नवीन लेखन...

मेजर थॉमस कँडी

संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केलेल्या मेजर थॉमस कँडी यांचा जन्म १३ डिसेंबर १८०४ रोजी झाला.

मेजर थॉमस कँडी हे जन्माने ब्रिटिश असलेले लष्करी अधिकारी भारतीय भाषापंडित होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेले थॉमस त्यांच्या आयुष्याची शेवटची पंचावन्न वर्षे भारतातच राहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केलेल्या थॉमस कँडी यांनी भावाच्या मदतीने कॅप्टन मोल्सवर्थचे अर्धवट राहिलेले इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे काम पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी चर्चच्या शाळांमधील क्रमिक पुस्तके मराठीत लिहून ती छापून घेतली. ब्रिटिश सरकारकडे भारतीय भाषांमधील अनुवाद करण्याची पुस्तके किंवा मराठीत नवीन पुस्तकांचे जे काम येई ते सर्व थॉमस कँडींकडे प्रथम पसंतीसाठी येत असे. थॉमस तो सर्व मजकूर नीट तपासून त्याविषयी निष्पक्षपातीपणे अभिप्राय देत असे. हे काम करताना त्यांना लिखाणातील चुका दाखवून त्यातील दुरुस्त्या सुचवाव्या लागत, लेखकांविषयी प्रतिकूल अहवाल, अभिप्रायही द्यावे लागत. तत्कालीन अनेक नामवंत, विद्वान लेखकांच्या लिखाणातूनही थॉमसनी अनेक वेळा चुका दाखविल्यामुळे अनेक वेळा जाहीररीत्या आणि वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल द्वेष आणि निंदा होत असे. अशा लेखकांबद्दल थॉमसचे म्हणणे असे होते की, त्यांचे इंग्रजीचे ज्ञान बरे आहे पण मातृभाषेचे मराठीचे ज्ञान कमी पडते!

थॉमस कँडीने इंडियन पिनल कोड, इंडियन सिव्हिल प्रोसिजर कोड याची मराठीत भाषांतरे केली. भाषांतरकारांना त्यांनी अनेकदा सुधारणा सुचविल्या. १९व्या शतकापर्यंत मराठी लिखाणात विरामचिन्हांशिवाय लेखन होई. थॉमसने ‘विरामचिन्हांची भाषा’ हे पुस्तक लिहून त्यांची कशी आवश्यकता आहे हे दाखवून दिले. १८६०च्या अखेरीस ब्रिटिश सरकारने थॉमस यांची प्रमुख भाषांतरकार या पदावर नेमणूक केली. थॉमसनी मराठी भाषेची सेवा विविध स्तरांवर केली. पुणे संस्कृत कॉलेजचे ते मुख्याधिकारी होते, डेक्कन कॉलेजचे प्राचार्य होते, दक्षिण महाराष्ट्रातील शाळांचे ते अधीक्षकही होते. नोकरीतून निवृत्त झाल्यावरही ते भारतातच राहिले. ब्रिटिश भारत सरकारने थॉमस कँडी यांना ‘कंपॅनियन ऑफ द स्टार ऑफ इंडिया’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

मेजर थॉमस कँडी यांचे २६ फेब्रुवारी १८७७ रोजी महाबळेश्वर येथे निधन झाले.

— सुनीत पोतनीस.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..