नवीन लेखन...

मेक इन इंडीया – एक ‘मस्ट सी’ इव्हेन्ट..

आज सकाळी मी माझ्या दोन मुलांना घेऊन वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भरवलेल्या ‘मेक इन इंडीया : मेकींग इंडीया’ प्रदर्शनाला जाऊन आलो. सरकारच्या पुढाकाराने भरवलेलं हे बहुदा पहिलंच प्रदर्शन असावं..

खरंतर ‘प्रदर्शन’ हा मराठी शब्द याचं भऽऽव्य स्वरूप सांगण्यासाठी खुप तोकडा आहे.., परंतू मराठी भाषेतील दुसरा शब्द  नसल्याने मी ‘प्रदर्शन’ हाच शब्द मी वापरतोय..

आपला देश जगातली किंवा आशीया खंडातील उगवती महाशक्ती आहे वैगेरे पुढारगप्पा (पुढाऱ्यांनी स्टेजवरून मारलेल्या गप्पा) मी गेली काही वर्ष ऐकत होतो. पेपरमधल्या अशाच ‘महागप्पां’च्या बातमी खालीच एखादी महाघोटाळ्याची बातमी किंवा मग कुपोषणामुळे काही मुलं दगावल्याची बातमी असायची आणि मग महाशक्ती वैगेरे केवळ थापा असाव्यात असं वाटायचं. परंतू आज पंतप्रधानांच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या पुढाकारानं मुंबईत भरलेलं प्रदर्शन पाहिलं आणि मग मात्र माझ्या देशाच्या ‘समर्थ’पणाबद्दल खात्री पटली..

अहो काय नाही या प्रदर्शनात? घरात डोक्याखाली घ्यायच्या उशीच्या साध्या कव्हरांपासून, देशाच्या वेशीवर खड्या असलेल्या ‘आकाशा’दी देशाच्या सरंक्षक मिसाईल कव्हरापर्यंत सर्व सर्वकाही आज माझ्या देशात बनतं हे बघून उर भरून येतो..ग्राहकोपयोगी वस्तू ते हायटेक-सुपरटेक संरक्षण सामग्रीपर्यंत सर्व काही ‘मेड इन इंडीया’..! इट्स रिअली ग्रेऽऽऽट..!!

आपण त्या त्या प्रोडक्टबद्दल कोणतेही व कितीही बावळटपणाचे प्रश्न विचारा, तीथं उभे असलेले तज्ञ आपल्या शंकांची सोप्प्या शब्दात परंतू सविस्तर माहिती देतात..त्याच्या शब्दांतून आत्मविश्वास ओसंडून वाहात असतो..हे सर्व सरकारी आहे यावर विश्वासच बसत नाही..अनेक तरूण मुलं-मुली त्या त्या पॅव्हेलीयनमध्ये उभ्या असलेल्या तंत्रज्ञांना माहिती विचारत होती. त्याचं कुतूहल जागृत झालेलं त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं..मी एका तंत्रज्ञाला तसं विचारलंही, की ‘तुम्ही गव्हर्नमेंट अधिकारी असून येवढी माहिती आणि ती ही प्रेमाने कशी सांगता?’ त्याने दिलेलं उत्तर मनाला छू कर गेलं..तो म्हणाला, “सर अब यह देश काफी तरक्की कर रहा है, हमे जनता को सब इन्फर्मेशन देने के लीए कहा गया है..वह इसलीए की क्या पता भविष्य मे इन्ही के अंदर से कोई ‘एपीजे अब्दुल कलाम’साब देश को मील जाये?..ओर अब हमे एक नही, अनेक कलामसाब की जरूरत है.!!.” धीस इज गव्हर्नमेंट..!!

पंतप्रधानांनी हे सर्व सामान्य जनतेसाठी खुलं करून जनतेला देशाच्या प्रगतीत भागीदार करून घेतलं, जनतेची देशाबरोबरची नाळ घट्ट केली याबद्दल त्यांचं अभिनंदन करायलाच हवं..! देशात जे जे काही पॉझिटीव्ह घडतंय ते जनतेसमोर मांडायलाच हवं..

जाता जाता-

मी प्रदर्शनात (याला दुसरा सक्षम मराठी शब्द नाही का हो एखादा?) काय पाहिलं त्याचं प्रवासवर्णन करणार नाही, ते प्रत्येकाने जाऊन पाहावं..परंतू मी जर ‘पूर्वीचा मी’ असतो तर हे प्रदर्शन (छे, परत तोच तोकडा शब्द) पाहून म्हटलं असतं, “अरेच्या, आपण फॉरिनमध्ये आहोत की काय?”.. पण आता मात्र म्हणेन, “काय करायचंय फॉरिन, आपला देश अशा शंभर फॉरिनच्या तोंडात मारील आता..”

‘मेक इन इंडीया’- एक ‘मस्ट सी’ इव्हेन्ट.. या माझ्या लेखातल्या मला अपूर्ण जाणवणाऱ्या ‘प्रदर्शन’ शब्दाला, माझे मित्र श्री. शशांक मनोहर यांनी ‘सुदर्शन’  हा अत्यंत समर्थ शब्द सुचवलाय..

‘मेक इन इंडीया” हे ‘प्रदर्शन’ नसून आपल्या देशाच ‘सुदर्शन’ आहे हे नक्की..

इथं ‘सुदर्शन’ म्हणजे ‘सामर्थ्य दर्शन’ ते भगवान योगेश्वराच्या हातातल्या ‘चक्रा’पर्यंतचे सर्वच्या सर्व अर्थ लागू होतात हे निश्चित..!!

प्रत्येकाने हे प्रदर्शन बघाच..!!

— गणेश साळुंखे

9321811091

सुचना – प्रदर्शनात १६ वर्ष खालिल मुलांना प्रवेश नाही. जाताना सोबत आधार कार्ड व आणखी एखादं फोटो आयडी घेऊन जाणं..पॅन कार्ड अजिबात चालत नाही.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..