आमच्या कंपनीतील कारागीर जाधव आणि मी आमच्यात अनेक विषयांवर चर्चा व्हायची एकदा त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक सत्य घटना कथन केली होती त्यांचे वडील वारले त्याच दिवशी त्यांच्या शेतात नांगर बांधला होता. पुढे जाऊन कोणीतरी त्यांच्यावर तंत्र प्रयोग केला आणि ते वेड्यासारखे करू लागले दिवसभर ठीक असायचे, पण रात्र झाल्यावर वेड्यासारखे करायचे अंगावरील कपडे वगैरे फाडून टाकायचे. मुंबईतील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणून उपचार सुरू झाले त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. दिवस भर ठीक असायचे पण रात्री वेडे व्हायचे! हे सर्व विचित्र होतं. तेथील मोठे डॉक्टर देवधर्म मानणारे होते ते त्यांच्या नातेवाईकांना म्हणाले, “तुम्ही बाहेरच काही आहे का ते पहा!” शेवटी त्यांनी मंत्रिकाकडे पाहिले असते त्याने रात्री बारा वाजता त्याच्या अंगावरून काही वस्तू काढायला सांगितल्या त्याला त्या डॉक्टरने खास परवानगी दिली. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ते ठणठणीत बरे झाले. बरं झाल्यावर ते गावी गेले असते गावातील एक तांत्रिकाने त्यांना रात्री पडवीत झोपायला सांगितले त्या दिवशी घरातील कोणालाही बाहेर पडायला नाही सांगितले आणि सकाळी चारच्या अगोदर तो मांत्रिक उठला त्याने स्वतः विहिरीवरून पाण्याच्या हंडा भरून आणला आणि त्याला अंघोळ घातली आणि त्यानंतर त्याला कधीही भूतबाधा झाली नाही. पण त्याच्या घराण्यातील ती व्यक्ती शेवटी मधमाश्या चावून वारली.
मी लहान असताना म्हणजे नऊ वर्षाचा असताना आमच्या शेजाऱ्यांनी मुलगी माझी बाळ मैत्रीण! विजया मी आणि ती एकाच शाळेत जायचो ती माझ्याहून सहा महिन्यांनी लहान होती. त्यावेळी आम्ही सरकारी शाळेत होतो त्या शाळेच्या समोर एक बाथरूम होते त्यात काही बायकांनी जाळून घेऊन आत्महत्या केलेल्या होत्या त्यातील काही बाथरुमचे दरवाजे आतून बंद असायचे पण आत कोणी नसायचे. तिथेच कोठेतरी ती झपाटली आणि ती वेड्यासारखी करू लागली दिवसभर उघडी इकडून तिकडे फिरायची. काही खायची नाही. तिची परिस्थिती इतकी वाईट झाली की तिच्याकडे पाहवत नव्हते. अनेक तांत्रिक मांत्रिकाने दाखविले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी माझे बाबा म्हणाले, एकदा माझ्या मामाकडे घेऊन जाऊ या! ते काही तांत्रिक मांत्रिक नव्हते तर शिवभक्त होते. त्यांच्या गावी गावी शंकराचे स्वयंभू शंकराचे मंदिर आहे . त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी कांदा लसूनही खायचे सोडले होते ते अखंड शिव भक्तीत रममाण होते त्यांचे दादरला एक शिव मंदिर होते. आम्ही लहान असताना आम्हाला काही त्रास झाला तर ते इबुत द्यायचे ती लावली की आम्ही बरे व्हायचो! बाबा तिला घेऊन त्यांच्याकडे गेले त्यांनी तिला मंदिरात घेतले आणि मंदिराचे दरवाजे बंद केले तर ती दरवाज्याच्या फटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांनी लगेच शंकरा समोरील इबुत (अंगारा) घेऊन तो तिच्या कपाळी लावला आणि तिला घरी घेऊन जायला सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती दुकानात जाऊन बटर विकत घेऊन आली त्या नंतर तिला कधीच कोणती भूत बाधा झाली नाही. पण पुढे जाऊन तिचा भाऊ मात्र मानसिक रुग्ण झाला. त्याला भूत बाधा नव्हती. तो नायर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना जी लोक त्याला भेटायला यायची त्यांची जुनी लफडी म्हणजे अनैतिक संबंध तो सांगायचा! मी त्याला भेटायला गेलो नाही हे बरं झालं नाहीतर माझी अनेक गुपिते त्याला माहित होती. लग्न झाल्यावर तो सुधारेल या भाबड्या आशेने त्याच्या आईने त्याचे लग्न लावून दिले त्याला अपघाताने एक मुलगी झाली पण त्याला येणारे वेडाचे झटके कमी झाले नाहीत. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली.
