आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींसाठी सतत माणूस दुसऱ्यांना दोष देत असतो. मी ही देत होतो पण जेव्हा मला गूढ गोष्टी कळू लागल्या तेव्हा माझे अज्ञान दूर झाले. प्रत्येक व्यक्ती ही स्वतः आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी स्वतःच कारणीभूत असते. प्रत्येकाच्या वाट्याला येणारे दुःख हे त्याच्याच कर्माचे फळ असते या जन्मीचे अथवा गतजन्मीचे! आपल्याला सर्व सुखे मिळाली म्हणजे आपण पुण्यवान आहोत हा भ्रम आहे या भ्रमामुळेच माणूस पापाच्या गर्तेत अधिक रुतत जातो आणि त्याला कळतही नाही.
मी लहान असताना माझ्यावर कधीच उपाशी राहण्याची वेळ आली नाही घरात अन्नाचा कणही नसताना कोणाकडून उसने तांदूळ घेऊन कधी भंगार विकून कधी लोकांची छोटी मोठी कामे करून का होईना पोटाची सोय झाली अंगावर कपड्याचा विचार करता मला एक चड्डी पुरेशी होती कारण इतर वेळी मी उगडाच असायचो! पण माझ्या त्या उगड्या पिळदार देहावर किती जणांच्या वासनरुपी नजरा पडल्या होत्या देव जाणे! त्या अशुभ नजरांनी माझ्या साडेसातीत मुहूर्त रूप धारण केले आणि मी त्वचाविकाराने ग्रासलो गेलो इतका की मला उघडं राहण्याची लाज वाटू लागली बरा झालो की पुन्हा माझ्या उगड्या देहावर कोणाची तरी अशुभ दृष्टी पडते आणि पुन्हा तेच चक्र सुरू होते.
त्यावरील उपाय आता मला सापडला मी उगड राहता कामा नये. पण सवय! ती हुक्की मला येतेच!! आणि त्यासोबत त्याचे परिणामही!!! कोणी आपल्यावर जादूटोणा केला म्हणून आपण दुःखी होत असतो. आपले कर्म, आपले गत जन्मीचे कर्म, आपल्या आई वडिलांचे कर्म हेच आपल्या दुःखाला कारणीभूत ठरत असतात. वास्तवात आपण ज्याचं दुःख करावं अशी कोणतीही गोष्ट या जगात अस्तित्वातच नाही. दुःख हे मोहामुळे निर्माण होते. जिथे मोह नाही तिथे दुःख नाही. मला प्रसिद्धीचा मोह निर्माण झाला त्याच्यामुळे माझ्या वाट्याला आयुष्यात आर्थिक दृष्ट्या यशस्वी न होण्याचे दुःख आले. आपल्या दुःखाचे जन्मदाते आपणच असतो. माझे लग्न झाले नाही म्हणजे मी ते करत नाही त्यामुळे मी दुःखी नाही कारण मला ते नको आहेत पण त्यासाठी विनाकारण जग दुःखी आहे. लग्न ही काही आयुष्यातील अंतीम गोष्ट नाही . या जगात म्हणजे निसर्गात आशा अनंत गोष्टी आहेत ज्यातून मनुष्याला आनंद मिळू शकतो. पण मनुष्य आनंद कशात शोधतो? तर आयुष्याचा जोडीदार, मुलबाळ आणि संपत्तीत…जी प्रत्यक्षात त्याची कधी नसतेच.
माझ्या भावाच्या कॉम्प्युटर क्लासमध्ये एक व्यक्ती यायची खूप हुशार होती साठीत त्या व्यक्तीने आपले सर्व दात काढून लाखभर रुपयाचे नवीन दात लावून घेण्याचा निर्णय घेतला होता. मी लेखक वगैरे आहे हे त्या व्यक्तीला माहीत होते पण मला अध्यात्मिक ज्ञानही आहे याची त्या व्यक्तीला कल्पना नव्हती तशी ती कल्पना माझ्याकडे पाहून कोणाला येत नाही त्या व्यक्तीने मला प्रश्न केला तुझं लग्न झालंय? मी नाही! म्हंटल्यावर ती व्यक्ती म्हणाली, करून टाकायचं! आयुष्यात कोणी तरी साथ द्यायला हवेच! त्यावर मी सहज म्हणालो, “कोणीही कोणाला आयुष्यभर साथ देऊ शकत नाही एक क्षण असा येतोच जेव्हा नवरा किंवा बायको एकटे असतात. त्यामुळे आयुष्यभर साथ द्यायला कोणीतरी हवं म्हणून लग्न करायला हवं हे मला पटत नाही त्या ऐवजी आपली शारीरिक गरज ती ही सापेक्ष आहे ती भागविण्यासाठी लग्न करायला हवं असं तुम्ही म्हणालात तर ते मी मान्य करेन!”
माझं हे म्हणणं त्या व्यक्तीला बहुदा मान्य नसावे! पण त्यानंतर काही महिन्यातच त्या व्यक्तीने आपले सर्व दात काढून लाखभर रुपये खर्च करून नवीन दात लावून घेतले आणि अचानक हार्ट अटॅक येऊन स्वर्गवासी झाला. आता तो त्याच्या बायकोला साथ देऊ शकत होता? तर नाही! त्याला काय माहीत माझ्या आयुष्यात डझनभर स्त्रिया आल्या होत्या. त्यांचे माझ्यावर प्रेम होते पण मी त्यांच्यापैकी एकीतही गुंतून पडलो नाही. त्यांच्यापैकी एकीनेही मला माझ्याशी लग्न करतोस का म्हणून विचारणा केली नाही. कारण ते नियतीला मान्य नव्हते. मी स्वतः स्त्रिला पुरुषपेक्षा वेगळं मानत नाही. त्या सगळ्या आजही माझा आदर करतात कारण मी त्यांना दुःख दिलं नव्हतं! त्यांनी त्यांच्या आयुष्यातील भौतिक आनंद शोधला होता. मी त्यांच्या आनंदात आनंदी होतो कारण मी माझ्या आनंदात आनंदी होतो. माझ्याकडे स्त्रिया आकर्षित होतात . मी ही त्यांच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतो पण कोणा एकीत गुंतून राहणे मला जमत नाही.
माझ्या आयुष्यात एक तरुणी आली. जेव्हा मी स्तब्ध झालो. ती तरुणी पहिल्यादा माझ्या आयुष्यात वयाच्या पंचविसाव्या वर्षी आली होती. पण माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम भावना वयाच्या पस्तिशीत निर्माण झाल्या. पुढे मी तिच्या प्रेमात मी बुडालो. इतका की मी दुसऱ्या कोणा तरुणीकडे पाहायचे सोडून दिले. ज्या क्षणी मी तिला पहिल्यांदा पाहिले तेंव्हाच माझ्या मनात तिच्याशी विवाहाचा विचार आला होता पण तेव्हा माझ्यासोबत एक तरुणी होती मी तिच्याशी विवाह करण्याच्या मनस्थितीत होतो पण त्यांनतर माझ्या असयुष्यातील एकेक करून सर्व तरुणी निघून गेल्या आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया बंद झाल्या. आजही स्त्रिया माझ्यावर मोहित होतात पण त्या माझ्या संपर्कात येत नाही. माझं मन मला सांगत की तिचं आणि माझं गतजन्मीचे काहीतरी नाते आहे ज्या नात्याचा काहीतरी हिशोब बाकी आहे जो पूर्ण करण्यासाठी ती माझ्या आयुष्यात आलेली आहे.
क्रमशः
— निलेश बामणे.
मो. 8692923310 / 8169282058
२०२, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए,
बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई – ४०० ०६५.
Leave a Reply