माझी राहूची महादशा संपली आणि गुरुची महादशा सुरू झाली. आणि अचानक माझ्यातील भोगी माणूस अदृश्य झाला. पूर्वी मी रोज मच्छी खायचो! गुरूच्या महादशेत मी शाकाहारी झालो. कविता, कथा लेख लिहू लागलो माझ्या आयुष्यातून अचानक स्त्रिया निघून जाऊ लागल्या. मी लिहिलेला प्रत्येक शब्द प्रकाशित होऊ लागला याच काळात माझे दोन कविता संग्रह प्रकाशित झाले. वर्तमानपत्रात सतत माझे छायाचित्रे छापून येत होती. दिवाळी अंकात प्रत्येक वर्षी माझ्या कथा प्रकाशित होत होत्या. मला मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळत होती. पण पैसा मिळत नव्हता. पण माझ्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या मी माझ्याच मस्तीत मस्त होतो. माझ्या जन्म कुंडलीत कर्म स्थानात म्हणजे चतुर्थ स्थानात कर्केचा म्हणजे उच्चीचा गुरु आहे. त्यामुळेच माझा निवास हा नेहमी मंदिराजवळ असतो. माझे कार्यालय माझ्या घराजवळ आहे. आणि त्यामुळेच मला लहानपणापासून अन्न, वस्त्र आणि निवारा मिळतच आला आणि पुढेही मिळेल. माझा लग्नेश शुक्र षष्ठात आहे त्यामुळेच माझ्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या पण त्यातील एकही टिकली नाही. त्यामुळेच माझे शत्रू माझ्यासमोर टिकाव धरू शकत नाहीत. येथे या शुक्रामुळेच माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाची घटना घडणार आहे. या शुक्रामुळेच आणि द्वितीय स्थानी असलेल्या नेपच्यून मुळेच मी कवी झालो आणि माझ्यात अंतरस्फूर्ती निर्माण होऊन मला भविष्याचे आभास होत असतात. माझ्या सप्तमात रवी मंगळ बुध असल्यामुळे आम्हा तीन भावांचा योग होताच! माझ्या बहिणीचा जन्म हा माझ्या आयुष्यात घडणाऱ्या एका महत्त्वाच्या घटनेची पायाभरणी होती.
तिथून आणखी एक भाकीत होते पण मी ते येथे स्पष्ट करू शकत नाही. गुरुची महादशा संपल्यावर शनीची महादशा सुरू झाली खरं तर शनी मला भाग्यकारक ग्रह पण! एखाद्या ग्रहाच्या महादशेत त्याच ग्रहाची अंतर्दशा अशुभ असते. माझी शनीची साडेसातीही सुरू होती. साडेसाती सुरू झाली आणि मी हातातील काम सोडून बसलो. मला खुप पायपीट करूनही यश मिळत नव्हते. जिथे जिथे पैसे गुंतवले तिथे तिथे नुकसान झाले. जी माणसे वेळेला उपयोगी पडतील असे वाटले होते ती प्रत्यक्षात उपयोगी पडली नाहीत. भाड्याच्या घरात राहावे लागले. अक्कल शून्य लोकांची बोलणी ऐकून घ्यावी लागली. प्रतिष्ठा कमी झाली. मान सन्मान कमी झाला. याच काळात लिखाण सोडून देण्याचे विचार मनात बळावू लागले. जगाचा खरा रंग दिसला. नंतर केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळाला नाही. साडेसतीची शेवटची अडीच वर्षे तर खूपच कष्टात गेली. पण अन्न वस्त्र निवारा यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण माझ्या कुटूंबाची आर्थिक स्थिती उत्तम होती. या काळात माझे माझ्या तब्बेतीकडेच नव्हे तर दिसण्याकडेही दुर्लक्ष झाले. त्याच काळात मी त्वचाविकारानेही ग्रासलो माझा गोरा चेहरा काळा पडला. मी वैराग्यासारखा वागू बोलू लागलो. आणि जेंव्हा साडेसाती संपली तेव्हा हक्काच्या घरात राहायला गेलो.
मी स्वतःबद्दल नवीन विचार करायला लागलो.मी जुन्याच कामावर रुजू झालो आता माझा आर्थिक प्रश्न सुटला. मी पुन्हा लिहायला लागलो. लिखाणाला यश मिळू लागलं! माझा काळवंटलेला चेहरा गोरा झाला! त्या काळात मला भेटलेली लोक विचारतात तू इतका गोरा कसा झालास तेव्हा मला हसू येत.त्या साडेसातीत मी माणूस म्हणून अधिक समृद्ध झालो होतो. जीवनातील नश्वरता लक्षात आली. आणि आयुष्यातील सर्वात मोठा मंत्र मला मिळाला होता. तो म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा कारण पुढचा जन्म मिळेल पण तो या जन्मापेक्षा वेगळा असेल. या जगात ज्याचं दुःख करत बसावं असं कारण अस्तित्वात नाही. आणि आत्महत्या करण्याला काही कारणच नाही. आत्महत्या करण्यापेक्षा जगासाठी आपण मेलोय असे समजून जीवन जगायला सुरुवात केल्यास अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे सापडतात…मी माझ्या लहानपणी नास्तिक होतो. आजही मी आस्तिक असल्यासारखा वागत नाही म्हणजे मी कधीच कोणाकडे सत्यनारायणाच्या पूजेला जात नाही, भांडाऱ्यात जेवत नाही, घरातील देवांची पूजा करत नाही, कधीही परीक्षेला जाताना देवाच्या पाया पडून गेलो नव्हतो, मला नेहमी वाटायचं की मी माझ्या बुद्धीच्या जोरावर खूप कष्ट करून मी मोठा माणूस होईन, माझे भाग्य मी घडवेन पण मी माझं भाग्य घडवू शकलो नाही म्हणून भावंडांचं भाग्य घडविण्याचा अट्टहास केला. पण सारी मेहनत वाया गेली ते त्यांच्या नशिबाच्या वाटेनेच गेले. मी माझं नशीब बदलाचा अट्टहास करून पाहिला पण त्यात मला यश आलं नाही कारण माझ्या यशस्वी होण्याची वेळ आता येणार होती…
क्रमशः
— निलेश बामणे.
मो. 8692923310 / 8169282058
२०२, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए,
बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – ४०० ०६५.
छान लेख