मकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण, दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रात येते.
फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेश करतो, त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो. महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक हिंदुस्थानी सण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो. आपल्याकडे हा सण मकरसंक्रांत म्हणून ओळखला जात असला तरी भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. दक्षिण भारतात पोंगल, उत्तरेकडे लोहरी म्हणून तर गुजरातमध्ये उत्तरायण, माघी, खिचडी या नावाने देखील तो ओळखला जातो.
मकर संक्रांत फक्त भारतातच नाही तर नेपाळ आणि थायलँडमध्येही साजरी केली जाते. नेपाळमध्ये ‘माघी संक्रांत’ तर थायलँडमध्ये सोंक्रन या नावाने हा सण ओळखला जातो. १ हजार वर्षांपूर्वी संक्रांत ही ३१ डिसेंबरला साजरी केली जायची. मकरसंक्रांत ते रथ सप्तमी या दिवसांत ठिकठिकाणी वैयक्तिक, तसेच सार्वजनिक स्तरावर हळदीकुंकू समारंभ साजरे केले जातात. संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे ‘बोर न्हाण’ केले जाते. यावेळी मुलांना हलव्याचे दागिने व काळे कपडे घातले जातात. कुरमुरे, बोरं, तिळाच्या रेवड्या, या पदार्थांचा मुलांवर अभिषेक केला जातो. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा.
तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे.या दिवशी पतंग उडविण्याचीही प्रथा आहे.
“तिळ गुळ घ्या गोड बोला”
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply