मान. पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने मुंबईत भरवलेल्या ‘मेक इन इंडीया’ या ‘समर्थ भारता’चं समग्र दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनावर मी एक लेख लिहीला होता..रोहीत वेमुला, जेएनयु, भुजबळ आणि न्यायाधीशाच्या भुमिकेतील एकतर्फी मिडीया या सर्व केवळ निराशाच पैदा करणाऱ्या घटनाच्या पार्श्वभूमीवर, देशात काहीतरी ठोस पाॅझिटीव्ह आणि देश व देशवासीयांचा अात्मविश्वास वाढवणाऱ्या घटनाही देशात घडतायत, ही बाब माझ्या व्हाट्सअप व फेसबुकवरील मित्रांपर्यंत पोहोचावी यासाठी हा माझा प्रयत्न होता..
गेल्या शनिवारी १३ तारखेला प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आणि मी दुसऱ्याच दिवशी माझ्या मुलांना (फक्त दोन) घेऊन प्रदर्शन पाहायला गेलो आणि तिथून परत येताच तो लेख लिहिला होता व माझ्या
इ-मित्रांना (पक्षी-इष्टमित्र) पाठवला आणि सर्वांनी प्रदर्शन पाहाव असं सुचवलं..
सोमवारपासूनचे पुढचे चार दिवस मात्र मला आश्चर्याचे धक्के देणारे होते..सोमवारी मला पहिला फोन ‘युपी’तल्या ‘नाॅयडा’मधनं आला..प्रदर्शनाविषयी लेख आवडल्याचं सांगून त्याविषयी सर्व माहिती विचारून घेतलीआपण फॅमिलीसहीत ते प्रदर्शन पाहायला नक्की जाणार असल्याचं त्या गृहस्थांनी सांगीतलं..आणि मग एक, दोन करता करता सुरू झाला फोन आणि मेसेजचा सिलसिला..या चार दिवसात शेकडो फोन अलम हिन्दूस्थानातून मला आले आणि मग प्रदर्शन भारत सरकारने नसून मीच भरवलंय की काय, असं मला वाटायला लागलं..रादर अशीच भावना प्रदर्शन पाहिलेल्या प्रत्येकाची झाली असावी आणि ती तशी झाली असेल तर या प्रदर्शनाचे ते मुख्य यश आहे असं म्हणायला हरकत नाही..
एखादी गोष्ट सोशल मेडीयावर ‘व्हायरल’ होणं म्हणजे काय याचा मला आलेला हा रोकडा अनुभव होता..मी लिहीलेला लेख हा स्वानुभव कथन करणारा होता..मी बरंच काही न काही लिहीण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझ्या इ-मित्रांना पाठवत असतो..ते ही बिचारे वाचून इमाने-इतबारे पुढे त्यांच्या त्यांच्या
इ-मित्रांकडे सरकवत असतात..अनेकदा माझंच लिखाण निनांवी किंवा लेखकाचं नांव बदलून पुन्हा माझ्याकडे साभार परत येत असतं वर पुढे पाठवायचा प्रेमळ दमही दिलेला असतो..मी छान एन्जाॅय करतो हे सर्व..परंतू प्रदर्शन लेख चक्क माझ्या नांव-नंबरासकट हजारो लोकांपर्यंत पोहोचला याचं मला आनंद आणि आश्चर्य, दोन्हीही वाटलं..
हा लेख इतका व्हायरल का झाला असावा, याचा मी विचार केला असता मला असं जाणवलं, की देशात खऱ्या व बऱ्याचदा खोट्या, निराशा वाढवणाऱ्या, तरूण पिढीच्या मनात देशाबद्दल नकारात्मक भावना निर्माण करणाऱ्या घटना/बातम्या दिसत असतात..टीव्व्हीचा पडदा जसा मोठा-मोऽऽठा होत जातोय तसं या निगेटीव्ह बातम्यांचही ग्लोरिफीकेशन होत चाललंय.. माझ्यासारख्या सामान्यांना त्यातला फोलपणा पटतोय परंतू ते दाखवतात तेच बघणं हेच आपल्या हातात आहे अशी भावना बळावणं आणि या पार्श्वभूमीर ‘मेक इन इंजीया’सारखं काहीतरी उत्तम, मनाला उभारी देणारं या देशात घडतेय आणि हे माहीत झाल्यावर, त्याला सामान्यजनांनी भरभरून प्रतिसाद देणं घडलं असावं..’मेक इन इंडीया’वर प्रिंट किंवा/आणि इलेक्ट्राॅनिक मिडीयावर फार बातम्या दाखवल्या गेल्या नाहीत..(नाही म्हणायला ‘मेक इन इंडीया’च्या गिरगाव येथील वेन्यूवर अपघाताने लागलेल्या आगीची मात्र सर्व चंनेल्सनी दिवसभर धग घेतली..-पुन्हा निगेटीव्ह)
असो. माझा लेख व पर्यायाने ‘मेक इन इंडीया’ संपूर्ण देशात पोहोचवण्यास कारणीभूत ठरलेल्या माझ्या ज्ञात-अज्ञात मित्र, इ-मित्रांचे मनापासून आभार मानतो व थांबतो..
— गणेश साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply