चला दूर …चला दूर…
या थंडीपासून
आपण उघड्यावर
उन्हात पळूया…
खात गोड…खात गोड…
तिळाचे लाडू
आपण सर्वांशी
गोड गोड बोलूया…
पतंग उडवुया…पतंग उडवुया…
पतंग कापुया
पतंग पकडुया
पतंग भिडवुया…
मकर संक्रांतीचा सण
उत्साहात साजरा करुया …
जीवनात त्याच्या माध्यमातून
कित्येकांच्या हृदयात
आनंद ,उत्साह
आणि गोडवा भरूया …
दूर गेलेल्या मनाशी संवाद
साधून त्यांना
पुन्हा जवळ आणूया …
सर्वांना
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मनापासून देऊया…
© कवी – निलेश बामणे
( मो. ८६९२९२३३१० )
Leave a Reply