयित व्यक्ती आढळल्यास पंच समितीसमक्ष मारहाण केली जाते. एकदा अशाच संशयावरुन एका व्यक्तीला जबरदस्त मारहाण करण्यात आली. एवढी मारहाण होऊनही जिवंत राहिल्याचे लक्षात आल्यावर त्याला आमच्याकडे उपचारासाठी आणण्यात आले. पुरेशा उपचारानंतर तो बरा झाला. पण आम्ही अशा व्यक्तींवर उपचार करतो हे समजल्यावर त्याला विरोध करण्याचा प्रयत्न झाला. मांत्रिकांची मुले आजारी पडल्यावर तंत्र-मंत्राने बरी झाली नाहीत. पण आमच्या उपचाराने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पुढे तंत्र-मंत्राची प्रथा आपोआपच बंद होत गेली.
सुरूवातीला एखाद्या भागात उपचारासाठी गेल्यावर “आम्ही तुम्हाला बोलावले नव्हते’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात. त्यामुळे उत्साहाने सुरू केलेल्या कामात अडचण निर्माण होत आहे, असे वाटे. त्या बांधवांचे ते बोल आमच्यासाठी धक्कादायक ठरत. पण म्हणून आम्ही खचून गेलो नाही की “आम्हाला शक्ती दे’ म्हणत ईश्वराला शरणही गेलो नाही. उलट नेटाने काम सुरू ठेवले. कालांतराने कामाचा अपेक्षित परिणाम दिसू लागला. शिवाय या कार्यात सुरूवातीस भाषेचा
अडसरही होता. कारण आदिवासींची भाषा आम्हाला अवगत नव्हती. मग खाणाखुणांनी कामाला सुरूवात केली. पुढे हळूहळू भाषा शिकता आली.
ग्रामीण तसेच आदिवासी भागात धार्मिकता मोठ्या प्रमाणावर आढळून येते, असे म्हटले जाते. पण तसे पाहिले तर शहरातही ही प्रवृत्ती वाढताना दिसते. शहरातील विविध मठ वेळी कोणाला सुशिक्षित म्हणावे आणि कोणाला अशिक्षित असा प्रश्न पडतो. या कार्याला भेट देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येत असतात. त्यांच्याशी बोलताना आजकालची तरुणाई बरीच तणावाखाली वावरत असल्याचे दिसते. आजकाल सुट्टी मिळाल्यावर एखाद्या निसर्गरम्य किंवा धार्मिक स्थळी भेट देण्याचा कार्यक्रम हमखास आखला जातो. पण माझ्या पत्नीने देश अजून फारसा पाहिलेला नाही. या संदर्भात आमची नेहमी चर्चा होत असते. एकदा असेच काही लोळ आमच्या प्रकल्पाला भेट देण्यास आले. येथील काम पाहिल्यावर त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती. ते म्हणाले, नुकतेच आम्ह तिरुपतीला जाऊन आलो. पण तिथे जे समाधान मिळाले नाही ते इथे प्राप्त झाले.’ त्यांच्या या वाक्यावर मी पत्नीकडे पाहिले आणि म्हणालो. “बघ, बाहेर न मिळणारे समाधान इथे प्राप्त होत आहे. ही अनुभूती अधिक महत्त्वाची नाही का? अशा परिस्थितीत आपण देश संपूर्णपणे पाहिला नसला म्हणून काय झाले? ‘ अर्थातच माझ्या या प्रश्नावर स्मितहास्य करत पत्नीने संमती दिली.
आज जगात हिंसाचार, अनागोंदी सुरू आहे. प्रत्येकाचे जीवन कमालीचे असुरक्षित बनत आहे. अशा वेळी मग परमेश्वर कोठे आहे असा प्रश्न पडतो. खरे तर समाजात एक नैतिक शकते असते. तिचा ऱ्हास होऊ लागला की अशा घटनांना ऊत येतो. त्यामुळे ही नैतिकता टिकून ठेवण्याची खरी गरज आहे. त्यासाठी हवेत संस्कार. असे संस्कार कामातून निर्माण होत असतात. कोणतेही चांगले काम माणसाला सुसंस्कृत बनवते. त्यामुळे प्रत्येकाने आपले जीवन अशा चांगल्या कामासाठी समर्पित करायला हवे. समाजाला धाक वाटावा अशी एखादी तरी अदृश्य शक्ती असायला हवी असाही काहींचा आग्रह असतो. किंबहुना, अलीकडे परदेशातील अनेक लोक अशा शक्तीच्या शोधात आपल्याकडे येतात. ख्े तर पाश्चात्य देशांमध्ये आर्थिक सुबत्ता, व संपन्नता मोठ्या प्रमाणावर आहे. सर्व ७ सुखसोयी हाताशी आहेत. अशा जीवनात थ्रिल ते काय असणार? त्यामुळे त्यांचे जीवन हळूहळू निरस बनत चालले आहे. त्यातून तणाव वाढत आहे आणि ते कशाळून मन:शांती मिळेल याचा शोध घेत आहेत.
आयुष्यात आजवर मी परमेश्वर है संकल्पना मान्य केली नाही. पण त्यामुळे माझे काही बिघडले आहे किंवा वाईट झे आहे, असेही नाही. मी आजही पूर्वीहतकाच आनंदी आणि संतुष्ट आहे. शेवटी ईश्वराला मानणे-न मानणे हा ज्याचा-त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. पण माझ्यापुरते तरी या प्रश्नाचे ऊळ मी शोधले असून कामातच ईश्वर शोधला आहे
प्रकाश आमटे
अद्वैत फिचर्स (SV10)
अद्वैत फिचर्स कडून मराठीसृष्टीसाठी आलेल्या लेखांमधून पुनर्प्रकाशित
Leave a Reply