नवीन लेखन...

मोबाईलला मित्र करा.. पण सावधपणेच ..

Make Your Mobile Your Friend

मोबाईल फोन हातात नसणारा माणूस आजकाल विरळाच ! फोनचे मुख्य काम संवाद आणि संपर्काचे, पण त्याचा आता वापर होऊ लागलाय चक्क खेळण्यासाठीसुद्धा.

अगदी दोन-दोन वर्षानी मोबाईल बदलणारे लोक जसे आहेत तसे अक्षरश: सहा महिन्यातही मोबाईल बदलणारे लोकही आपल्या आसपास दिसतात. नवा फोन घेतला की जुना फोन घरातल्या दुसर्‍या व्यक्तीला दिला जातो तसाच कधीकधी बच्चेकंपनीला खेळण्यासाठीही दिला जातो.

मोबाइल जसा उपयुक्त आहे, तसाच तो अपायकारकही आहे हे आपण बर्‍याचदा विसरतो ! शेवटी मोबाईल हेही एक इलेक्ट्रॉनिक गॅझेट असल्यामुळे योग्य काळजी घेतली नाही तर त्याचे दुष्परिणाम अटळ आहेत.

प्रत्येक गोष्टीचा अतिवापर चांगला नसतोच. मोबाइलसुद्धा याला अपवाद नाही. जबाबदारीने मोबाइल वापरला तर आपण व मोबाइल दोघेही सुरक्षित राहूच, पण आजूबाजूच्यांनाही सुरक्षित ठेऊ.

बर्‍याचदा आपण मोबाइल फोनचा स्फोट झाल्याच्या बातम्या ऐकतो. काय असेल याचं कारण? हे टाळता येईल का? मोबाईल सुरक्षितपणे कसा वापरायचा.. वगैरेचा थोडा आढावा घेऊ आणि मोबाईल वापरताना घ्यायची खबरदारीही बघूया. थोडक्यात काय.. तर मोबाइलबाबतचे हे ‘Do’ and Dont’ Do’ बघूया…


शक्यतो ब्रँडेड फोनच विकत घ्या, ज्यावर आयएमईआय (IMEI) नंबर असेल. फोनवरचा आयएमईआय बिलावर आणि बॉक्सवरही एकच आहे याची खात्री करुन घ्या.

बॅटरीवर दिलेल्या सूचनांवर नजर टाका. बॅटरीवरील व्होल्टेज आणि सोबत मिळालेल्या चार्जरवरील व्होल्टेज सारखेच आहे की नाही ते तपासा.
फोन वापरण्यापूर्वी त्याच्या मॅन्युअलमध्ये दिलेल्या सूचना नीट वाचा आणि त्यांचे पालन करा.

मोबाइल फोन चार्जिंगवर असताना एखादा कॉल आला आणि आपण चार्जिंग बंद न करता तसंच चार्जर अनप्लग न करताच बोललो, तर मोबाइल फोनचा स्फोट होण्याची शक्यता असते. चार्जिंग सुरु असताना मोबाइल फोनच्या अंतर्भागावर ताण पडतो. चार्जिगदरम्यान त्याचा वापर केल्यास हा ताण जास्त वाढतो. असा ताण सहन न झाल्याने स्वस्त फोनमधील काही पार्टसचा स्फोट होतो.

अॅंड्र्रॉइड स्मार्टफोनमध्ये मालवेअर, बग्स वगैरेही मोबाईलवरील ताण वाढवतात, त्यामुळेही मोबाइलचा स्फोट होण्याचा धोका असतो.

मोबाईल वापरताना सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी ?

फोन चार्जिंगवर असताना आलेल्या कॉलवर बोलणं शक्यतो टाळा. गरज असल्यास फोन चार्जिंग बंद करुन प्लग काढून नंतरच बोला.

बॅटरी पूर्ण चार्ज झाली की चार्जिंग बंद करा. फोन जास्त चार्ज करू नका

बॅटरी खराब झाली असल्यास किंवा फुगली असल्यास लगेच बदला

नॉन ब्रँडेड तसेच स्वस्त मोबाईल फोन अनेकदा धोकादायक ठरतात. अशा फोन्समध्ये चिनी बनावटीची बॅटरी तसेच छोटे-मोठे पार्ट वापरलेले असतात.

इंटरनेट सर्फिंग व डाउनलोडिंगच्या वेळी मोबाइल फोनसाठी असलेले अँटीवायरस फारसे प्रभावी नसल्यास स्मार्ट फोनमध्ये मालवेअरचा धोका वाढतो. असा धोका टाळण्यासाठी तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमने दिलेल्या स्टोअरवरुनच अॅप्स इनस्टॉल करा.

असुरक्षित किंवा सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा. मॉल वगैरेमध्ये मोफत इंटरनेट मिळत असले तरी याचे पोर्ट सुरक्षित नसल्याने हॅकरला तुमचा मोबाइल डेटा हॅक करणे सहज शक्य असते.

पेट्रोलपंपावर तसेच गॅस फिलिंग स्टेशनवर मोबाईल कधीही वापरु नका.

आरोग्यासाठी सावधगिरीचे काही उपाय

मोबाइलवर बोलताना हँडसेट कानापासून थोडा दूर ठेवा ज्यामुळे रेडिएशनचा धोका कमी होईल. यासाठी सोपा उपाय म्हणजे स्पीकरवर बोला किंवा हेडफोन्स वापरा.

झोपताना उशीखाली किंवा शरिराजवळ मोबाइल फोन घेऊन झोपणं टाळा.

आपण अनेकदा काही लोकांना काम करताना फोन तोंडात घरताना बघतो. हे अत्यंत घातक आहे. असं सतत केल्यास मोबाइलच्या रेडिएशन्समुळे तोंडाचा कॅन्सर किंवा ट्यूमर होण्याचा धोका वाढतो. डोकेदुखी, स्लीप डिस्टर्बन्स, मायग्रेन हे त्रासही होऊ शकतात.

मोबाइल फोन पाण्यात भिजल्यास तो पाण्यातून काढून तो स्विच-ऑफ करा. सिमकार्ड आणि मेमरीकार्ड काढून ठेवा. कपड्याने फोनला कोरडा करा. मात्र हेअरड्रायरचा वापर करू नका. ओला असलेल्या अवस्थेत मोबाईल कधीही वापरु नका.

— पूजा प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..