माझी मराठी आहे अगदीच साधी सुधी
लिहिते तशीच सुचते जशी माझी बुद्धी
माझी मराठी नेसते साधेच सुती लुगडे
म्हणूनच शब्द असतात माझे जाडे भरडे
माझा मराठीला नाहीत कसलेच अलंकार
नाही करता येत तिला साज आणि शृंगार
तिला आवडते घ्यायला अंगभर पदर
ती राग मानत नाही कुणीही नाही केली कदर
पटले तिचे विचार तर घ्या नाहीतर नका घेऊ
पण आपसात कलह तरी नका होऊ देऊ
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply