माकडांची एकदा, भरली शाळा |
मास्तर झाला, चिपांजी काळा || १ ||
वानर चेले शिकू लागले |
धडे सगळे गिरवू लागले || २ ||
पट पट मारू कोलांटी उडी |
नाही तर बसेल, वेताची छडी || ३ ||
भरभर म्हणू, हूप हूप हूप |
शेपटीला लागेल शेरभर तूप || ४ ||
दास आपण राजा रामाचे |
खेळ खेळू पराक्रमाचे || ५ ||
जेवणाच्या सुट्टीत खाऊ या शेंगा |
तोवर करू खूप खूप दंगा || ६ ||
एकटे दुकटे फिरायचे नाही |
टोळक्या बाहेर जायचे नाही || ७ ||
जो कोण मारेल शाळेला बुट्टी |
होईल त्याची हकालपट्टी || ८ ||
नाक खाजवून चिडवलं तर |
मुलं उडवतील आपली टर || ९ ||
पुरे झाला आता नकलांचा खेळ |
संपली आजची शाळेची वेळ || १० ||
माझी ही कविता पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली असून, माझ्या काव्यसंग्रहात प्रसिद्ध झाली आहे,
© कवी उपेंद्र चिंचोरे
25 may 16
Leave a Reply