मी पहिलीत जेव्हा गोरेगाव पूर्वेच्या पहाडी शाळेत होतो. तेव्हा आता सारखी गोरेगाव स्टेशनवरून संतोष नगरला यायला बस सेवा होती पण बसने येण्यापेक्षा आम्ही आरे मधून चालत यायचो तेव्हा आरेत आता पेक्षा जास्त हिरवळ होती. आणि भर उन्हातही आरेच्या रस्त्याला गार हवा असायची आजही आहे पण आता गाड्या खूपच जास्त असतात.
आरे रोडच्या आजूबाजूला तेंव्हा शेतीही व्हायची आमच्या संतोष नगरला तर बैलाने शेती नांगरताना मी बऱ्याचदा पाहिले आहे. तर तेव्हा त्या रस्त्यातील शेतात बुजगावणे म्हणून एक बाईचा सुंदर पुतळा उभा केला होता मी तो पुतळा रोज चालताना पायचो पण काही महिन्यांनी तो पुतळा दिसेनासा झाला. मी रस्त्याने चालताना मी रोज त्या जागेवर आलो की त्या बाईची आठवण यायची त्या पुतल्यातील स्त्रीच रूप खूपच आकर्षक होतं. त्यावेळी मला एक प्रश्न सारखा सतावत होता ती स्त्री कोठे अदृश्य झाली. पुढे माझी शाळा बदलली आणि मी त्या बाईला विसरलो पण तरीही कधीकधी ती बाई मला आठवायची! आणि मी अस्वस्थ व्हायचो.
आरे गार्डन म्हणजे छोटा काश्मीर आमच्या घरापासून चालत दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर मे महिन्यात तर आम्ही तेथे दुपारी झोपायला जायचो दहावीचा अभ्यास मी त्याच गार्डन मध्ये केला. प्रेमी युगुलांकडे पहात. दहावी वरून आठवलं दहावीत असताना आमच्या वर्गातील पाच सहा मुलं – मुली एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
एकदा असाच प्रकार घडला होता आमच्या दहावीच्या वर्गाच्या रिझल्टवर शाळेची सरकारी ग्रँड ठरणार होती त्यामुळे आमच्या वर्गावर मुख्याध्यापकांचेही विशेष लक्ष होते. इतकेच नव्हे तर आमचा वर्ग स्टाफ रूमला लागूनच ठेवला होता आणि मध्ये दोन खिडक्या होत्या कोणीही शिक्षक जराही शंका आली की खिडकी उघडून डोकावून पाहात. सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यत आम्ही शाळेतच गाडलेले असायचो त्यात या काही मुला मुलींच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण शिक्षकांना लागली कुणकुण म्हणजे ते कोण विद्यार्थी आहेत यांची शिक्षकांना पक्की खात्री होती.
एक दिवस अचानक दोन तीन सर मॅडम वर्गात आले आणि त्यांनी मुला मुलींचे हात खांद्यापर्यत तपासले ज्या मुला- मुलींच्या हातावर पेनाने इंग्रजी अक्षरे कोरलेले नावे लिहिलेली भेटली त्या सर्वांना स्टाफ रूममध्ये नेवून धुतला. कोणाच्या पालकांना बोलावले नाही हे नशीब पण तरीही त्यांची प्रेमाची आग काही निवाली नव्हती. शाळेच्या गच्चीत वर्गाच्या मागे अभ्यास करण्याच्या नावाखाली हातात हात घेऊन बसायचे. दहावी झाल्यावर त्यातील बऱ्याच मुलींची लग्ने झाली. त्यात काही हुशार मुलीही होत्या त्यांच्या भविष्याची राख रांगोळी झाली. त्यातील एकाही मुला- मुलीची प्रेमकथा यशस्वी झाली नाही. आता त्या मुली म्हाताऱ्या झाल्यासारख्या दितात. मला वाटतं त्या शरीराने नाही तर मनाने म्हाताऱ्या झाल्या आहेत. काही परिस्थितीमुळे म्हाताऱ्या झाल्या आहेत. दखल घेण्याजोगे आयुष्य एकीचेही घडले नाही. पण माझ्या वर्गातील बरीच मुले पुढे राजकारणात सक्रीय झाली. बाकी कलेच्या क्षेत्रात कोणी मोठा झाला नाही त्यातल्या त्यात मी लेखक झालो!पण मी लेखक होईन असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मी अविवाहित का राहिलो हे कोडे त्यांना उलगडत नाही. कारण ते मला जसा ओळखत होते तसा मी नव्हतो.
शिक्षण संपल्यावरही नीलम मला भेटायची कधी कधी बसमध्ये मग आम्ही एकाच सीटवर बसून गप्पा मारत प्रवास करायचो! पण मला तिच्या सोबत पाहून माझ्यावर लाईन मारणाऱ्या मुली खूप जलायच्या. पण एकदा निलमने माझा पोपट केला होता. आम्ही असेच बसमध्ये एकाच सीटवर बसून प्रवास करत होतो ती खिडकीवर बसली होती आमच्या पुढे मागे मला ओळखणाऱ्या तरुणी बसल्या होत्या. तेव्हा नीलम कोणत्यातरी ट्रॅव्हल्लिंग कँपणीत कामाला होती. तशी नीलम भयंकर शिस्तप्रिय मला हातातील कागदावर लिहिण्याची सवय म्हणजे कविता वगैरे पण चुकलं की तो कागद खिडकीतून बाहेर फेकायचा! आम्ही नेहमी सारख्या गप्पा मारत होतो मी हातात असणारा कागद चुरगळला तो पाहून नीलम म्हणाली, कागद बाहेर फेकू नको हा! आणि स्वच्छतेवर लेक्चर देऊ लागली त्यावर पुढच्या मागच्या मुली हसायला लागल्या मी ही शेवटी लेखक प्रसंगावधान राखत मी म्हणालो, मी कागद बाहेर टाकताच नाही खिशात ठेवतो आणि खाली उतरल्यावर कचराकुंडीत टाकतो. तिला काय माहीत माझ्या या सवयीमुळे मी माझी तिकीटही चुरगळुन खिडकीच्या बाहेर टाकली आहे आणि उतरल्यावर दंड भरला आहे. पण त्यांनतर माझी ती सवय मोडली ती कायमचीच…
समाप्त.
— निलेश बामणे.
मो. 8692923310 / 8169282058
२०२, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए,
बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – ४०० ०६५.
Leave a Reply