आमच्या विभागातील एका स्त्रीने नवऱ्याच्या त्रासाला वैतागून रात्री अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली होती त्या रस्त्याने जाताना ती रात्री अपरात्री बऱ्याच लोकांना दिसायची! आमच्या शेजारच्या घरात एक भैयानी नव्याने राहायला आली होती त्या रस्त्याने जाताना ती झपाटली आणि दुपारच्या वेळी ती अंग झाडू लागली तिला सावरायला आजूबाजूची माणसे गेल्यावर ती मराठी बोलू लागली या विषयाची माहिती असणाऱ्या आमच्या शेजाऱ्याने तिला घट्ट पकडून तू कोण आहेस विचारले असता तिने तिचे नाव घेतले आणि तिला सोडायला काय घेशील विचारले असता मला सुका जवला आणि चपाती हवी अशी ती म्हणाली, त्यावर लगेच एका बाईने जवला आणि चपाती बनवून आणला आणि तिला तो खायला दिला. त्या खाल्ल्यावर तिने तिला सोडले. त्या भैयानीला मराठीचा म ही माहीत नव्हता ती शद्ध मराठी कशी बोलली हे माझ्यासमोर अजूनही कोणतेही विज्ञान सिद्ध करू शकलेले नाहीं. या जगात जश्या चांगल्या गोष्टी आहेत तश्या वाईट गोष्टीही आहेत. अंधार दूर करण्यासाठी जसा प्रकाश लागतो तसच विश्वातील या वाईट शक्तींचा अंधार दूर करण्यासाठी अध्यात्माचा म्हणा अथवा भक्तीचा प्रकाश लागतो.
मला सर्वात जास्त कोणाचा राग येतो तर तो दारू पिणाऱ्यांचा कारण कलियुगात दारूचं आहे जी माणसाला दानव करते. दारूचं आहे जी माणसाला आध्यात्मापासून दूर घेऊन जाते आणि त्याला भौतिक गोष्टींच्या मोहात गुंतवून ठेवते. एका दारुड्याच्या बायकोचे त्याच्याच लहान भावासोबत लपड होत म्हणून तो दारू पिऊन पिऊन मेला आणि तो मेल्यावर त्याचा भाव वेड्यासारखा करायला लागला म्हणून त्याच लग्न लावून दिल तर त्याच्या बायकोच लग्नापूर्वी दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते ज्याच्याशी तिचे प्रेम संबंध होते त्याच्या बायकोचे एका तरुण मुलाशी अनैतिक संबंध होते. या सगळ्यांशी दारूचा संबंध होता. आमचे बाबाच नव्हे तर जे जे दारू प्यायचे त्या सगळ्यांचे जीवन नरक झाले होते. त्यातील जे सावरले त्यांचे आयुष्य घडले. त्यामुळे मी लहानपणीच आयुष्यात कधीही दारूला आणि तिला जवळ करणाऱ्याला जवळ करायचे नाही हे मनाशी पक्के ठरविले होते.
क्रमशः
— निलेश बामणे.
मो. 8692923310 / 8169282058
२०२, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए,
बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – ४०० ०६५.
छान माहिती सर